‘संदर्भासहित स्त्रीवाद’ हा सुमारे ५८० पृष्ठांचा बृहत् -ग्रंथ प्रकाशित होणे ही एक अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. हा ग्रंथ ‘विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ’ आहे आणि याची आखणी, यात समाविष्ट लेखांची मौलिकता आणि दर्जा, याने कवेत घेतलेले चर्चाविश्व यासाठी प्रथम या ग्रंथाच्या संपादकत्रयींचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक आणि स्त्रीप्रश्नांचा सार्वत्रिक वेध घेत चळवळीला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्वदूर घेऊन जात व्यापक दिशा देणाऱ्या विद्याताईंच्या कार्याचा हा नुसता गौरवच नाही, तर स्त्रीप्रश्नांची सर्वागीण मांडणी, त्यासंबंधी सुरू असणारे अनेक पातळ्यांवरील काम यासंबंधीची माहिती यांचे तपशीलवार दस्तावेजीकरण या ग्रंथात झालेले असल्यामुळे एखाद्या मूल्यवान संदर्भग्रंथाचे स्वरूप या ग्रंथाला प्राप्त झालेले आहे.
विषय «समीक्षा»
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
पी साईनाथ यांच्या वार्तांकनातुन ग्रामीण, दुर्लक्षीत, पिडीत समाजाची परिस्थीती मुख्य इंग्रजी दैनिकातुन दिसु लागली. हाच वारसा सांगणारे, इंग्रजीतुन वार्तांकन करणारे जयदीप हर्डीकर यांनी A Village Awaits Doomsday(Penguin Books) हे पुस्तक लिहीले आहे.
पुस्तक परिचय
काबाचा पवित्र काळा पाषाण मुळात अल्-उझ्झा या अरबस्तानच्या आद्य मातृदेवतेचे प्रतीक होता —- ‘अरबस्तानची महादेवी सर्वसामान्यपणे अल्-उझ्झा या नावाने संबोधली जाई. अल्-किंदी आपल्याला सांगतो की, अल्-उझ्झा म्हणजे चंद्र. तिचे मुख्य मंदिर, आठा अरबस्तानचे सर्वांत प्रसिद्ध व पवित्र स्थान, मक्केचे काबा हे होते. या पवित्र स्थानाचे वतनदार असलेला कुरेश गण (कबीला) इस्लामपूर्व काळात तिचा पुरोहितवर्ण होता आणि म्हणूनच त्याला ‘अब्द अल्-उस्सा’, ‘अल्-उझ्झाचे दास’, अशी पदवी होती. पण मक्केच्या मंदिरात तिची प्रत्यक्ष सेवा वृद्ध पुजारिणी करीत. अजूनही काबाच्या पालकांना बनु साहेबाहू, ‘म्हातारीची मुले,’ असे ओळखले जाते….
‘भोगले जे दुःख त्याला’ एक आगळे आत्मचरित्र
आजपर्यंत अनेक उपेक्षितांनी आत्मचरित्र लिहून आपले अंतरंग उघड केले आहे. समाजाकडून, कुटुंबीयांकडून विशेषतः सासरच्या, झालेल्या अनन्वित शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या अमानुष कहाण्या आपल्या वाचनात आल्या आहेत. मनात वाटलेली कटुता, क्षोभ, प्रचंड भावनिक खळबळ व मरणप्राय उद्विग्नता या सर्व भावभावनांना वाट करून देण्याचे उत्तम साधन म्हणजे आत्मचरित्र. समाजापर्यंत पोचण्याचा समाजमान्य मार्ग. ही प्रत्येक व्यक्तीची मानसिक गरज आहे. मैत्रिणींशी हितगुज, आप्तेष्टांशी संवाद व अतीच झाले, ताणतणाव असह्य झाला तर समुपदेशकाचे साहाय्य ह्यांपैकी कुठल्यातरी मार्गाने आजच्या समाजात आपण तणावमुक्तीसाठी प्रयत्न करत असतो. आत्मचरित्र लिहिणे प्रत्येकाला शक्य नसले तरी प्रत्येक जीवन ही कादंबरी नक्कीच असते.
पुस्तक-परिचय
मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०
मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात.