आपण सर्वजण विघातक आज्ञाधारकतेचे बळी ठरण्याची शक्यता आहे. व आपल्याला त्याबद्दल खूपच कमी जाण आहे हे भान जागविणारा सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून देणारा लेख
—————————————————————————-
जाहीर सूचना
एका तासासाठी ४ डॉलर कमावण्याची संधी – स्मरणशक्तीच्या अभ्यासासाठी लोक हवे आहेत.
* आम्हाला स्मरणशक्ती आणि शिक्षणासंदर्भातील वैज्ञानिक अभ्यासासाठी न्यु हॅवन येथील पाचशे पुरुषांची मदत हवी आहे. हा अभ्यास येल विद्यापीठात करण्यात येणार आहे.
* सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस साधारण एका तासासाठी ४ डॉलर (अधिक कारभत्त्यापोटी ५० सेंटस) दिले जातील.