(ब)
एका वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूची देवाणघेवाण म्हणजेच वस्तूविनिमय होय. कालांतराने, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्यांच्या सामायिक मापदंडांचा अभाव, वस्तूचा साठा करण्याची अडचण, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण, विलंबित देणी देण्यातील अडचण यांसारख्या अनेक समस्यांमुळे वस्तुविनिमयव्यवस्था मागे पडली. तिची जागा मुद्राविनिमयाने घेतली. पशूमुद्रा, वस्तूमुद्रा, धातूमुद्रा, नाणी, कागदीमुद्रा यांपासून ते पतमुद्रा, प्लॅस्टिक मुद्रा, इलेक्ट्रॉनिक्स मुद्रेपर्यंत मुद्रेची उत्क्रांती आपल्या परिचयाची आहे. साहजिकच, आज आपल्यापैकी कुणीही मुद्राविनिमयापासून मुक्त नाही. व्यापार, विपणनव्यवस्था (market system) आणि उत्पादनप्रक्रियांचा पाया विनिमयप्रक्रिया (exchange process) हाच आहे. आधुनिक विनिमय प्रक्रियेचा मूलाधार मुद्रा (money) हाच आहे. त्यामुळे, मानवी गरजांची आणि तृष्णांची परिपूर्ती करणाऱ्या विनिमयप्रक्रियेचे स्वरूप समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
“एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते.” ही