आस्तिकांविरुद्धची आघाडी कशासाठी?
श्री. श्यामकान्त कुळकर्णीचे पत्र या अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. कुळकर्णी ह्यांना पडलेला प्र न अनेकांच्या मनांत येत असावा. देव मानल्यामुळे फायदे पुष्कळ होतात हे मान्य आहे. पण तोटे फायद्यांपेक्षा जास्त आहेत. कारण फायदे व्यक्तींचे होतात. तोटे समाजाचे होतात. पुन्हा माझे आवडते उदाहरण द्यावयाचे झाले तर ते विहिरींचे आहे. जो आपली विहीर सर्वांत खोलपर्यंत खणील त्याचा फायदा. त्याच्या विहिरीला कायम पाणी, कारण तो बाकीच्यांच्या विहिरीमधले पाणी ओढून घेतो. देवाला मानणारा बाकीच्यांचे काय घेतो हा प्र न आता निर्माण होतो.
विषय «संपादकीय»
संपादकीय
उन्हाळा सुरू झाला की नागपूरकर रोजच्या वृत्तपत्रातले तापमानाचे आकडे आदराने वाचतात —- जसे “४५ होते काल!” असाच काही लोकांना वर्षभर ‘पाहावासा’ वाटणारा आकडा म्हणजे सेन्सेक्स हा शेअरबाजारासंबंधीचा निर्देशांक. तापमानात जसे फॅरनहाईट-सेल्सियस प्रकार असतात तसे शेअरांमध्येही सेन्सेक्स-निफ्टी प्रकार असतात, आणि ‘दर्दी’ लोक त्यांच्या तौलनिक विश्वासार्हतेवर वाद घालत असतात. मुळात शेअरबाजार देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो का, आणि निर्देशांकांचे चढउतार अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचे चढउतार दाखवतात का, हे दोन्ही प्र न भरपूर वादग्रस्त आहेत. पण दूरान्वयाने तरी हे निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या अगदी मर्यादित अंगांबद्दल काही तरी सांगतात.
संपादकीय अस्वस्थता!
अकरा वर्षांपूर्वी आजचा सुधारक सुरू झाले तेव्हा जागतिकीकरण—-खाजगीकरणही सुरू होत होते. त्यावेळी मनमोहनसिंगांनी परकीय मदत मिळवून विकासाचा दर सहा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर नेला. तेव्हा एक प्रवाद असा होता की सहा टक्के विकास दर, ही प्रकाशाच्या वेगासारखी एक अनुल्लंघ्य मर्यादा आहे! तिला हेटाळणीने ‘हिंदू विकास दर’ म्हटले जाई. ही मर्यादा मोडणारे सिंग-राव सरकार अर्थातच कौतुकाचे धनी झाले.
जागतिकीकरण-खाजगीकरणावर टीका करणाऱ्यांना त्यावेळी सरसकट ‘कम्यूनिस्ट’ ही शिवी (!) देऊन डावलले जात असे. सिंग सांगत होते, की हा एक–दिशा मार्ग आहे. एकदा ही वाट धरायची तर ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको’ असे स्वतःला बजावत, अत्यंत शिस्तबद्धतेने वागावे लागेल.
संप, सत्य आणि इतिहास
मराठीतील बहुतेक नियतकालिकांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात आजचा सुधारक आपल्या वाचकांच्या लेखनावर चालतो, पत्रांमधून आणि लेखांमधून, आणि असे वाचक जगभर पसरले आहेत, त्यामुळे लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावर प्रतिसाद येण्याला मध्ये एखादा अंक जावा लागतो. नुकतेच हे एक-सोडून-एक चक्र अडखळण्याचा अनुभव आला—-पण तो मात्र लागोपाठ दोनदा! नोव्हेंबरचा (११.८) हा अंक ऐन दिवाळीत छापखान्यात पोचला. मोठ्या सुट्ट्यांनंतर वेळेवर परत कामावर रुजू होण्याची वृत्ती भारतात कमी आहे. आगेमागे एखादा आठवडा उशीरा येणे फारसे गैर मानले जात नाही. पण अनेकांच्या सहभागातून घडणाऱ्या क्रियांना हे फार मारक ठरते.
संपादकीय
लवकरच एक शतक संपेल. सहस्रकही संपेल. खरे तर घड्याळाचा एक ठोका दुसऱ्या ठोक्यांसारखाच असतो, आणि कॅलेंडरचे पानही मागच्यापुढच्या पानांपेक्षा वेगळे नसते. आपण आपल्या आठवणींचे संदर्भ लावायला काळाच्या तुकड्यांना नावे आणि क्रमवार आकडे देतो, एवढेच. पण तरी विसावे शतक जरा विशेषच. ह्या शतकात मानवी जीवन जेवढे बदलले तेवढे इतर कोणत्याच शतकात बदलले नाही. आणि हा बदल वाढत्या वेगाने होत राहणार अशी चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत कोणते वैचारिक सामानसुमान वागवत पुढची वाट चालायची हे ठरवणे निकडीचे वाटते. आजचा सुधारक ह्या सामानात विवेकवादाला सर्वात महत्त्वाचा ‘डाग’ मानतो.
संपादकीय
प्रिय वाचक,
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी नागपूरला समारंभपूर्वक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पारंपरिक बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा असा विधी नसतो. भिक्षु होण्याचा मात्र विधी असतो. तरी डॉ. बाबासाहेबांनी विधिपूर्वक बौद्धधर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर आपल्या उपस्थित असलेल्या लक्षावधी अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी भगवान वुद्धाच्या चालत आलेल्या अशा धर्मप्रथांपासूनच फारकत घेतली असे नाही. काही तत्त्वविचारांनाही त्यांनी कलाटणी दिली. त्यांनी धर्माच्या सामाजिक आशयावर भर दिला आहे. त्याला ते धम्म म्हणतात. धम्माशिवाय समाज राहू शकत नाही.
संपादकीय
या महिन्यापासून एक लहानसा खांदेपालट होत आहे. श्री. दिवाकर मोहनींनी गेले दीड वर्ष आजचा सुधारकचा मार्ग पुष्कळच प्रशस्त केला आहे. त्यांना थोडी मोकळीक मिळावी ह्यासाठी संपादकीय कामापुरता हा बदल आहे.
आ. सु. बद्दल अनेकांच्या अपेक्षा अनेक प्रकारांनी वाढत आहेत, हे त्याच्या प्रगतीचेच लक्षण आम्ही समजतो. उदाहरणार्थ आ. सु. ने नुसते वैचारिक लिखाण प्रसिद्ध करून न थांबता काहीतरी ठोस करून दाखवावे म्हणजे – शाळांमधून प्रवेश देताना देणग्या उकळणाच्या संस्थामध्ये जाऊन निषेध, घोषणा, धरणे असे उपाय योजावेत. लग्नाकार्यात हुंडा घेणारे, प्रचंड उधळपट्टी आणि श्रीमंती प्रदर्शन करणारे पक्ष असतील त्यांनाही वरील मार्गांनी विरोध करावा इत्यादी.
संपादकीय
गेल्या दोन-तीन महिन्यांत काही आम्ही लिहिलेल्या व काही आम्ही प्रकाशित केलेल्या लेखांमुळे पुष्कळ पत्रे आली आहेत. त्या पत्रांना सविस्तर उत्तरे देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर काही पत्रांवर ताबडतोब काही ना काही कृती करण्याची गरज आहे अशा पत्रांमध्ये श्री. देवदत्त दाभोलकर ह्यांचा क्रम पहिला लागतो. श्री. भ. पां. पाटणकर (ऑगस्ट ९९ अंक पाहावा), श्री. ग. के. केळकर, श्री. प्रभाकर गोखले, ह्या आमच्या वाचकांनी पाठविलेल्या पत्रांना (चालू अंकात अन्यत्र प्रकाशित) क्रमशः उत्तरे पुढे दिली आहेत. मराठी भाषाप्रेमींना लिहिलेल्या अनावृत पत्राला आलेल्या उत्तरांपैकी काही या महिन्यात प्रसिद्ध करीत आहोत, बाकीची ऑक्टोबरमध्ये व त्यांचा समारोप शक्यतोवर नोव्हेंबरमध्ये करावा असा इरादा आहे.
संपादकीय
अन्यायकर्त्याला सर्व समाजाचे संमोदन वा मूक अनुमोदन असते
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. नाना ढाकुलकरांची दोन पत्रे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पत्राला आम्ही जे उत्तर दिले त्याने त्यांचे समाधान झाले नाही हे उघड आहे. आजचा सुधारकचे धोरण व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर (एखाद्या जातिविशेपावर) केलेली टीका शक्यतोवर न छापण्याचे आहे. त्या धोरणाला अपवाद करून ही पत्रे छापत आहोत. आमच्याकडे आलेल्या आणखीही काही लेखांत व्यक्तीवर टीका करणारा मजकूर आलेला आहे. तेवढा प्रसिद्ध करून ह्यानंतर असा मजकूर वगळला जाईल. आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तींशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे.
संपादकीय
विवेकाचे उग्र व्रत
सोनिया गांधी यांची उमेदवारी ही आपल्या देशातली एक फारच मोठी घटना झाली आहे. सगळ्या देशाचे लक्ष सध्या त्यांच्याकडे लागले आहे. आपल्या देशातली लोकशाही ही किती अपरिपक्व आहे त्याचे हे लक्षण आहे. भाजपासारख्या सत्तारूढ पक्षाला विदेशात जन्मलेल्या, जिने आजवर राजकीय आकांक्षा दाखविली नव्हती अशा एका साधारण बुद्धीच्या महिलेने आपली उमेदवारी जाहीर केल्याबरोबर भीतीने कापरे भरावे ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने नामुष्कीची आहे. काँग्रेस पक्षाजवळ सोनिया गांधींच्यापेक्षा अधिक मातब्बर व्यक्ती नाही. आपण सारेच किती व्यक्तिपूजक आहेत हेच ही घटना स्पष्ट करते.