विषय «संपादकीय»

संपादकीय आगामी विशेषांकांबद्दल

आपला येता (जानेवारी—फेब्रुवारी २००४) अंक हा आधुनिक विज्ञानाचे स्वरूप या विषयावरचा विशेष जोडअंक असेल. त्यानंतरचा अंक मार्चचा असेल.
या विशेषांकाचे संपादक चिंतामणी देशमुख व्ही. जे. टी. आय. मध्ये तीस वर्षे भौतिकीचे अध्यापन करून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. डॉ. होमी भाभा आणि दामोदर धर्मानंद कोसंबी यांची चरित्रे, देवांसि जिवें मारिलें (सहलेखक) ही विज्ञान-कादंबरी आणि कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन (भाषांतरित), ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. लोक-विज्ञान संघटना आणि विज्ञान ग्रंथालीतही ते कार्यरत असतात. विषय मोठा आणि महत्त्वाचा आहे. लेखही एका जोडअंकात सामावून घेता न येण्याइतके आहेत.

पुढे वाचा

संपादकीय माहिती मिळवण्याचा हक्क

“लोकशाहीत जनतेच्या माहिती मिळवण्याच्या हक्काला सर्वाधिक महत्त्व असायला हवे. अशा हक्काला बांधील असलेल्या कोणत्याही सरकाराने या नागरिकांच्या समितीला उत्साहाने सहकार्य देऊन गुजरातेतील घटिते, हिंसेचे सूत्रधार आणि दोषी यांच्या चौकशीत आणि माहितीच्या प्रसारणात मदत करायला हवी होती. नागरिकांच्या समितीने मानवी स्वातंत्र्याचा हक्क बजावण्याच्या मूलभूत हेतूने या कामाला हात घातला. जेव्हा समाजात मोठे अन्याय घडतात तेव्हा समाजाचे आरोग्य अन्याय नाकारण्याने किंवा अर्धसत्ये पुढे करण्याने साध्य होत नाही. धैर्याने अन्यायांची कबुली देण्याने आणि त्या अन्यायांचे परिमार्जन करण्यानेच समाजाचे आरोग्य टिकू शकते. गुजरात सरकार व भारत सरकार या चौकशीत सहभागी झाले नाहीत यावरून त्यांना जनतेच्या माहिती मिळवण्याच्या हक्काची कदर करायची इच्छा नाही, हे उघड आहे.”

पुढे वाचा

संपादकीय उत्क्रांती आणि परोपकार

माणसांनी एकमेकांना मदत करावी का? ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित’ त्यांना जाऊन उठवावे का? जगाचे सोडा, एका देश नावाच्या रचनेपुरता तरी असा प्रकार करावा का? की हे वागणे अनैसर्गिक आणि आत्मघातकी आहे? इथे ‘अनैसर्गिक’ असे काही करता येते का? या प्र नाला टाळून पुढे जाऊ. एक मतप्रवाह असा —- कोणत्याही जीवजातीचे (Species चे) जीव भरपूर प्रमाणात असले की अखेर त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आवश्यक अशा वस्तूंचा तुटवडा पडतो. ही तोकडी संसाधने आपल्याला मिळावी यासाठी त्या जीवजातीतल्या व्यक्तींमध्ये स्पर्धा होऊ लागते.

पुढे वाचा

संपादकीय नाशिकची ‘अर्थ’ चर्चा

“तेजीमंदी तर चालतच असते’, हे सामान्य व्यापार-उदीम करणाऱ्यांचे एक आवडते सूत्र असते. त्यांच्या मालाची, कसबांची मागणी बदलत जाते; आज गि-हाईक नसले तरी उद्या मिळेल असा त्यांचा विश्वास असतो. नोकरीपेशातल्या लोकांना यातला हताश भाव समजत नाही. आपण मेहनतीने कमावलेली कौशल्ये किंवा घडवलेल्या वस्तू कोणालाच नको आहेत यातून येणारी खिन्नता आणि ‘मी निरर्थक झालो/झाले आहे’ हा तो भाव—-अर्थशास्त्रात ‘मंदी’ म्हणतात त्याला. आज कापडउद्योगात मंदी आहे. मुंबईत गेल्या वीसेक वर्षांत गिरण्यांची संख्या ६५ वरून ५ वर आली. सोलापुरात सातांपैकी एक गिरणी चालते. नागपूर परिसरात वर्षा-सहा महिन्यांत पाच गिरण्या बंद पडल्या—- पाचांपैकी!

पुढे वाचा

संपादकीय

सप्टेंबर अंकामध्ये डॉ. उषा गडकरी ह्यांचा डॉ. सत्यरंजन साठे ह्यांच्या लेखावर तीव्र टीका करणारा लेख प्रकाशित झाला. त्याला डॉ. साठे ह्यांजकडून उत्तर दिले गेलेच आहे. ते उत्तर व्यक्तिशः दिले गेले आहे. पण ह्या प्रकरणी विवेकवादी नियतकालिकाची भूमिका विशद करण्यासाठी लिहीत आहे.
त्याच अंकामध्ये श्री. गंगाधर गलांडे ह्यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी काही प्र न उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तरे देण्याचा कार्यकारी संपादकांनी प्रयत्न केला आहे. त्या उत्तरांनी श्री. गलांड्यांचे समाधान झालेले नाही. डॉ. गडकरींचेही डॉ. साठ्यांच्या लेखाने समाधान झाले नसावे.

पुढे वाचा

संपादकीय असुरक्षित एकाकी भाव—-आणि उतारा

भारताच्या इतिहासात सामान्य जनतेने युद्धांमध्ये किंवा मोठ्या राजकीय चळवळींमध्ये भाग घेण्याची उदाहरणे फारशी नाहीत. कौरवपांडवांचे युद्ध होत असताना म्हणे आसपासचे शेतकरी दिवसाभराची कामे आटपून युद्ध ‘पाहायला’ येऊन उभे राहत. यात ‘धर्मयुद्धा’मुळे बघ्यांना भीती वाटत नसण्याचा भाग असेलही, पण जास्त महत्त्वाचे हे की कोण जिंकणार, या प्र नाचे उत्तर शेतकऱ्यांना नांगरण-डवरण-रोपणी-कापणीपेक्षा महत्त्वाचे वाटत नसे. अठराशे सत्तावनच्या लढायांबाबतही अशाच नोंदी आहेत. लढाईच्या क्षेत्रात, लढाईच्या काळापुरती शेतीची कामे बंद पडत. एकदा का लढाई संपली की पुन्हा कामे सुरू होत. अगदी शिवकालातही कवींनी कितीही “बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था” असे सांगितले तरी शेतीच्या हंगामात सैन्ये उभारता येत नसत.

पुढे वाचा

संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय करू?’ ह्या प्र नाचे उत्तर आपण अशा विचारांच्या देवाणघेवाणीच्या पायावर उभे राहूनच देऊ शकतो. हे सारे करणाऱ्यांच्या विचारांत आणि कृतीमध्ये फार अंतर पडत नाही. पण ‘माझेच’ खरे ही वृत्ती बळावली तर त्यातून ‘अंतस्थ हेतू’, ‘हिडन अजेंडे’, असे सारे घडून कथणी आणि करणीतले अंतर वाढत जाते.

पुढे वाचा

संपादकीय राष्ट्र वाद, विवेकवाद आणि थोडे इतर काही

ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. रवीन्द्र द. खडपेकर ह्यांचे एक पत्र संक्षेपाने प्रकाशित होत आहे. त्याचा परामर्श येथे घ्यावयाचा आहे. स्थलाभावामुळे मूळ पूर्ण पत्र प्रकाशित करू शकलो नाही.
खडपेकरांनी दूरदर्शनवर पाहिलेल्या जाहिरातीची दखल मिळून साऱ्याजणींनी घेतली आहे (मार्च २००२). खडपेकरांशी मी सहमत आहे, मात्र त्यांच्या माझ्या सहमतीची कारणे मात्र अगदी वेगळी आहेत. कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण होऊ नये असे माझे मत आहे. त्याविषयी मी आजचा सुधारक मधूनच वेळोवेळी अनेक लेख लिहिले आहेत म्हणून त्याच्यामागील सर्व कारणांची पुनरुक्ती करीत नाही.

पुढे वाचा

संपादकीय

खेल खेल में दोन ‘गणिती’ कहाण्या सांगतो.
गणिताचे एक प्राध्यापक फळ्यावर एका सूत्रापासून दुसरे एक सूत्र सिद्ध करत होते. एका टप्प्यावर ते म्हणाले, “यावरून हे उघड आहे की . . .”, आणि त्यांनाच त्या टप्प्याच्या उघडपणाबद्दल (obviousness) शंका आली. फळा सोडून, टेबलखुर्ची गाठून त्यांनी वीसेक मिनिटे कागदावर काही गणित केले. शेवटी आनंदून उठत ते म्हणाले, “हो! ते उघड आहे!”
दुसरी कहाणी आहे, श्रीनिवास रामानुजन् इंग्लंडात होता तेव्हाची. रामा-नुजनचा गुरु जी. एच. हार्डी याने त्याला काही व्याख्याने ऐकायला पाठवले. व्याख्याता काही नवे निष्कर्ष ‘जाहीर’ करत होता.

पुढे वाचा

संपादकीय एका माणसाला किती जमीन लागते?

वीसेक लक्ष वर्षांपूर्वी आजच्या माणसांसारखी माणसे (होमो सेपियन्स) आफ्रिकेत उपजली. फळेमुळे गोळा करून, छोट्यामोठ्या शिकारी करून या माणसांचा उदरनिर्वाह चालत असे. फळझाडे कोठे उगवतात, प्राण्यांची दिनचर्या काय असते, लाकडांना टोकदार करायला दगडांपासून पाती कशी बनवावी, अशा विषयांचे ज्ञान या माणसांना होते. हे सारे त्यांच्या जीवनशैलीसाठी गरजेचे असे तंत्रज्ञान होते. या जीवनशैलीला आज ‘सावड-शिकार’ किंवा ‘संकलन शिकार’ (hunting-gathering) जीवनशैली म्हणतात. तिच्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानालाही आपण शिकार सावड तंत्रज्ञान म्हणू शकतो.
माणसे उपजली तो काळ खूप थंडीचा होता, ‘हिमयुग’ असे नाव असलेला. माणसे मुख्यतः उष्णकटिबंधातच राहत.

पुढे वाचा