“अख्ख्या आर्थिक दृष्टीतून भारतीय शेतकरी कर्जबाजारी नाही. उलट भारतीय भांडवलदार, व्यापारी आणि सरकार यांना भारतीय शेतकऱ्यांनी गेल्या शतकात एवढे प्रचंड कर्ज दिले, की तेवढे कर्ज कोणताही सावकार कुणाला देऊ शकणार नाही. या शोषकांची कमाल ही, की यांनी शेतकऱ्यांचे कर्ज परत न करता बुडविले आणि उलट शेतकऱ्यांनाच कर्जबाजारी म्हणून घोषित केले. जप्त्या-वॉरंटस्, काळ्या यादीतील शेतकऱ्यांच्या नावाची कुप्रसिद्धी अशा अघोरी मार्गांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्वामीला घायाळ करण्यात आले. उत्पादनखर्चापेक्षा कमी किंमतीला आपले उत्पादन विकून आणि उत्पादनखर्चापेक्षा जास्त किंमतीला औद्योगिक व उपभोग्य वस्तूंची खरेदी करून शेतकऱ्यांनी भांडवलदार, व्यापारी, नोकरदार आणि सरकार या सर्वांना अलोट कर्ज दिले.
विषय «संपादकीय»
बाजारपेठा एक व्यवस्था
१. तुमच्या हातात चहाचा कप येतो. त्याच्यामागे काय-काय घडलेले असते?
कोणीतरी चहाच्या मळ्यात चहा पिकवत असते, कोणीतरी चहाची पानं खुडून, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची चहापत्ती बनवलेली असते.
मग ती बडे व्यापारी, छोटे व्यापारी, दुकानदार करत आपल्यापर्यंत येते. तिकडे ऊस शेतकरी, तोडणी कामगार, साखर कारखाना करत साखर घरी येते. आणिक कोणी म्हैस पाळतो, दूध काढून डेअरीला घालतो, पिशवी बंद होऊन आपल्याकडे येते. याशिवाय सिंचन व्यवस्था, पशुखाद्य, मोटारउद्योग, वाहतूक-व्यवस्था अशा अनेक गोष्टी असतात. चहाची भांडी, गॅस असतोच. कपबश्या असतात.
इतके सगळे होते आणि आपल्या हातात चहाचा कप येतो.
संपादकीय व्यासपीठ
काही महिन्यांपूर्वी भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) या संस्थेच्या अर्थबोध या मासिकाने मानवाचा मेंदू या विषयावर एक उत्कृष्ट विशेषांक काढला. अर्थशास्त्रासाठीच्या मासिकाने हा तसा दूरचा विषय घेतला, यावरून काही प्रश्न उभे राहतात.
मज्जाविज्ञान (neuroscience) या विषयाला स्वाभाविकपणे केंद्रस्थान देईल असे नियतकालिक मराठीत नाहीच का? मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक फक्त वृत्तपत्रे पूर्ण करतात ? विज्ञानाबद्दलचा हा प्रकार मानव्यशास्त्रे व कलाक्षेत्र यांच्यातही दिसतो. भाषेबाबत चर्चेसाठी भाषा आणि जीवन, तत्त्वज्ञानासाठी परामर्श, अर्थशास्त्रासाठी अर्थबोध, अशी थोडीशी विशिष्ट विषयांना वाहिलेली नियतकालिके आहेत.
संपादकीय
एखाद्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण वाचक म्हणून काही प्रतिक्रिया व्यक्त करतो म्हणजे नेमके काय करतो? काळाच्या एका विशिष्ट बिंदूशी अथवा पटाशी त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे जे नाते आहे ते समजावून तर घेत असतोच पण त्याहून महत्त्वाचे हे की आजच्या दर्शन तारतम्याने आपण त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करतो. आपल्या आजच्या विचारव्यूहाचा नवा अन्वयही लावण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. एकाप्रकारे आपल्या इतिहासाची निवड करीत असतो.
‘विभावरी शिरूरकर’ या नावाने लेखन करणाऱ्या बाळूताई खऱ्यांची जन्मशताब्दी साजरी करताना मालतीबाई बेडेकर हेही व्यक्तिमत्त्व अर्थातच आपल्यासमोर आहे. बाळूताई खरे ते मालतीबाई बेडेकर या प्रवासात लेखिकेने कथाकादंबऱ्यांच्या लेखनासाठी उमा (१९६६) या एका कादंबरीचा अपवाद वजा करता विभावरी शिरूरकर हे नाव वापरले आहे.
संपादकीय विशेषांकासंबंधी
येत्या काही महिन्यांत काही विशेषांक काढायचा प्रयत्न सुरू आहे. पाणी-जमीन-माणूस यांच्यातले परस्परसंबंध, भारतातील आरोग्यसेवा, कुशिक्षण, स्वयंसेवी संस्था, विविधांगी विषमता, असे अनेक विषय सुचत आहेत. काहींसाठी अतिथी संपादकही योजले गेले आहेत.
ज्येष्ठ साहित्य-समीक्षक म.वा. धोंड आपल्या जाळ्यातील चंद्र या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहितात, “एखादे पुस्तक वाचताना मला काही प्रश्न पडतात, काही उणिवा जाणवतात, काही दोष खटकतात. त्या दोषांचे निराकरण कसे करता येईल उणिवा कश्या भरून काढता येतील आणि प्रश्नांचा उलगडा कसा करता येईल, यांचा मी विचार करू लागतो आणि त्यात मन गुंतते. हा गुंता सहजी सुटत नाही.
संपादकीय
यान ब्रेमन व छायाचित्रकार पार्थिव शहा ह्यांचे पुस्तक Working in the Mills No More आता गिरण्यांमध्ये काम करीत नाही आम्ही. हे चित्रकाराने चिडून काळ्या रंगाचे दोन फराटे मारून आपल्या भावना व्यक्त कराव्या, तसे आहे. त्या प्रयत्नात कलाकृतीत रंग काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक असतो तर काही ठिकाणी अगदीच कमी असतो, तसेच ह्या (किंवा इतर कोणत्याही) पुस्तकाचे आहे. यान ब्रेमन व पार्थिव शहांनी ह्या पुस्तकात भारतीय भांडवलशाहीच्या एकूण कार्यकलापांपैकी कापड गिरणी उद्योगाचा कंठमणी असलेल्या अहमदाबाद शहरात गिरणी उद्योगांचा उदयास्त चित्रित केला आहे. त्यात मुख्य भर आहे तो समाजातल्या एका मोठ्या घटकाचे (मजुरांचे) निम्न पातळीवर का असेना,पण थोडे स्थिरावलेले जीवन कसे उद्ध्वस्त झाले ते सर्वांच्या समोर बोलक्या पद्धतीने मांडण्यावर.
संपादकीय
विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.
मोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते.
नागरीकरण: प्रक्रिया, समस्या आणि आव्हाने
गेल्या दशकात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात महानगरे, नगरे आणि वाढणारी नागरी लोकसंख्या यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नगरांबद्दल, (इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाबद्दल) सातत्याने लिहिले गेले. त्या निमित्ताने अनेक नगरांचे प्राचीन काळापासूनचे अस्तित्वही अभिमानाने शोधले गेले. परंतु अशा लिखाणामध्ये नागरीकरणाच्या, मानवांची नगरे निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे मात्र क्वचितच लक्ष वेधले गेले. नगरे का निर्माण होतात? कशी वाढतात? कशी टिकतात? कशी आणि कशामुळे हास पावतात? असा विचार सहसा केला जात नाही, किंवा केला गेला तरी अतिशय वरवरचे विश्लेषण केले जाते. नागरीकरण ही मानवाची मूलभूत प्रेरणा असावी का?
लेखक परिचय
सुलक्षणा महाजन: वास्तुविशारद, मुंबई व मिशिगन विद्यापीठात अध्ययन. नागरी, तांत्रिक व पर्यावरणशास्त्रीय नियोजनाच्या क्षेत्रात संशोधन. भाभा अणुविज्ञान केंद्र व अनेक मान्यवर कंपन्यांमधील सखोल अनुभवानंतर सध्या रचना संसदेच्या कला अकादमीत व ‘जे.जे.’ मध्ये अभ्यागत म्हणून अध्यापन. (ग्रंथ: जग बदललं व अर्थसृष्टी: भाव आणि स्वभाव, ग्रंथाली २००३, २००४) ८, संकेत अपार्टमेंट, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०
विद्याधर फाटक: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये १९७६ ते २००४ पर्यंत नगरनियोजक होते. त्याच काळात ते राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे व अन्य शासकीय समित्यांचे सदस्य होते. जागतिक बँकेने साहाय्य दिलेले मुंबई व तामिळनाडूतील नगरविकास प्रकल्प व मुंबई वाहतूक प्रकल्प यांसाठीही त्यांनी काम केलेले आहे.
संपादकीय
विज्ञान विशेषांकासाठी आलेल्या दोन लेखांचे उत्तरार्ध जागेअभावी या अंकात येत आहेत.
आजचा सुधारकचे स्नेही व सल्लागार डॉ. विश्वास कानडे यांचे नुकतेच निधन झाले. प्रा.प्र.ब. कुलकर्णीचा पुढील अंकातील लेख वाचकांना कानड्यांची ओळख करून देईल. कानड्यांनी आसुमधून विचारलेला प्रश्न, “प्राचीन भारतीय साहित्यात समाजरचनेबाबत काही चिंतन आढळते का?’ हा मात्र आजही अनुत्तरित आहे.
मोहन कडू व मधुसूदन मराठे या आमच्या लेखक-वाचक स्नेह्यांचेही नुकतेच निधन झाले. कडूंचे इट कांट हॅपन हिअरचे परीक्षण आम्हाला एक नवा, सक्षम लेखक मिळाल्याचा आनंद देत असतानाच अवघ्या 50 च्या वयात कडू वारले.