अंधश्रद्धांची मुळे कुठपर्यंत गेली आहेत याचा शोध घेऊन ती मुळापासून उखडून टाकली तरच अंधश्रद्धांचे खरे निर्मूलन होईल. ह्या मुळांचा शोध आपल्याला धर्मग्रंथांपर्यंत आणि धार्मिक संस्कृतीपर्यंत नेतो. या धार्मिक पायावरच घाव घालून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ सुरू करावी असा सल्ला शहाजोगपणे बरेचजण देतात. त्यांचे हे विश्लेषण बरोबर आहे. परंतु त्यांनी सुचविलेला उपाय अव्यवहारी आणि चळवळीची व्याप्ती मर्यादित करणारा आहे. इ.स.पू. १००० वर्षांच्या लोकायतवादापासनूच्या विवेकवादी चळवळींचा ज्ञात इतिहास बघता बुद्धिप्रामाण्यवादी चळवळी क्वचितच जनचळवळी झालेल्या दिसतात. ह्या वास्तवापासनू बोध घेणे आवश्यक ठरते.
धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक संस्कार हे त्या त्या काळाच्या ज्ञानाचे आणि अज्ञानाचे चिरेबंद, चिरंतन करून ठेवलेले अस्थीस्थिर (fossilized) स्वरूप असते असे स्वा.सावरकर