निरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.
विषय «विवेक विचार»
मन केले ग्वाही
‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे असे मानते. माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागू लागल्याने सृष्टीचे म्हणजे समग्र जीवसृष्टीचे काही वेगळे भले होईल की नाही असा विचार मी केलेला नाही. आपण मनुष्यवस्तीच्या परिप्रेक्ष्यातूनच विचार करत असतो.
धर्म आणि हिंसा
आज ‘धर्म’ ह्या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन…. हे शब्दोच्चारही मनात दहशत निर्माण करताहेत. धर्माच्या नावाखाली जगभर चाललेला उच्छाद केवळ उद्विग्न करणारा आहे.
घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला धर्मच जबाबदार ठरावा…. धर्माचं आपलं आकलन इतकं तोकडं असावं……. बिनदिक्कतपणे गलिच्छ राजकारणासाठी….. सत्ताप्राप्तीसाठी…. स्त्रीच्या उपभोगासाठी…. दलितांच्या खच्चीकरणासाठी तो वापरला जावा…. आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं! धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो का माणसाची? की धर्माची ढाल करत वेगळंच काही राजकारण जगभरात चालू आहे? ह्या सगळ्या विध्वंसामागे सत्तालालसेची प्रेरणा कार्यरत आहे का?
कोरोनानंतरचे जग – स्वैर अनुवाद – यशवंत मराठे
Original Article Link
https://amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75
Yuvan Harari is the author of ‘Sapiens’, ‘Homo Deus’ and ‘21 Lessons for the 21st Century’
मानवजात एका जागतिक संकटाला सामोरी जात आहे. कदाचित आपल्या हयातीतील हे सर्वात मोठे संकट असेल. येत्या काही आठवड्यांत लोकांनी आणि सरकारांनी घेतलेले निर्णय, पुढील काळात जगाला कलाटणी देणारे किंवा बदल घडवून आणणारे ठरतील. त्याचा प्रभाव केवळ आरोग्यव्यवस्थेवरच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती यांवरदेखील पडेल. त्यामुळे आपल्याला त्वरेने आणि निर्णायकरित्या पावले उचलली पाहिजेत. मात्र त्याचवेळी, आपल्या कृतींचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणामदेखील विचारांत घेणे आवश्यक आहे.
परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र – योगेश बादाड
कोरोना नावाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं जगातल्या बलाढ्य परमेश्वरांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. या जागतिक महामारीत जगातले सगळे देव लॉकडाऊन झाले. मुसक्या बांधून मंदिरात बसले. परमेश्वराच्या या नाकर्तेपणावर सडेतोड हल्ले झाले. होत आहेत. शिवसेनेचे खासदार तथा ‘सामना’चे संपादक मा.संजय राऊत यांचा ‘देव मैदान सोडून पळाले’ या शीर्षकाचा संपादकीय लेख नुकताच ‘सामना’मधून प्रकाशित झाला. तो बराच गाजला. त्या प्रखर बुद्धिवादी लेखानं प्रबोधनकार ठाकरेंच्या सडेतोड लेखनशैलीची आठवण महाराष्ट्राला करून दिलेली आहे. मा.संजय राऊतांनी सदर लेखात आजच्या जैविक महायुद्धाच्या आणि वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर परमेश्वराच्या कर्तृत्वशून्यतेवर घणाघाती प्रहार करून त्याचं अस्तित्वच पार खिळखिळं करून टाकलेलं आहे.
विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर
‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?(भाग १)
साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘चारचौघी‘ ह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्ये—विचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे. परंतु केवळ पुरुष जे जे करतो ते ते स्त्रीलाही करता आले पाहिजे ह्या एकाच विचाराच्या आहारी गेल्यामुळे येथे सर्वच प्रश्नांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहिले गेले आहे व ते सुद्धा एकांगी आणि आत्मकेन्द्रित दृष्टिकोणातून.
आत्मा हवा का?
वासांसि जीर्णानि यथा विहाय…….
हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.
या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत.
आटपाट नगर?
चेंबूर – ट्रॉंबेच्या वस्त्यांमधून प्रौढ साक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी 1989 पासून सहभागी आहे. ‘कोरोसाक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. ‘‘काम कसं चाललंय?”, ‘‘कसं वाटतं”?, ‘‘झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?’‘ अशा उत्सुक प्रश्र्नांबरोबर ‘‘सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’‘ ‘‘यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?”, ‘‘कसे राहतात ग हे लोक?”,
भारतीय चर्चापद्धती (भाग ५)
चरकसंहिता : वाद आणि वादपरिभाषा
चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या, परिभाषा
भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला.ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या लेखात करून दिला आहे.
चरकाचार्यांनी परिषदेचे स्वरूप सांगून नंतर प्रत्यक्ष चर्चा कशी करावी, यासाठी न्यायदर्शनातील ‘वाद’ संकल्पनेत काही बदल केले. त्यासाठी वादाची परिभाषा तयार केली. आयुर्वेदाचा संदर्भ वगळला तर ती आज किंवा कधीही इहवादी दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकेल इतकी लवचीक आहे.