आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)
देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का?