रॉबर्ट कोल्ज (Robert Coles) या हार्वर्डच्या मानसशास्त्रज्ञाचा विषय आहे ‘मुले’. त्याने या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, व त्यापैकी एका पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकही मिळाले आहे. त्याच्या मुलांची ‘नैतिक बुद्धिमत्ता’ (The Moral Intelligence of Children) या नव्या पुस्तकातील काही उतारे २० जाने. च्या ‘टाइम’ मासिकात उद्धृत केले आहेत. त्यातील काही कहाण्या –
(क) माझ्या नऊ वर्षांच्या मुलाला मी आणि माझ्या पत्नीने सुतारकामाच्या हत्यारांशी ‘खेळायला’ मना केले होते, तरी तो हत्यारांशी खेळला आणि त्याच्या हाताला जखम झाली. टाके पडणार यामुळे तर व्यथित होतोच, पण त्याने आम्ही घालून दिलेला नियमही मोडला होता.