विषय «विज्ञान»

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे

पुढे वाचा

अज्ञानाधारित अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) २०२१ पासून ज्योतिष विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) प्रारंभ करण्याचे घोषित केले आहे.

“आकाशातील ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो.” हे ज्योतिष विषयाचे पहिले गृहीतक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी जीवनावर ग्रहतार्‍यांचा कोणताही परिणाम होत नाही; असे निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. म्हणजे इग्नूच्या या अभ्यासक्रमासाठी कोणतेही सत्य गृहीतक नाही. म्हणून हा अज्ञानाधारित अभ्यासक्रम नकोच. अशी विज्ञानप्रेमींची मागणी आहे. 

फलज्योतिषाची भाकिते किती धादांत खोटी असतात याचे सत्यदर्शन घडविणारा लेख:…..

अष्टग्रही:-  फेब्रुवारी १९६२

तुम्ही जन्मकुंडली पाहिली असेल.

पुढे वाचा

फलज्योतिष : विश्वसनीय?

“जन्मवेळेच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या जीवनातील घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना कोणत्या” हे भविष्य वर्तवणे या पद्धतीला फलज्योतिष असे नाव आहे. या विषयावर जगभरात अनेक भाषांतून अगणित ग्रंथ निर्माण झालेले आहेत. स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारे अनेक जण या ग्रंथांचा उपयोग करून भविष्य वर्तवण्याचे काम करतात. काही हौशी, तर बहुतेक व्यावसायिक आणि जगातील असंख्य व्यक्ती त्यांचेकडून स्वतःचे भविष्य जाणून घेतात. त्यांचा विश्वास असतो की अशी भाकिते अनेकदा खरी ठरतात. पण खरोखर अशी भाकिते खरी ठरतात का हे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहणे जरूरीचे आहे.

पुढे वाचा

आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?

सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या उपचारपद्धतींत ॲलोपॅथी ही कालसुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ॲलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. ज्यांना ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देण आहे, अश्या बढाया मारू लागतात. पण खरी ‘अंदर की बात’ अशी असते की, ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ॲलोपॅथीवर खार खात असतात. मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते.

पुढे वाचा

रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते?

नुकताच १ जुलैला डॉक्टर्स डे होऊन गेला. महिन्याभरापूर्वी रामदेवबाबाने ॲलोपॅथी आणि डॉक्टर या दोहोंबद्दलही अनुद्गार काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला होता. नंतर जूनच्या मध्यावधीत “डॉक्टर तो भगवान के रूप होते हैं” असे म्हणत सारवासारव केली आणि आपणही लस घेणार असल्याचे सूतोवाच केले.

असो. मुद्दा तो नाही.

या चर्चांतून काही प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, पॅथी-पॅथींमधली (उपचारपद्धतींमधली) भांडणे ही आपल्या वृथा अभिमानाची आणि अज्ञानाची द्योतक आहेत हे शहाण्यासुरत्या लोकांना तरी का समजू नये? दुसरे म्हणजे, एखाद्या गोष्टीमागचे विज्ञान अजून आपल्याला पूर्ण समजले नसेल, किंवा अजून त्याचा शोध लागला नसेल तर विज्ञानालाच मोडीत काढणे योग्य आहे का?

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य काय असू शकते याचा विचार करताना आपल्याला चार गोष्टींचा विचार करावा लागतो: बुद्धी, प्रामाण्य, आस्तिक्य; आणि या तीनही गोष्टींना पायाभूत असणारी चौथी संकल्पना, म्हणजे ज्ञान.

यांपैकी आस्तिक्य आपण तात्पुरते बाजूला ठेवू आणि उरलेल्या तीन गोष्टींचा प्रथमतः अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. या तीन संकल्पनांचा परामर्श घेणारे शास्त्र म्हणजे ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणशास्त्र. याचा भारतीय दर्शनांच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ ते सर्व ज्ञान. आता यात ‘इंद्रिये’ आणि ‘समजणे’ हासुद्धा मानसप्रक्रियेचाच भाग झाला.

*१. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, स्वाद, गंध यांचा अनुभव देणारी पाच ज्ञानेंद्रिये.

पुढे वाचा

उत्क्रांती

‘आपण पृथ्वीवरचे सर्वात प्रगत आणि यशस्वी प्राणी आहोत’ असा माणसाचा समज असतो. निसर्गतः ज्या क्षमता माणसात नाहीत, त्या त्याने यंत्रे बनवून मिळवलेल्या आहेत. माणूस विमान बनवून उडू शकतो किंवा दुर्बिणीतून दूरवरचे बघू शकतो. त्यामुळे माणूस प्रगत आहे असे म्हणता येईल. पण प्रगत असला म्हणून माणूस पृथ्वीवरील सर्वात यशस्वी प्राणी ठरतो का? उत्क्रांतीमध्ये (evolution) जो जीव जास्तीत जास्त वर्षे टिकून राहतो, तो यशस्वी समजला जातो. या व्याख्येनुसार माणूस यशस्वी ठरेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर काय असेल याचा विचार करण्याआधी उत्क्रांती म्हणजे काय, ती कशी घडते आणि माणसाची उत्क्रांती कशी झाली हे समजून घेतले पाहिजे.

पुढे वाचा

जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१०मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.

जानेवारी २०१०मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा एंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे.

पुढे वाचा

दूध आणि वातावरणबदल

वातावरणबदलामुळे मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे याची आता सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे हवेतील कार्बन-डायऑक्साइड आणि मिथेन कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सरकारने यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत हे खरे आहे. पण व्यक्तिशः आपणही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण काय केले असता वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसचे प्रमाण व उत्सर्जन कमी होईल याचा विचार करू. 

गाई व म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. त्यांना चार जठरे असतात. त्यांपैकी दोन जठरांमध्ये त्यांनी खाल्लेल्या गवताचे व इतर पालापाचोळ्याचे जंतूंच्या साह्याने पचन केले जाते.

पुढे वाचा

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.