विषय «राजकारण»

धर्म, धर्मनिरपेक्षता, इ.

आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा