(अनुवाद: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) इ.स. 2014 हे वर्ष जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यस्मरणाचे पन्नासावे वर्ष आहे. योगायोग असा की यंदा 14 नोव्हेंबरला त्यांची 125 वी जयंती आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महान् व्यक्तींपैकी इतक्या प्रेमादराने ज्यांची अजूनही आठवण काढली जाते असे नेहरूंसारखे महापुरुष विरळाच!
अर्थात आपल्याला हेदेखील विसरून चालणार नाही की त्यांच्या प्रदीर्घ व उज्ज्वल राजकीय कारकीर्दीत त्यांना बहुसंख्य देशवासीयांचे अलोट प्रेम मिळाले असले तरी आज मात्र देशातील अनेकजण भारतातील बहुसंख्य समस्यांबद्दल नेहरूंनाच जबाबदार धरतात. आता तर त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले आहे.