मे २०१४ मधील सत्तांतरानंतर सार्वजनिक चर्चाविश्वात जोमाने सुरू झालेल्या सहिष्णुता-असहिष्णुता, पुरोगामी-प्रतिगामी या वादांच्या पार्श्वभूमीवर डाव्या ’लिबरल्स’चं परखड मूल्यमापन करणारा लेख.
——————————————————————————–
‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. त्यांनी स्वत:चे असे विचारविश्व तयार केले आहे व ते त्यांच्या दृष्टीने स्वयंघोषित सत्य असते.
विषय «राजकारण»
अनुभव- लाल सवाल
नक्षलवाद, विकास, हिंसा-अहिंसा
—————————————————————————-
छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव.
—————————————————————————-
हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारकं’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण– हे सगळं आपल्याला नवीन आहे.
असलेपण – नसलेपण
रा. स्व. संघ, डावा विचार, गांधी
——————————————————————————–
अलिकडे डावे-उजवे ह्यांच्यातील वैचारिक संघर्ष हातघाईवर आला आहे. अशा वेळी स्वतःला ‘डावा’ समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याने स्वतःशी व विरोधी विचारांशी संवाद करून आपली जडणघडण तसेच भारतीय समाजाची मानसिकता ह्यांचा शोध घेण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न––
——————————————————————————–
मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद असणारा नक्की कसा आहे? मी जे आग्रह धरतो ते आग्रह धरणं योग्य आहे का? ‘मला हे पटतं’ म्हणजे काय? ‘पटत नाही’ म्हणजे काय? मुळात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या ‘डेंजर’ प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे का?
सुरांचा धर्म (२)
भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मीयांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणाऱ्या, मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी भारतीय संगीताला नेमके काय योगदान दिले हे साधार नमूद करणाऱ्या करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध –
—————————————————————————–
इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. पुढे तो सूर्यपूजक झाला. फक्त वीस वर्षांचे असताना अकबराने रीवा संस्थानचे राजे रामचंद्रांच्या पदरी असलेल्या तानसेनाला मोगल-दरबारात आणले. तानसेनाला त्याने `कण्ठाभरणवाणीविलास’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला.
गांधी, मार्क्स, आंबेडकर: परस्परपूरकता शोधू या
गांधी, मार्क्स, आंबेडकर, परस्परपूरकता
—————————————————————————–
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखून आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे कसे आवश्यक आहे ह्याची अभिनिवेशहीन मांडणी
—————————————————————————–
गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय?
डावे पक्ष आणि जातीचा प्रश्न
डावे पक्ष, जात, डॉ. आंबेडकर
———————————————————————————-
गेल्या नव्वद वर्षांत अनेक ऐतिहासिक घोडचुका करून व त्यातून काही न शिकून भारतातील डाव्या पक्षांनी आपली वैचारिक दिवाळखोरी वारंवार सिद्ध केली आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेले कम्युनिस्ट आता अस्तित्वाच्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी भारतीय समाजव्यवस्थेतील ‘जात’ ह्या मूलभूत घटकाचा पुनर्विचार करण्याचा संकेत दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी दिला आहे. त्यांच्या ह्या समीक्षेची समीक्षा करणारा हा लेख.
—————————————————————————
इसवी सन २०१६ मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक ही भारतातील डाव्या पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
विवेकी विचारांची मुस्कटदाबी
पुरोगामी विचारांसाठी वाहिलेले दि न्यू रिपब्लिक हे अमेरिकन मासिक 1915 पासून प्रसिद्ध होत आहे. त्याच्या पहिल्या अंकात या प्रकारच्या मासिकाची समाजाला का गरज आहे याबद्दल संपादकाने या काळात आपल्याला सर्वनाशापासून वाचवण्याची, आपल्या दुःखावर फुंकर घलण्याची, आपल्याला संरक्षण देणारी शक्ती फक्त सुस्पष्ट विचारांना आहे असा उल्लेख केला होता. खरे पाहता यात अतिशयोक्ती नाही. काही जणांना स्पष्ट विचांराऐवजी भावनेला प्रतिसाद देणारे विचार आवडत असतील तर काहींना निर्मळ विचारांऐवजी पारंपरिक वा आज्ञासूचक विचार आवडत असतील. काही जण तर विचार करण्याऐवजी भावनेच्या आहारी जात कृती प्रवण होण्याच्या पावित्र्यात असतात.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…
महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे.
समानतेचे अवघड गणित
समता, समानता आणि समरसता या संज्ञा-संकल्पना वरवर समानार्थी वाटल्या तरी त्यातील आशय आणि अन्वयार्थ वेगवेगळे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (1779) लिबर्टी (स्वातंत्र्य), इक्वॅलीटी (समता) आणि फ्रॅटर्निटी (बंधुत्व) या घोषणा एक तत्त्व म्हणून जगाच्या प्रगत इतिहासात रूजत गेल्या. परंतु त्या प्रत्यक्षात आणणे व्यक्तीगत व सामाजिक जीवनात सोपे नाही. किंबहुना अनेकदा समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना तर परस्परविरोधात जातात. बंधुत्व हे तर किती कठीण आहे हे खुद्द फ्रान्समध्येच दिसून आले आहे. बंधुत्वाच्या मुल्यात सहिष्णुता, सहृदयता आणि आदरभावना अभिप्रेत आहेत. फ्रान्समध्ये कृष्णवर्णीयांना, इस्लाम धर्मीयांना आणि अन्य संस्कृती-समुदायांना कसे वागविले जाते हे पाहिले की फ्रान्सनेच ही मूल्ये टाकून दिली आहेत हे दिसून येते!
इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण
इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.