विषय «मनोगत»

मनोगत – आपले नंदाकाका

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे उर्फ नंदाकाका ह्यांचे, दि. 22 जुलै 2022 ला, दीर्घ आजारानंतर, पुण्यात निधन झाले.

मुळात स्थापत्यअभियंता असलेले नंदाकाका, सुरुवातीला ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात, आणि नंतर अनेक वर्षे ‘सुधारक’चे संपादक होते. 

ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता. इतिहासापासून जीवशास्त्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून भूगर्भशास्त्रापर्यंत सर्वच विषयांत त्यांना रस आणि गती होती. त्यांनी जशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली तशीच अनेक महत्त्वाची पुस्तके भाषांतरित करून मराठीत आणली. अनेकजणांना त्यांनी लिहिते केले. आणि स्वतः त्यांचेही लिखाण आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत अव्याहत सुरू होते.

नंदाकाकांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अगदी ‘सुधारक’चे संपादक असतानादेखील ते एक ठेकेदार माणूसच होते.

पुढे वाचा

मनोगत

इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसेच मुळात इतिहासाविषयीचा स्वीकार आला तरच बदलत्या सामाजिक मापदंडानुसार जे वाईट ते टाळण्याकडे आपोआपच आपला कल जाईल. यादृष्टीने ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकासाठी काही साहित्य यावे असे आवाहन आम्ही केले होते. या अंकातील लेखांमधून याविषयीचे विविध विचार वाचकांसमोर आम्हाला मांडता आले आहेत. या लेखांवर आणिक चर्चा व्हावी आणि यानिमित्ताने अनेक विवेकी विचारधारा सातत्याने समोर याव्या यासाठी सुधारक प्रयत्नरत आहेच. 

लेखांवरील संक्षिप्त प्रतिसाद वाचकांकडून वेळोवेळी येतातच. परंतु लेखाच्या प्रतिसादात अधिक विस्तृत आणि प्रतिवाद करणारे काही लेख आले तर विचारांची देवाणघेवाण अधिक प्रभावी होईल.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या एप्रिल अंकात शिक्षणक्षेत्रात अपेक्षित आमूलाग्र बदलांविषयी आणि त्या प्रयत्नात येत असणाऱ्या अडचणींविषयी लिहिताना अनेकांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाधारित विचार प्रगट केले. ह्या अनुभवांचे मूल्य कसे ठरवावे? कामे करत असताना होत असणारी निरीक्षणे, त्यात येणाऱ्या अडचणी आणि निघालेले/काढलेले मार्ग, एवढेच नव्हे तर, जे साधायचे आहे ते साधता येत नसल्याची तगमग समजून घेतली तर ह्या संस्थात्मक किंवा व्यक्तिगत प्रयत्नांना बळ पुरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे याविषयी शंकाच उरणार नाही.

समाजसुधारणेमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांचा, संस्थांचा जितका सहभाग, तितकाच विविध वैचारिक प्रवाहांचादेखील आहे.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’चा लेखकवर्ग आणि वाचकवर्ग यांचे प्रतिसाद सुधारकच्या टीमसाठी एकंदरीतच अतिशय उत्साहपूर्ण ठरत आहेत. ऑनलाईन स्वरूपात सुरू केला तेव्हा सुधारकचा आवाका विस्तारावा अशी इच्छा असली तर ते इतक्या अल्प वेळात साध्य होईल अशी कल्पना नव्हती. आज सुधारकच्या लेखांवर येणारे प्रतिसाद नवनव्या विषयांवर साधकबाधक चर्चा होत आहे याचेच द्योतक आहेत.

वैचारिक चर्चेमध्ये सर्वांत आवश्यक घटक असतो, तो प्रश्न उपस्थित करण्याचा असे आम्ही मानतो. सुधारकच्या लेखांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण तर होत आहेच; सोबतच वाचकांच्या मनात प्रश्न उपस्थित करण्यातही सुधारक यशस्वी ठरत आहे.

असे प्रश्न विचारांना चालना देतात. नवे

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी साहित्य मागवताना आपल्या समाजातील विषमतेवर आणि चढाओढ, स्वार्थ यांसारख्या मूलभूत स्वभाववैशिष्ट्यांवर लिहावे असे आम्ही सुचवले होते.

तदनुषंगाने श्रीधर सुरोशे यांचे बर्ट्रांड रसेल यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ या ग्रंथाचे परीक्षण उल्लेखनीय वाटते. त्यांच्या परीक्षणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अनुक्रमे ग्रंथपरिचय आणि ग्रंथसमीक्षा असा असून यात बर्ट्रांड रसेलांनी आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विविध संकल्पनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

या अंकात पुस्तक परीक्षणांना विशेष जागा देता आली याचा आनंद वाटतो. यानिमित्ताने वाचकांची अनेक नव्या व जुन्या उत्तम, वाचनीय अशा पुस्तकांशी ओळख होईल.

पुढे वाचा

मनोगत

कुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.

ज्योतिषाची गरज माणसाला का पडते? याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत.

पुढे वाचा

मनोगत

सुधारकचा अंक प्रकाशित करण्याच्या टप्प्यात असतानाच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ज्योतिषावर एक स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे जाहीर केले. हे एक अ-शास्त्रीय पाऊल आहे असे आम्हांला वाटते.

२००१ साली मुरलीमनोहर जोशी यांनी वाजपेयींचे सरकार असताना UGC मार्फत असाच एक अभ्यासक्रम विज्ञानशाखेत सुरू करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला होता आणि तो अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच बंद करण्यात आला. काही वर्षांनी मात्र असे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले – ग्वाल्हेर, दिल्ली, रामटेक, बनारस वगैरे. नुकताच जाहीर केलेला हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्यामुळे आता अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. IGNOU ने जरी तो कलाविभागात घातला असला तरी अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे. 

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’चा एप्रिल अंक माध्यमस्वातंत्र्याविषयी असणार असे आवाहन केले तेव्हा ओघानेच आपल्याकडील लोकशाहीवर जे अनेक प्रश्न सतत उभे राहतात, ते पुढे येणार हे निश्चित झाले होते. सदर अंकासाठी अनेकांनी त्या विषयावर आपले साहित्य पाठवले. ते आपण ह्या अंकात समाविष्ट केले आहे.
या अंकात दोन चित्रकारांचेदेखील योगदान आहे. व्यंगचित्रे ही तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी एक अद्भुत कला आहे. प्रभाकर पाचपुते ह्यांच्या व्यंगचित्रांतून दोन दशकांपूर्वीची सामाजिक स्थिती लक्षात येऊ शकेल. तर मिलिंद क्षीरसागर ह्यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे अचूक वर्णन आपल्या चित्रांमध्ये केले आहे.

पुढे वाचा

मनोगत

जानेवारी २०२१ च्या ह्या अंकाबरोबर ‘आजचा सुधारक’ने आपल्या नव्या स्वरूपातील दोन वर्षे पूर्ण केली आहेत. ‘आजचा सुधारक’च्या सर्व वाचकांना आणि शुभचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

जानेवारीचा शेतीविषयक अंक विशेषतः नव्याने घोषित केलेल्या तीन कायद्यांविषयी आणि त्याविरोधात शेतकर्‍यांनी उभारलेल्या आंदोलनाविषयी आहे. कोणताही कायदा बनवताना त्याचा थेट परिणाम ज्यांच्यावर होणार त्या समुहाला विश्वासात घेणे हे सुदृढ सहभागी लोकशाहीचे लक्षण असते. सद्य सरकार तेथे कमी पडले आणि त्यामुळे जनमानसात नवीन कायद्यांविषयी शंका निर्माण झाल्या.

‘आजचा सुधारक’च्या शेतीविषयक अंकासाठी आवाहन करताना शेती हा ‘सतत’ लाभ देणारा व्यवसाय नाही असे विधान आम्ही केले होते.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, विचारचक्र सुरू राहते. अंकाचा मूळ विषय जरी नास्तिकेशी जोडलेला असला तरी त्या अनुषंगाने काही इतर आजूबाजूचे विषय आणि काही वेगळ्या बाजूच्या मतांनासुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे.

पुढे वाचा