विषय «पुस्तक परीक्षण»

पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध

या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे स्थान, मानवी जीवनाचे प्रयोजन हे नेहमीच अध्यात्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांचे चिंतनाचे विषय राहिले आहेत. श्री. श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेल्या “वैश्विक जीवनाचा अर्थ ” या छोट्या पुस्तकातून अशाच प्रश्नांचा इहवादी दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०

मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात.

पुढे वाचा

पुस्तकपरीक्षण -‘सत्या’पेक्षा अधिक ‘विपर्यासां’चाच ऊहापोह।

सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथराजाने चार वर्षांपूर्वी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीसोबतच ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ नामक त्यांचा दुसरा बृहद्ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय

सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .

पुढे वाचा

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय: भारतीय स्त्रीजीवन- ले. गीता साने (मौज प्रकाशन मुंबई)
गीता सान्यांचे ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले असले आणि गेल्यावर्षी त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असला तरी त्याच्याकडे अजून मराठीतील क्रियाशील आणि चोखंदळ वाचकांचे वाचकाचे म्हणावे तसे लक्ष गेले आहे असे वाटत नाही. कारण त्यात कथन केलेले अनुभव इतके दाहक आणि विचार इतके विद्रोही आहेत की त्याने हा वाचकवर्ग कळवळून उठला तरी असता किंवा खवळून विरोधी गञ्जना तरी करू लागला असता. परंतु गेल्या पाच वर्षात या पुस्तकाच्या अनुषंगाने असली आवाहने किंवा साद-पडसाद कानावर आले नाहीत एवढे मात्र खरे.

पुढे वाचा

सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे आहेत का? कादंबरी हे एक कल्पित विश्व असते. पात्रे, प्रसंग, घटना यांनी घडलेले, स्वयंपूर्ण असे कल्पित जग. ही कादंबरी वाचताना असे वाटते की हे कल्पित जग नाही.

पुढे वाचा

‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.

बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला.

पुढे वाचा

इच्छामरणी व्हा

पुस्तकपरामर्श

(१) सन्मानाने मरण्याचा हक्क (२) जगायचे की मरायचे?
[दोन्हीचे लेखक: विनायक राजाराम लिमये, प्रकाशक (१) स.म. ह. चे स्वतः लेखक, (२) चे उन्मेष प्रकाशन, २६ पर्वत, पुणे ४११००९]
आपले आयुर्मान वाढले आहे तसे आरोग्यमानही. परंतु मृत्यू अटळ आहे. कृतांताची ध्वजा दिसू लागल्यापासून त्याचे भेसूर दर्शन होईपर्यंत अशी स्थिती येते की, त्या स्थितीत जिवंत राहण्यापेक्षा मरणे हेच बरे असे वाटू लागते. अशांना ‘तुमचे उत्तरायण सुरू झाले आहे आणि तुम्हीही इच्छामरणी आहात’ असा संदेश देणारी दोन पुस्तके आमच्याकडे अभिप्रायार्थ आली आहेत.

सन्मानाने मरण्याचा हक्क (स.म.

पुढे वाचा