विषय «आरोग्य»

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे.

पुढे वाचा

आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन

आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे.

पुढे वाचा

भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

“निरोगी मानसिकता” म्हणजे काय ? निरोगी मानसिकता म्हणजे नेमके काय व आपल्या भारतीय विचारसरणीचा त्यावर काय प्रभाव पडतो हे सर्वप्रथम आपण समजायचा प्रयत्न करू या.

मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार निरोगी मानसिकतेचे खालीलप्रमाणे दहा पैलू आहेत.

पुढे वाचा

नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे !

जागतिकीकरणाबरोबर माणूस बदलतो आहे. नातेसंबंध बदलत आहेत. माणूस जास्त आत्मकेंद्री होतो आहे. हिशोबी होतो आहे. पैसा खूप मिळतोय पण त्याचबरोबर वेळेचा बळी – सामाजिकीकरणाचा बळी व माणुसकीचाही बळी जातो आहे. कामाचे तास वाटेल तसे वाढताहेत. आरामाला वेळ नाही. खुल्या बाजारपद्धतीमुळे वाढती स्पर्धा, विदेशी उत्पादनाची आयात, यामुळे वाढती महागाई होणार. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढते आहे. मुलांना लहान वयात जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागते आहे. त्यामुळे ताण वाढताहेत. त्याचबरोबर निराशाही वाढते आहे. आत्मकेंद्री विचार करण्याची पद्धत, वाढत्या गरजा, छानछोकी-मौजमजा यांच्याशी संबंधित. यातून ताण-तणाव वाढायलाच मदत होते.

पुढे वाचा

नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा

पाच ठळक गोष्टी नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा काय स्वरूप धारण करील हे ठरवतील.

पहिली असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण ज्याचा पुरेसा ऊहापोह शिक्षणावरच्या लेखात झाला आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण जरी घटत चालले असले तरी त्यांचे प्रमाण एकूण वैद्यक व्यवसायामध्ये अगदी कमी होईल हे शक्य नाही. त्यामुळे सांसर्गिक व असांसर्गिक रोग्यांचा दुहेरी भार आपल्याला वाहावा लागणार आहे.

दुसरी ठळक बाब म्हणजे विमायोजनांचे आरोग्यसेवेत पदार्पण. तिसरी बाब वैद्यकीय पर्यटन (medical tourism) व चौथी पेटंट्स् आणि औषधे. विमा प्रभागात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देता देता, सरकारने सार्वत्रिक आरोग्यविमा योजना आखल्या आहेत.

पुढे वाचा

पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ

(‘कोणत्याही लाभासाठी सत्याचा सोईस्कर भागच पुढे ठेवणे म्हणजे स्वतःला फसवणे. हे टाळायचे असेल तर तुम्ही ज्या गृहीतांवर आधारित प्रयोग करता, ती गृहीतेही तपासून पहायला हवीत,’ रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञाचे हे मत. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमातील गृहीतकांची ही तपासणी)

पोलिओ आजार पूर्णपणे, कायमचा उखडून टाकायचा यासाठी पोलिओ-निर्मूलन कार्यक्रम सरकारने गेली १० वर्षे हातात घेतला आहे.

इ.स. २००० पर्यंत पोलिओ निर्मूलन होईल असे आधी जाहीर करण्यात आले होते. सरकारची सर्व आरोग्य-सेवा यंत्रणा या पोलिओ-लसीकरणाच्या कार्यक्रमाला जुंपली गेली. पण पोलिओच्या केसेस होतच गेल्या व ‘पोलिओ-निर्मूलना’साठीची ‘डेड लाइन’ दरवर्षी पुढे ढकलण्यात आली.

पुढे वाचा

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा