संपादक, आजचा सुधारक यांस.
आपण गीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधारितच होते असे प्रतिपादन ‘आजचा सुधारक मधील विवेकवाद या लेखमालेतून केले आहे. (अशाच प्रकारचे प्रतिपादन मीही माझ्या ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाच्या भूमिकेत १९८३ मध्ये केले होते.) आपल्या या प्रतिपादनावर ‘आजचा सुधारक’च्या ताज्या अंकात सुधाकर देशपांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. तथापि आपलीच भूमिका मला का पटते यासाठी समर्थनाचे काही मुद्दे देत आहे.
(१) गुणकर्मविभागश: मी चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण केली आहे असे सांगताना स्वतःला ईश्वर म्हणविणाऱ्या श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे कर्तृत्व स्वतःकडे घेतले आहे. गुणानुसारच माणसांचे कर्म ठरवायचे असेल तर त्यासाठी अशा “ईश्वरनिर्मित व्यवस्थेची गरज नव्हती. माणसांना बुद्धिनिष्ठपणे अशी व्यवस्था स्वीकारणे शक्य होते व राजरोस व्यवसायसंकर ही समाजमान्य बाब ठरविणेही शक्य होते. पण चातुर्वर्ण्य मी निर्माण केले आहे असे सांगताना कोणतीही अशी बुद्धिनिष्ठ च्यवस्था अभिनेत नसावी, तर जिच्या समर्थनार्थ ईश्वरावर किंवा ‘ईश्वरनिर्मित शास्त्रावर विसंबून रहावे लागेल अशीच व्यवस्था अभिप्रेत असावी हे जास्त सुसंगत वाटते. ही ‘ईश्वरनिर्मित’, शास्त्रमान्य, परंपरागत चातुर्वर्ण्यव्यवस्था जर जन्माधारित नव्हती, तर जन्मनिरपेक्षपणे गुणावगुण पारखून वर्णनिश्चिती करण्याची काही यंत्रणा त्यात अंतर्भूत असायला हवी होती. पण तसा पुरावा गीतेत तरी नाही. आणि परंपरामान्य चातुर्वण्याला छेद देणारी एक वेगळीच यंत्रणा कृष्णाला राबवायची होती यालाही काही पुरावा नाही,
(२) मग ‘गुणकर्मविभागशः चा अर्थ कसा लागतो? तर तो असा. माणूस एखाद्या वर्गात जन्म घेतो, तोच त्याच्याकडे त्या त्या वर्गाला योग्य गुण (म्हणजे सत्त्व, रज, तम या गुणांचे मिश्रण) असल्यामुळे आणि ही व्यवस्था कृष्णाच्या मते ईश्वरनिर्मित होती. ही व्यवस्था ईश्वरनिर्मित असल्यानेच माणसाने वर्णानुसार त्याचा जो स्वधर्म ठरतो त्याचे आचरण केले पाहिजे हे ओघाने येत होते. तेव्हा गुण व कर्म यांप्रमाणे माणसांची चार वर्णामध्ये विभागणी (जन्मतःच) होते व ही व्यवस्था ‘मी निर्माण केली आहे असा ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ या ओळीचा अर्थ लागतो.
गंमत म्हणजे गांधोजी सदी सदा गीतावचनातून जन्मतः असाचा अर्थ काढला आणि तरीही वर्णष्मांचे समर्थन केले.
(पहा. गांधीजिवारदर्शन : खंड १५. गोपी वाङ्मय प्रकाशन समिति, पुणे, प्रथमावृत्ती १२६३, पृ. ३६)
(३) ‘जन्मतः प्राप्त होणारे (सहज) कर्म हे सदोष की निदोष याची चिकित्सा न करता, ते सदोष असले तरी, टाकू नये. तशी सर्वच कर्मे सदोष असतातच अशाही आशयाचा पुढील श्लोक गीतेत आहे:
सहज कर्म कौन्तेय सदोषमापि न त्यजेत्। सवारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।। (गीता १८-४८)
गीतेवरील प्राचीन टीकाकारांनी कृष्णाला चातुर्वर्ण्य जन्माधारित म्हणूनच अभिप्रेत असल्याचे रास्तपणे गृहीत धरले होते. ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टम्…..’ या गीतावचनाचा काळानुसार वेगळा अर्थ लावून गीता अधिक प्रस्तुत ठरविण्याचे प्रयत्न अलिकडचे आहेत. सुधाकर देशपांडे यांचे ज्ञानेश्वरांविषयीचे प्रतिपादन बरोबर असेल तर ज्ञानेश्वर हे कदाचित अशा प्रकारचे पहिले आधुनिक भाष्यकार ठरतील!
तत्त्वज्ञान विभाग,
प्रदीप प्र. गोखले
पुणे विद्यापीठ