सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक दुसरा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सेक्युलर समाजनिर्मितीचे ध्येय स्वीकारले हे योग्यच झाले. भारतासारख्या बहुधर्मीय नागरिक असलेल्या देशात सेक्युलर मूल्यांवर आधारित शासनव्यवस्थाच यशस्वी होऊ शकते. परंतु त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करून एकगठ्ठा मते मिळविण्याचा मोह आवरला पाहिजे आणि धार्मिक गढांचा अनुनय थांबविला पाहिजे. शासनाने अगदी निःपक्षपातीपणाने सेक्युलॅरिझमच्या मूलतत्त्वांची, तसेच भारतीय घटनेने स्वीकारलेल्या धर्मजातिनिरपेक्ष समान नागरिकत्वाची कठोर अंमलबजावणी करण्याचे धैर्य दाखविले पाहिजे. राजकीय स्वार्थापोटी कोणताही सेक्युलर पक्ष हे धैर्य दाखविण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात हिंदू आणि मुस्लिक या प्रमुख धार्मिक जमातींमध्ये जे संघर्षाचे वातावरण होते ते आजही आहे. याचे कारण सेक्युलॅरिझमला कडवा धार्मिक विरोध करून आपली अलगता जपणाऱ्या अल्पसंख्य समाजाचा, सर्व प्रमुख सेक्युलर पक्षांनी चालविलेला अनुनय. (तुष्टीकरण-अपीजमेंट) आणि याची प्रतिक्रिया म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी हिंदू समाजातील सामान्य जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करून तिच्या ठिकाणी धर्माध कडवेपणा निर्माण करण्याचा चालविलेला प्रत्युत्तरात्मक प्रयत्न यांत शोधावे लागेल, यावर सेक्युलर तत्त्वांची निःपक्षपाती आणि कठोर अंमलबजावणी हाच एकमेव इलाज आहे. पण केवळ कायद्याने सेक्युलर मनोवृत्ती निर्माण होऊ शकणार नाही. यासाठी प्रबोधन, वैचारिक जागृती, सनातन समाजमनाचे आधुनिकीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती आणि त्याचबरोबर भारतीय पटनेने स्वीकारलेल्या सेक्युलर मूल्यांची दोन्ही समाजांत अमलबजावणी करण्याच्या मागनि जावे लागेल. समान शासन, सेक्युलर पक्ष आणि विचारवंत या दृष्टीने काहीही करीत नाहीत. उलट कट्टर धर्माध मुल्ला मौलवींच्या व जातीय नेत्यांच्या अलगतावादी (separatist) धोरणाकडे, आचारविचारांकडे, विशिष्ट नियतकालिकांतून (दावत, रडिअन्स) होणाऱ्या जातीय प्रचाराकडे डोळेझाक करून ऊठबस फक्त हिंदूंना झोडपून काढण्याचे ऐतिहासिक कर्तव्य (हिस्टॉरिक रोल) अगदी धर्मनिष्ठेने पार पाडीत असतात.

डावे पक्ष आणि विचारवंत या बाबतीत आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांच्या प्रचाराकडे पाहिले म्हणजे असे वाटते की देशाचे विभाजनदेखील जणू काही हिंदूंनीच घडवून आणिले. याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटू लागली आहे. गेल्या काही वर्षांत हिंदू समाजात वाढत असलेली आक्रमक घमापता (फैटिसिझम) ही धर्मान्ध मुस्लिम नेते आणि सारे सेक्युलर पक्ष यांच्या घोकादायक वर्तनाची प्रतिक्रिया आहे. हमीद दलवाई यांच्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की : “….हिंदू जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला. मुस्लिम जातीयवाद नष्ट करा आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदू जातीयवादी आदळणार नाहीत.” (मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय) सेक्युलर व डावे पक्ष ही वस्तुस्थिती ध्यानातच घेत नाहीत. याचा परिणाम असा होऊ लागला आहे की हिंदुसमाज विशेषतः त्यातील तरुण वर्ग-दिवसेंदिवस सेक्युलर विचारांपासून दूर जात आहे. बहुसंख्य हिंदू समाज धमाय, माथेफिरू होणे हा लोकशाही, समाजवाद, वैज्ञानिक प्रवृत्ती यांच्या दृष्टीने मोठा धोका आहे. भारतात हिंदू हे बहुसंख्य असले तरी हिंदू धर्मावर आधारित हिंदुशासनाची (हिंदू थिमोक्रेटिक स्टेट) मागणी हिंदू समाज करीत नाही, आणि ती मागणी आजच्या लोकशाहीच्या, समतेच्या युगात हिंदू समाजातील सर्व घटकांना मान्य होणारही नाही. हिंदू समाज जन्मसिद्ध जातिव्यवस्थेवर उभारलेला आहे. विशिष्ट वर्णात अगर जातीत जन्माला येणे हे सनातन धमनि कर्मविपाक सिद्धांतानुसार गतजन्मीच्या कर्माचर अवलंबून ठेवले असल्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समानता निर्माण करणे कर्मविपाक सिद्धांताचा त्याग केल्याशिवाय शक्य नाही.

धर्मनिरपेक्ष समान नागरिकत्वावर आधारित लोकशाही प्रस्थापित करणे हिंदु-धर्माधिष्ठित शासनाला शक्य नाही. मन्वादिस्मृतिकारांनी घालून दिलेल्या कायद्याप्रमाणे शासनयंत्रणा चालविणे आजच्या समतावादी युगाशी विसंगत आहे. अगदी कट्टर हिंदुत्ववादीदेखील असे हिंदुराज्य मागत नाहीत. जे हिंदुत्ववादी हिदुराष्ट्रवादाची संकल्पना मांडतात, त्यांच्या दृष्टीने हिंदू हा शब्द धर्मवाचक नाही, प्रदेशवाचक माहे. तरीही गेली अनेक शतके हिंदू हा शब्द हिंदू धर्माशी एकरूप झालेला असल्याने अन्यधर्मीयांच्या दृष्टीने हिंदूराष्ट्रवादाचा आग्रह धरणे योग्य होणार नाही. हिंदी राष्ट्रवाद अथवा भारतीय राष्ट्रवाद (इंडियन नॅशनलिझम) हीच संकल्पना विनासंघर्ष सर्वमान्य होणारी आहे. (अर्थात बॅ. जीना ‘भारतीय समाज नावाचा समान गुणविशेषांनी युक्त असा मानवगट (species) या उपखंडात असल्याचे मान्यच करीत नाहीत हे वेगळे. येथे हिंदू आहेत, मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत… पण ‘भारतीय’ नावाची ‘स्पेसीज असल्याचे आपल्या ऐकण्यात नाही असे उत्तर ते मांधींना व नेहरूंना देतात. जिनांचे हे विधान उद्धृत करून नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेचर उगारतात, : “Four thousand years of history evaporated in a sentence). अनेक धर्माचा अनुयायी असणारा भारतीय समाज ही संकल्पना जिनांना मान्य नसली तरी आपण ती मान्य करू. यातूनच भारतीय अथवा हिंदी राष्ट्रवाद काही अपवाद वगळता सर्वमान्य होऊ शकतो. ही राष्ट्रवादाची संकल्पना भारतीय जीवनपद्धती, Indian way of life, Indianness यावर आधारित आहे. या जीवनपद्धतीचा भारतीय संस्कृतीचा ठसा भारतीय समाजमनावर उमटणे आगदी स्वाभाविक आहे. प्रामाणिक राष्ट्रवादी मुस्लिम नेतेही हे मोकळ्या मनाने मान्य करतात. काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे (१९१०) अध्यक्ष सय्यद हसन इमाम, साहिबजादा, आफताब अहमद खान, एम. ए. एन्. हैदरी यांच्यासारख्या थोर मुस्लिम नेत्यांनी सेक्युलर भारतीय राष्ट्रवादाविषयी मौलिक विचार व्यक्त केले आहेतः “….every Indian must be Indian first and every-thing afterwards…. “(स.ह. इमाम.)”…The real test of Muslim’s sincerity lies in his making India the centre of all his worldly interests and aspirations, and in his exclusive devotion and loyalty to the cause of the inotherland, which, in effect means cooperation with and support of the Hindu majority in all that is Essential for the alkainment of India’s highest ideal.”(सा.अ. अहमद खान). हैदरींनी तर अतिशय स्पष्ट शब्दात हिंदी राष्ट्रवादाची संकल्पना मांडली आहे. “भारतीय मुसलमान जर अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या मोठेपणाने प्रभावित होणार नाहीत, अजंठा आणि वेरूळ येथील चित्र आणि शिल्प कलांच्या सौंदर्याने आनंदित होणार नाहीत, अथवा त्यांचा त्यांना अभिमान वाटणार नाही: जयदेव आणि तुकाराम यांच्या दिव्य काव्यातून त्यांना प्रेरणा घेता येणार नाही, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांच्या सखोल विचारातून त्यांना जीवनरस मिळणार नाही, तर ही घटना दुर्दैवी म्हणावी लागेल. ही दुर्दैवी घटना म्हणजे हिंदी राष्ट्रवादाचा मृत्यूच होय. “भारताच्या फाळणीने हैदरांची ही भीती खरी ठरली. हैदरींचे हे विचार मुस्लिम धर्माच्या विरोधात नाहीत, भारताच्या संमिन्न संस्कृतीचा (कांपोझिट कल्चर) सेक्युलर पातळीवरून गौरव करणारे आहेत. इस्लामी संस्कृतीने या संमिश्र संस्कृतीत जी भर घातली तिचे मोठेपण पुढील भागात हैदरी सांगतात.

अतिप्राचीन काळापासून हिंदू समाज सर्वसमावेशक, सहिष्णू वृत्तीचाच राहिला आहे. सेक्युलरिझमच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे. भारतीय इतिहासात धर्मस्वातंत्र्याची कल्पना सर्वमान्य झालेली असल्याने राजसत्तेने नागरिकांवर विशिष्ट धर्माची सक्ती करणारी घटना येथे क्वचितच आढळेल. या उलट अनेक राजे निरनिराळ्या धर्माना आश्रय देताना आढळतात. वैदिक, बौद्ध, जैन यांच्यामध्ये अतिशय उग्र असे तात्त्विक संघर्ष झाले; परंतु अन्य धर्मीयांचा छळ करण्याची अगर आपला धर्म लादण्याची इस्लामिक आणि ख्रिश्चन परंपरा येथील प्राचीन इतिहासात कोठेही आढळणार नाही. हिंदू समाजाच्या रक्तातच धार्मिक असहिष्णुता नाही. वैदिक धर्म कधीच संघटित नव्हता. या धर्मात अनेक पंथ, अनेक देवता, भिन्न उपासनापद्धती असल्याने त्यांची मध्यवर्ती संघटना होणे शक्यच नव्हते. संघटित चर्चचे अथवा इस्लामचे स्वरूप त्याला आले नाही. राजसत्ता (क्षन्निय) आणि धर्मसत्ता (ब्राह्मण) यांची कार्यक्षेत्रे धनिच ठरवून दिली असल्याने राजसत्ता व धर्मसत्ता एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित होण्याची घटना येथे घडली नाही, तसेच युरोपातील चर्च विरुद्ध शासनसंस्था असा संघर्षही येथे झाला नाही. सर्वच स्मृती ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याच दृष्टिकोनातून तयार झालेल्या असल्याने संघर्षाचा प्रसंगच आला नाही. शिवाय धर्मप्रतिनिधींनी राजसत्तेच्या माध्यमातूनच स्मृतिगंधातील शासनव्यवस्था अंमलात आणिली, कौटिल्याने अर्थशास्त्रांत धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची पूर्ण फारकत केली. भारतात सेक्युलरिझम स्वीकरणीय होण्याच्या दृष्टीने वरील सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी जन्मजात वर्णजातिव्यवस्थेमुळे समान नागरिकत्वाची कल्पना येथे मूळ धरू शकली नाही. वर्णजातिव्यवस्था ही मानवनिर्मित सामाजिक-आर्थिक व्यवस्था आहे. या व्यवस्थेला दैवी अधिष्ठान दिले गेल्याने (चातुर्वण्र्याची उत्पत्ती विराट पुरुषापासून झाल्याचे ऋग्वेद व भगवद्गीता या ग्रंथात सांगितले आहे) भारतीय शासनव्यवस्था पूर्णपणे सेक्युलर केव्हाच होऊ शकली नाही. असे असले तरी प्राचीन भारतात धार्मिक सहिष्णुता नांदत होती हे सत्य मान्यच करावे लागते. मुसलमानी राजवटीमध्ये धार्मिक सहिष्णुतेचा पूर्ण लोप झाला. शहाजहान आणि औरंगजेब यांच्या काळात धार्मिक असहिष्णुता अगदी कळसाला पोचली. केवळ हिंदूच नव्हे तर शिया, अहमदिया यांचाही छळ करण्यात येत असे याचे मूळ इस्लामच्या धर्मसंकल्पनेतच आहे असे म्हणण्यास बराच आधार आहे. अर्थात या बाबतीत मतभेद आहेत. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की इस्लामिक धर्मश्रद्धेनुसार माणसाचे संपूर्ण ऐहिक जीवन पारलौकिक शक्तीकडून म्हणजे अल्लाकडून नियंत्रित केले जाते.

इस्लामिक कायदा प्रेषिताच्या तोंडून प्रगट झालेल्या ईश्वरी आदेशानुसार रचला गेला आहे. त्यामुळे या धर्मात कालमानानुसार परिवर्तन होऊ शकत नाही. जगामधील सर्व धर्मात परिपूर्ण आणि म्हणून अपरिवर्तनीय असा हा एकच धर्म आहे. इस्लामपूर्वीचे प्रेषित अल्लानेच या जगात पाठविले होते. ते प्रेषित प्रारंभी अल्लाने दिलेला शुद्ध धर्म म्हणजे इस्लामच मानवाला शिकचीत होते पण पुढे तो शुद्ध धर्म विसरला गेला अथवा भ्रष्ट झाला; म्हणून अल्लाने शेवटचा प्रेषित (महमंद पैगंबर) पाठविला. पवित्र कुराण या ग्रंथामध्ये प्रेषिताने सांगितला तेवढाच खरा धर्म. हा धर्म पाळणारे तेवढेच सड (आस्तिक); बाकीचे सर्व, मग ते कोणताही धर्म पाळत असोत- काफर म्हणजे नास्तिक होत.

काफरांना स्वर्गप्राप्ती नाही, (नेहरूंच्या मुत्युसमयी काही रस्ता चुकलेल्या – काँग्रेसवासी उलेमांनी अंत्यविधीच्या प्रसंगी कुराण-पठण केले. सनातन धर्मपंडितांनी त्यांची ही कृती (कुराणपठण) इस्लामविरोधी असल्याचे म्हटले. नेहरू हे हिंदु, त्यात अज्ञेयवादी म्हणजे पक्के डबल नास्तिक (काफर); त्यांना स्वर्गात प्रवेश अशक्य. नेहरूंच्या आत्म्याची जर एवढी काळजी होती तर जिवंतपणीच त्यांना कुराणाची दीक्षा द्यायला हवी होती, असे त्या शुद्ध धार्मिक उलेमांचे म्हणणे होते. याचा अर्थ अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. इस्लामचा स्वीकार केलेल्या व्यक्तीलाच फक्त स्वर्गाचा अधिकार आहे अशी मुस्लिम धर्मशास्त्राची कल्पना आहे. इस्लामिक कायदा अल्लाने प्रेषिताच्या माध्यमातून पाठविलेला असल्याने तो परिपूर्ण आहे. पण येथे इस्लामी राज्य आल्याशिवाय हा परिपूर्ण ईश्वरी कायदा व्यवहारात उतरणे शक्य नाही. म्हणून ज्या भूभागावर मुस्लिम सत्ता नाही तेथे सत्ता काबीज करणे हेच मुसलमानांचे धर्मकर्तव्य आहे (हुकूमत-ए-इलाहिया). त्यासाठी जिहादही आवश्यक असे मौ. सद्भुद्दिन सांगतात, काफरांना जगण्याचाही हक्क नाही, फक्त ज्यू आणि ख्रिश्चन यांना जिझिया कर देऊन जिवंत राहता येईल. कुराणात याला आधार आहे की नाही याबद्दल मतभेद आहे. कदाचित आधार नसेलही असेच मला वाढते. पण मग ही सर्व मते हजार बाराशे वर्षे अत्यंत धर्मनिष्ठ मंडळीकडून सतत सांगितली जातात हे कशाच्या आधारावर याचे उत्तर मिळत नाही.

दहाव्या शतकात नुरुद्दीन मुबारकने अल्तमश बादशहाकडे काफरांची विल्हेवाट लावण्याची मागणी केली (इस्लामचा स्वीकार अथवा मृत्युदंड). दहाव्या शतकातला इतिहास खोटा आहे असे अनेक मुस्लिम नेत्यांप्रमाणे आपपाही क्षणभराच) मान्य करू. पाकिस्तान तर ४५ वर्षांचेही अद्यापि झालेले नाही. अहमदिया ही जमात मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे मुस्लिम नसल्याने काफारच ठरते. पाकिस्तानात त्यांची सर्रास कत्तल करण्याचा प्रयत्न १९५३ मध्ये झाला. हा इतिहास तर कल्पित नाही ना? माझनीचा महमद स्वतःला गौरवाने मुर्तिभंजक म्हणवून घेतो. अनेक बादशहा आपण इतकी मंदिरे नष्ट केली आणि इतक्या काफरांचा शिरच्छेद केला ही आपण धर्मकृत्ये केल्याचे अभिमानाने सांगतात. या सर्वमतांना पवित्र कुराणात आधार असो वा नसो, इस्लामचा जगभरचा १२०० वर्षांचा इतिहास अशाच कृत्यांनी भरलेला आहे. ही सर्व माहिती सेक्युलॅरिझम वरील लेखात येथे देण्याचा हेतू काय अशी कोणाला शंका येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी हे सांगणे आवश्यक आहे की…..बहुधर्मीय भारतात इस्लामने निर्माण केलेले प्रश्न कोणते आहेत, सतत हजार बाराशे वर्षे हे प्रश्न आपला पाठलाग कोणत्या शक्तीच्या बळावर करीत आहेत, या प्रश्नांचे निराकरण कसे करता बेईल, बहुधर्मीय राष्ट्रात निर्माण होणाल्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र भारताने जी सेक्युलरिझमची विचारधारा स्वीकारली ती अद्यापि यशस्वी का होत नाही, हिंदू-मुसलमान या प्रमुख दोन जमातींचे सतत संघर्ष का होतात इत्यादी प्रश्न आज पुन्हा आपल्यापुढे उभे राहिले आहेत. इस्लाममध्ये खरोखरीच वर उल्लेखिलेले आदेश आहेत की रूढीने, परंपरने अथवा मूळ वचनांचा चुकीचा अन्वयार्थ (इंटरभिटेशन) लावल्यामुळे हे आदेश मुस्लिम मानसिकतेत राजून गेली १००० वर्षे ते प्रत्यक्षात येत आहेत हे तज्ज्ञानी ठरवावे. पण हे आदेश कडव्या धमाध मुस्लिम बादशहांकडून आणि धर्मगुरूकडून प्रत्यक्ष आचरणात आणले जात आहेत हे वास्तव ऐतिहासिक सत्य विसरता येणार नाही. मोपला बंडात मुस्लिमांनी जे अघोर हत्याकांड केले त्यामागे त्यांची धार्मिक श्रद्धाच होती हे महात्मा गांधींनाही मान्य करावे लागले आहे. मुळात काहीही असो, आपण जे करतो आहोत ते धर्मकृत्य आहे असा त्यांचा विश्वास होता. डॉ. अनी बेझंट म्हणतात : “Malbar has taught us what Islamic rule still means and we do not want to see another specimen of the Khilafat Raj in India. How sympathy with Mopiahs is felt by the Muslims outside Malbar has been proved by the defence raised by them for their fellow believers, and by Mr. Gandhi himself, whostate that they had acted as they believed that religion taught there to act I fear that this is true…” अॅनी बेझंटनीही गांधींच्या विधानाला शेवटच्या वाक्यात पाठिवा दिला आहे. या
धर्माध मुस्लिमांच्या या श्रद्धांचा निरास केल्याशिवाय भारतात सेक्युलरिझम यशस्वी होणे शक्य नाही. त्यांच्या धार्मिक श्रद्धांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात गांधीजींना यश आले नाही, तसाच मार्क्सवाद्यांचा आर्थिक दृष्टिकोनही अयशस्वी ठरला आहे (आझर बैझान), आर्थिक समस्यांवर आंदोलन उभारून सामान्य मुस्लिम जनतेला धर्माध संघटनांपासून आपल्याकडे (काँग्रेसकडे) खेचून आणता येईल असे पं. नेहरूंना वाटत होते (मुस्लिम मास काँटॅक्ट), पण त्यांनाही यश आले नाही.

सर्वधर्मसमभाव:
भारतातील विशिष्ट परिस्थितीत सेक्युलॅरिझम या संकल्पनेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न झाला. मौ. आझादांनी पवित्र कुराणाचा नवा अन्वयार्थ लावण्याचा भव्य प्रयत्न केला. सेक्युलॅरिझम या संकल्पनेचा इहवाद हा जो मूळ अर्थ, तो बाजूला सारून सर्व धर्म ईश्वरदत्त आहेत, म्हणून ते सर्व वंद्य आहेत, पवित्र आहेत. ईश्वर, अल्ला, गॉड-शब्द कोणताही असो, विश्वाचा नियंता एकच आहे. त्यानेच हे सर्व धर्म व इस्लामपूर्व प्रेपित्त मानवाच्या कल्याणासाठी जगावर पाठविले. तेव्हा एका धर्माच्या अनुयायांनी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांचा द्वेष करू नये; एकमेकांच्या धर्माचा आदर करावा. धर्म द्वेष, हिंसा, अत्याचार शिकवत नसून तो प्रेम, दया, करणा हीच मूल्ये शिकवितो, इ. धर्माविषयीचे हे सर्व विचार उदात्त आहेत. पण धर्माइतके अत्याचार, हिंसा, रक्तपात दुसऱ्या कोणत्याही संस्थेने केलेले नाहीत हे वास्तव सत्य कसे विसरता येईल ? सर्व धर्म उदात्त तत्त्वावर आधारले आहेत हे आपण मान्य करू, परंतु इस्लाम सर्व धर्म सारखेच उदात्त, पवित्र आहेत हे मानायला तयार होईल काय? अल्लाने भूतलावर पाठविलेला इस्लाम हा एकमेव परिपूर्ण धर्म आहे ही श्रद्धा टाकल्याशिवाय मुस्लिमांना सर्व धर्म सारखेच पवित्र आणि वंद्य आहेत असे मानताच येणार नाही. येथे मौ. आझादांचा अन्वयार्थ उपयोगी पडतो. आझादांनी महमंद पैगंबरांच्या प्रत्यक्ष कृतीचाच आधार घेतला आहे. मक्केहून मंदिनेला आल्यानंतर प्रेषितांनी ज्यू, खिश्चन, इस्लाम, मूर्तिपूजक शैव, महायान बौद्ध इ. पाच धर्माच्या नागरिकांचे बहुधर्मीय राज्य निर्माण केले. यात सर्व धर्माना समान, सन्माननीय स्थान दिले होते. महंमदांची ही सर्वधर्मसमभावाची कल्पना आझादांनी भारतासाठी आदर्श म्हणून तिचा पुरस्कार केला. यासाठी आझादांनी इस्लामची व्याख्या नव्याने केली. मदिनेतील बहुधर्मीय राज्याची कल्पना ईश्वरी संकेतावरच आधारली आहे हे स्पष्ट करण्यासाठी ते म्हणतात ‘सर्व धर्माच्या व पैगंबरपूर्व प्रेषितांच्या खरेपणावरील श्रद्धा म्हणजेच इस्लाम. आझादांनी महमंदांच्या बहुधर्मीय राज्याचा आधार घेऊनच सर्वधर्मसमभावाचा सिद्धांत मांडला. बहुधर्मीय राज्याच्या घटकांनी शासनाचे, न्यायदानाचे काम राजसत्तेकडे सोपविले. त्यामुळे आझादांची ही योजना सेक्युलॅरिझमशी काही प्रमाणात सुसंगत झाली. भारताच्या घटनाकारांना, राज्यकर्त्यांना स्वीकारार्ह वाटली. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतातील एकाही मुस्लिम धर्मपंडिताने कुराणाच्या या अन्वयार्थाला मान्यता दिली नाही, मुस्लिम धर्मपंडितांच्या मनावरील १२०० वर्षांचे संस्कार पुसून टाकण्यात आझाद यशस्वी झाले नाहीत. मदिनेतील ‘सर्वधर्मसमाभावाचा महमद पैगंबरांनी केलेला प्रयोग ज्या तत्त्वांवर आधारला होता ती तत्त्वे महत्त्वाची होती. आज भारतामध्ये आझादांच्या सांगण्याप्रमाणे हा बहुधर्मीय राज्याचा प्रयोग करायचा तर आजच्या मुस्लिम नेत्यांना, महंमदानी बहुसंख्य ज्यू आणि ख्रिश्चन यांच्या बाबतीत जे उदारतेचे घोरण ठेवले ते मान्य होईल का ? ज्यू आणि ख्रिश्चन हे त्यावेळी त्या प्रदेशात बहुसंख्यक होते, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी सर्व राज्यघटकांनी पश्चिमेकडे (जरुसलेमकडे) तोंड करून आपआपल्या प्रार्थना म्हणाव्यात. जुन्या धर्मकल्पनांच्या आश्रयाने मनुष्याला जाचक अन्याय्य कूर अशा ज्या रूढी, चालीरीती होत्या, त्या सर्वांनी मिळून विचारविनिमयाने रद्द करून धर्मसुधारणा (सामाजिक सुधारणा) कराव्यात. सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून कायदे करण्याचे काम राज्यशासनाकडे द्यावे आणि पैगंबरापूर्वी होऊन गेलेले सर्व प्रेषित थोर (दैवी) पुरुष होते ही महंमदांची कल्पना इ. सर्व गोष्टी आजचे मुस्लिम नेते मानतील काय? असे झाल्यास आज भारतात हिंदु-मुसलमानांमध्ये संघर्षाचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते झालेच नसते. सर्व धर्म सत्य आणि समान आहेत हे मान्य झाले असते तर धर्मातराचा प्रश्न उद्भवण्याचे कारण नव्हते, सर्वधर्मातील पुण्यवंतांना स्वर्गाची द्वारे उघडली गेली असती, आज ती फक्त मुस्लिमांना उघडली जातात. याचा अर्थ असा की ज्यूनी बहुधर्मीय राज्यातून बाहेर पडून मदिनेवर हल्ला केला तेव्हापासून अन्य धर्मीयांविरुद्ध ‘जिहाद (धर्मयुद्ध) सुरू झाले. महंमदांच्या निधनानंतर हीच जिहादची परंपरा कायम राहिली. आजही मौ. नदवीसारखे धर्मपंडित जिहाद चालूच आहे असे सांगतात, माँ, सद्भुदिन सांगतात की हुकूमत-ए-इलाहिया’ (धर्मराज्याची स्थापना) हेच त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी जिहाद आवश्यक आहे. मौ. आझाद ‘जिहादयुग’ संपले असे सांगतात. भारतातील गेल्या २०० वर्षातील मुल्लामौलवी जिहादचीभाषा आजही बोलतात. आझादांची सर्वधर्मसमभावाची संकल्पना प्रत्यक्षात कशी यावी? या संकल्पनेतील सर्वात महत्त्वाची अडचण सर्व धर्म सारखेच खरे आणि पवित्र आहेत या कल्पनेतच आहे. प्रत्येक धर्मात अनेक आचारविचार असे असतात की ते न्याय, समता, व्यक्तीची प्रतिष्ठा या मूल्यांच्या विरोधी असतात. पण सर्व धर्म ईश्वराने दिलेले आणि म्हणून अंतिम सत्य या स्वरूपात मान्यता पावलेले असल्याने त्यातील अन्याय्य आचारविचारही त्याज्य ठरविता येत नाहीत. मनुस्मृतीतील बहुतेक विधिनिषेध याच प्रकारचे आहेत. इस्लामचे स्त्रीविषयक कायदे स्त्रीवर अन्याय करणारे आहेत. इक्बालसारखे घोर कवी स्त्रीमनातली दुःखाचे सुंदर वर्णन आपल्या काव्यात करतात. परंतु धर्मचिकित्सेचा, धर्मसुधारणेचा प्रश्न येताच शरियतच्या मर्यादांचे उल्लंघन ते करू शकत नाहीत : “अल्लाचीच तशी इच्छा आहे. (God hadwilled soD असे ते धर्मशरण होऊन उद्गार काढतात.

भारतीय घटना आणि सेक्युरिझम :
भारताने आझादांच्या ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेचा स्वीकार केला असला तरी भारतीय घटनेने या प्रश्नाचा अतिशय व्यापक संदर्भात स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्म-जात वंश-लिंग-निरपेक्षः समान नागरिकत्व, लौकिक जीवन व्यवहाराची पारलौकिक नियंत्रणातून मुक्तता, धर्मातील कालहत अन्याय्य रूढी-परंपरांतून व्यक्तीची, समाजाची मुक्तता यांसारख्या अर्वाचीन काळातील पुरोगामी विचारांशी आणि मानवी मूल्यांशी सुसंगत अशा सर्व अंगांनी सेक्युलरिझमचा विचार केला आहे.

हिंदू हा भारतातील बहुसंख्य नागरिकांचा धर्म असला तरी त्याला भारतसरकारचा धर्म (State Religion) म्हणून मान्यता दिलेली नाही. नागरिकांना धर्मस्वातंत्र्य दिलेले असले तरी त्यांचे नागरिकत्व धर्मनिरपेक्ष आहे. यात सर्वधर्मीयांप्रमाणे निरीश्वरवाद्यांचाही समावेश आहे. देशातील कायदे कोणत्याही धर्मशास्त्रावर आधारित असणार नाहीत. धर्मश्रद्धांना अनुसरून वैयक्तिक कायद्यांना मान्यता दिली असली, तरी समान नागरी कायद्याचा मार्गदर्शक तत्त्वांत उल्लेख केला आहे (कलम ४४) मुस्लिमांच्या विरोधामुळे समाननागरी कायदा अद्यापि प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने समान नागरी कायदा लवकरात लवकर अंमलात येणे आवश्यक आहे. सेक्युलरिझमचा विचार प्रामुख्याने कलम नं. १४,१५,१६,१७,१८ यांत केला आहे. १५व्या कलमाने धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थाननिरपेक्ष नागरिकत्व मान्य केले आहे. १४व्या कलमानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान मानले गेले आहेत. व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य देताना (क. २५.१) धर्मसुधारणा करण्याच्या दृष्टीने धर्मस्वातंत्र्याला काही मर्यादा घातल्या आहेत (subject to public order, Tmorality and health), कलम २५.२ हे महत्त्वाचे कलम आहे. धर्माच्या कक्षेत अनेक ऐहिक जीवन व्यवहार रूढीने, परंपरेने समाविष्ट झालेले असतात. या बाबतीत सुधारणा करण्याचा अधिकार घटनेने शासनाला दिला आहे. मंदिरप्रवेश कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, यासारखे कायदे करून समाजसुधारणा करण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे राखून ठेवला आहे. घटना तयार होत असतात ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द घटनेत समाविष्ट करावा असा मो. के. री. शहा यांनी आग्रह धरला होता. पं. नेहरूनी याला विरोध केला. या शब्दाचा घटनेत समावेश केला असता तर धर्माच्या बाबतीत कोणताही कायदा करण्याचा अधिकार शासनाला राहिला नसता. धर्मसुधारणेच्या दृष्टीने हे विद्यासकच उसले असते.

सर्वच धर्मामध्ये अनेक लौकिक व्यवहार धर्माच्या नावे सर्वमान्य झालेले असतात. प्रेपित्ताच्या अगर धर्मग्रंथातील वचनांच्या आधारे त्यांना पावित्र्य प्राप्त झालेले असते (SacroSanct). त्यांना आव्हान देण्याचा अधिकार माणसाला नाही. या वृत्तीविरुद्ध वैचारिक आंदोलन उभे केल्याशिवाय सेक्युलरिझम यशस्वी होऊ शकणार नाही. धर्माच्या आवरणाखाली स्मृतिग्रंथात (हिंदू आणि मुस्लिम स्मृतिग्रंथ) समाविष्ट केले गेलेले लौकिक व्यवहार धर्मग्रंथांतून काढून नागरी कायद्याखाली आणिले पाहिजेत, म्हणजेच शुद्ध धर्मापासून (अध्यात्म) त्यांची फारकत करण्यात आली पाहिजे. घटनापरिषदेमध्ये बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले “संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकणारे आणि कायदेमंडळाच्या (राजसत्तेचे एक अंग) अधिकारावर अतिक्रमण करणारे अत्यंत व्यापक असे कायदाविषयक अधिकार धर्मसंस्थेकडे का सोपवावेत हे मला समजत नाही.” भारतातील धर्म आणि धार्मिक आवरणाखाली प्रतिष्ठित झालेले भौतिक व्यवहार यांचा व्यक्तिगत कायद्याच्या संदर्भात विचार करताना बाबासाहेब पुढे म्हणतात : “या देशातील धार्मिक संकल्पना इतक्या व्यापक आहेत की जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व घटना या धर्मसंकल्पनेच्या कक्षेतच बंदिस्त झालेल्या असतात. धर्माच्या कक्षेत येत नाही अशी घटनाच जीवनात नसते. व्यक्तिगत कायदा (पर्सनल ला) जर टिकवून घरण्याचा आपला आग्रह असेल, तर माझी खात्री आहे की सामाजिक जीवन व्यवहारातील सर्व परिवर्तन प्रक्रियांची गतीच कुंठित होऊन जाईल.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.