समारोप

सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण संमेलन मुळातच एका अस्वस्थतेतून जन्माला आले. कोठारी आयोग आला-गेला. यशपाल समिती आली-गेली. सर्वशिक्षा अभियान आले गेले. तसेच आता सर्वांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अभियानाचे होणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. महाराष्ट्राची परिस्थितीच तशी होती. शिक्षण हक्क अधिनियम राष्ट्रीय पातळीवर पारित केला गेला 2010 च्या एप्रिलमध्ये. त्यानंतर दीड वर्षांनी म्हणजे 2011 च्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राने आपले नियम पारित केले. शिक्षकांना धारेवर धरण्यापलीकडे या अधिनियमामुळे नवीन काही झाले नाही. अशी प्रतिक्रिया सर्व शिक्षकांच्यात उमटलेली दिसत होती. विशेषतः गुणवत्तेच्या दृष्टीने फारशी काहीच हालचाल होताना दिसत नव्हती. गुणवत्ता म्हणजे नक्की काय? येथूनच प्रश्नांना सुरुवात होती. शिक्षकांना हे पुरे माहीत होते की शिक्षणात गुणवत्ता आल्याशिवाय शाळाबाह्य मुले शाळेत टिकवून ठेवणे अवघड आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक गटागटांत एकत्र येऊन चर्चा करू लागले. वर्तमानपत्रे-मासिकांमधील लेख वाचून त्या त्या व्यक्तींशी संपर्क साधू लागले. जे शिक्षक 2010 मध्ये तयार झालेल्या राज्यसाधनगटात सहभागी होते, ते त्या त्या गटातील साधनव्यक्तींना फोन करू लागले. अशा रीतीने या अधिनियमाचा शिक्षकांच्या पातळीवर तरी गंभीर विचार होऊ लागला.
शिक्षण हक्काच्या अधिनियमात अनेक त्रुटी आहेत. परंतु निदान स्वातंत्र्यानंतर 63 वर्षांनी हक्क तरी मिळाला आहे. तेव्हा त्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचाच अर्थ जाणून घेऊ; असे ठरवून 2010 च्या राज्यसाधनगटातील एका गटाने पुढाकार घेतला व 14-15 मारवारीला सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण संमेलन पुण्यामुंबईत न घेता वर्ध्यात घेण्याचे ठरले.
साधारणतः 100 शिक्षकांना निमंत्रणे गेली. 2010 मध्ये SCERT ने केलेल्या एक निवड प्रक्रियेच्यावेळी भेटलेल्या अनेक उत्साही व कार्यक्षम शिक्षकांचा त्यात अंतर्भाव ना त्याहूनही अधिक शिक्षक विचारणा करीत होते. पंरतु गट फार मोठा झाला तर संयोजकांना महोईल व शिवाय चर्चा चांगली होणार नाही म्हणून 100-125 हा आकडा ठरवला. मात्र वेळी कोणाला निवडणुकीची प्रशिक्षणे लागली तर अधिकारी पदासाठीची कोणाची परीक्षा की 15 जानेवारीला घोषित झाली. त्यामुळे अनेकांना यायचे असूनही येता आले नाही. सही 70 शिक्षक पार नाशिक-नंदुरबारहून स्वखर्चाने, रजा टाकून, रात्रभर प्रवास करून, अडाक्याच्या थंडीत एस.टी.स्टँडच्या थंड कडप्प्यांवर चार चार तास बसची प्रतीक्षा करीत. बलमध्ये तास-न्-तास उभे राहून संमेलनाला आले होते.तेव्हाच लक्षात आले की अशा प्रकारच्या संघटनेची आणि गुणवत्ता विकसनाच्या कामाची आज खरोखरच फार गरज आहे.
14 तारखेला संमेलन सुमारे तासभर उशिरा सुरू झाल्याने गटकार्याला पुरेसा वेळ मियाला नाही. सर्वांनी आपापली मांडणी मात्र अत्यंत प्रभावीपणे व तळमळीने केली. प्रश्नोत्तरांचे मन्सही चांगलेच रंगले. याशिवाय इतर वेळी अनौपचारिक गप्पांमध्येही आपापले अनुभव, नवीन प्रयोग, शंका, समस्या यांची भरपूर देवाणघेवाण झाली. अनेक शिक्षक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकेकटे काम करीत आहेत. आपापल्या परीने कुठेतरी पाहून, कुठेतरी वाचून, मुलांना जास्तीतजास्त देण्याचा प्रयत्न करीत आहे. काही गट मिळून प्रयोगशील शाळांना सदेतात. शिक्षणात जन्मभर काम केलेल्या लोकांबरोबर चर्चा करण्यात दिवसभर घालवतात कान्हा नव्या ऊर्जेने कामाला लागतात. अनेक ठिकाणी अधिकारी पदावरील व्यक्ती त्यांना मदत करतात. प्रोत्साहन देतात. या साऱ्यांना एका सामाईक व्यासपीठावर एकत्र आणायला आहे. गुणवत्ता म्हणजे निव्वळ उपक्रम किंवा कृतिशीलता नसून काहीतरी अधिक खोलातील आहे हे सर्वांना समजण्याची गरज आहे. सर्वांची वैचारिक बैठक पक्की करायला हवी. मुख्य बाजे माणसांच्या मनातील मरगळ, असहायतेची भावना दूर करायला हवी.
या औपचारिक-अनौपचारिक गप्पांमधून शिकायला मिळालेल्या गोष्टी म्हणजे शिक्षकांना आज कशाची गरज आहे याविषयीची स्पष्टता. यात भाषा अथवा गणित अकविण्याच्या ज्ञान-रचनावादी पद्धतींबरोबरच पुन्हा-पुन्हा तीच-तीच माहिती वेगवेगळ्या प्रकारे भरून देण्याच्या कंटाळवाण्या कामातून मुक्त करणाऱ्या तंत्रज्ञानाचे व संगणक हाताळण्याचे कौशल्य, एकाच वेळी वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या क्षमतेची मुले असलेले पहली ते चौथीचे वर्ग (एम.जी.एम.एल.) शिकविण्याचे कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे जे सौहार्दभावना. मी एकटा/एकटी नाही. माझ्याशी दुरून का होईना संवाद साधणारे, ज पडल्यास हाकेला येणारे अनेक आहेत हा विश्वास. तसेच माझ्याकडेही इतरांना देण्यासारखे काही आहे ही भावना, फार महत्त्वाची आहे.
शिक्षण संस्था, फलटण

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.