भौतिक-अभौतिक
विशाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचार-प्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वांत ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवावयाचे आहे. ईशर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निरर्थक असते. ईशराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे. भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसाच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागी देखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठिराखा अथवा लोकशाही समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचा देखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/ राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्यसमाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणुळे बेबंद, चंगळवादी व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो. वस्तुनिष्ठ (Objective) व तर्कशुद्ध (rational) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तीगणिक आकलनात फरक पडू शकतो.
भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अर्ध्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईशरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील ३- ४ शतकांध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्य देशांध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टिरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवांचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर ‘नियम’ म्हणावयाचे असेल तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समान वातारणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्ट्या तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईशराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक/शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणाऱ्या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बऱ्याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे.
परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वांगीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळ्या जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानव यांत असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानव-सदृश प्राण्यांच्या उत्क्रान्तिक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणिजगतदेखील असे म्हणू शकले असते की तर्क/बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हे देखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रान्तीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही ने की दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळ्याने धडपडत, चाचपडत, झोकांड्या खात वाटचाल करावी तसे उत्क्रान्तीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवृद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल ? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही.
पृथ्वीवर वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे ‘तो त्यांचा भ्र होता’ असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणाऱ्या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतींद्रिय वा आध्यात्मिक अनुभुतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते, कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता ‘ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही’ हा आपला पूर्वग्रह देखील बाजूला ठेवावा लागतो.
ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगांचे सैद्धान्तिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षांपूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (god particle) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वांखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वांत सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्मकण ऊर्जातरंगांच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंतिम ध्येय – ब्रह्मात विलीन होणे सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली ? आपल्या जीवनाचे काही प्रयोजन आहे काय? यासारख्या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञानातून शोधण्याचा मानवाने जो प्रयत्न केला, त्यांपैकी भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे व मर्यादा आपण मागील लेखांकामध्ये जाणून घेतल्या. भारतामध्ये अस्तित्वाच्या मुळाशी पोचण्याचे जे प्रयत्न झाले त्यांना ‘दर्शनशास्त्र’ असे नाव दिले गेले. तत्त्वज्ञानाहून दर्शनशास्त्र वेगळे करण्यासाठी मानले गेले की, तत्त्वज्ञानामध्ये केवळ बुद्धीच्या आधारे तर्कदृष्ट्या उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. परंतु ‘दर्शन’या शब्दामध्ये निव्वळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित अथवा गृहीत आहे. जाणिवेच्या एका उन्नत अवस्थेध्ये प्राप्त झालेले, अनुभूत झालेले ज्ञान म्हणजे ‘दर्शन’अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. ध्यानमग्न अवस्थेत चेतनेच्या सहाय्याने सत्याचे जे स्वरूप प्राचीन ऋषिमुनींना, योग्यांना, तपस्व्यांना जाणवले त्या ज्ञानाची त्यांनी बौद्धिक स्तरावर केलेली मांडणी म्हणजे त्याचे ‘दर्शन’होय. सांख्यदर्शनाचा उद्गाता कपिल मुनी, वेदोपनिषदाचा रचयिता मानले जाणारे वशिष्ठादि ऋषी, योगशास्त्राचा निर्माता पतंजली, सांख्य आणि योगाची वेदान्ताशी सांगड घालून भगवद्गीतेत समन्वयी तत्त्वज्ञान गुंफणारा श्रीकृष्ण, वेदांतील कर्मकांडाचा निषेध करून अनात्मवादाचा पुरस्कार करणारा व द:खमय जीवनात तृष्णात्याग हाच धम्म असल्याचा उद्घोष करणारा शाक्यम्नी गौतम बुद्ध, जीव आणि पदार्थ यांचे द्वैत असून त्यांना कोणीही निर्माता ईशर नसल्याचे सांगणारा श्रमण तीर्थंकर महावीर इत्यादी सर्व भारतीय तत्त्वज्ञ हे केवळ बुद्धिवादी पंडित नव्हते. आपापल्या जीवनात दीर्घकाळ खडतर तपश्चर्या करून त्यांना जे ज्ञान ध्यानधारणेतून प्राप्त झाले, त्याची मांडणी त्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानातून केल्यामुळे त्या सर्वांच्या तत्त्वज्ञानास ‘दर्शन’ असे नाव प्राप्त झाले. अर्थात यांपैकी प्रत्येक महामानवास प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे संपूर्ण सत्य होय असे मानता येणार नाही. कारण आपापल्या ध्यानातून त्यांना जी अनुभूती प्राप्त झाली ती म्हणजे अस्तित्वाचे त्यांना कळलेले एक रूप मानता येईल. अस्तित्वाच्या संपूर्ण सत्याचे दर्शन त्यांना झाले असे मानणे योग्य नव्हे. शिवाय हे ब्रह्मांड आणि पृथ्वीवरील जीवन सतत विकासशील/परिवर्तनशील असल्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे दर्शन अपूर्ण व
आंशिकच असणार.
अमर्याद सृष्टीचा एक अतिशय क्षुद्र घटक असलेला मानव त्या सृष्टीचे संपूर्ण रहस्य काधीच शोधू शकणार नाही, कारण अंशमात्रांना पूर्ण ज्ञान होऊच शकत नाही, असे मानणाऱ्या तत्त्वज्ञानास अज्ञेयवाद म्हणतात. मात्र भौतिकवाद अथवा अध्यात्मवाद हे अज्ञेयवादी नाहीत. भौतिकवादाच्या विचारानुसार सर्व सृष्टीचे कारण जड भौतिक पदार्थ/ऊर्जा हेच असल्यामुळे यथाकाळ विज्ञानाच्या सहाय्याने सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल मानवाला होणारच. अध्यात्मवाद हादेखील सृष्टीमध्ये जाणता न येण्यासारखे काही रहस्य आहे असे मानत नाही. कारण प्रत्येक कणात/जीवात पूर्णत्व सामावले असून स्वत:च्या शोधातून पूर्ण गवसू शकते अशी अध्यात्मवादाची मान्यता आहे.
जीव आणि पदार्थ किंवा पुरुष आणि प्रकृती असे दोन स्वतंत्र घटक सृष्टीत असून त्यांच्यात कोणतेही साम्य वा ऐक्य नाही, असे मानणाऱ्या तत्त्वज्ञानास द्वैतवाद म्हणतात. सांख्यदर्शन व जैनदर्शन हे द्वैतवादी आहेत. या दोन्ही दर्शनांध्ये सृष्टी ही अनादि व अनंत मानलेली आहे. जी अभिव्यक्त झाली ती सृष्टी म्हणजेच प्रकृती आणि तिला जाणणारा, समजणारा तो पुरुष असा भेद कल्पिला आहे. पुरुषाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष होय. इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा जो उपभोग जीव घेतो, त्याने त्याची तृष्णा वाढतच जाते. म्हणून जीवन दु:खमय होते. तृष्णा नष्ट होऊन निर्दोष जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट होय, अशीच मांडणी थोड्याफार फरकाने बौद्ध, जैन, सांख्य या भारतीय तत्वज्ञानांध्ये आढळून येते. या तिन्ही दर्शनांनी ईशराचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच त्यांनी आत्म्याचेही अस्तित्व नाकारले आहे. परंतु तरीही ही दर्शने भौतिकवादी नाहीत, कारण जीव किंवा पुरुष हा अ-भौतिक घटक प्रकृतीपेक्षा वेगळा मानून प्रकृतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करण्यावर त्यांचा भर आहे. लोभ, भय, अहंकार, तृष्णा इ. विकारातून मुक्त झालेला हा जीव जाईल कुठे? बौद्ध मतानुसार विशातील सर्व वस्तू नाशवंत/अनित्य आहेत. देहाच्या मृत्यूनंतर जीवाचा नाश होत नसला तरी अविनाशी, नित्य, सनातन असे कोणतेही तत्त्व अस्तित्वात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या देहाचे भौतिक घटक हे वैशिक भौतिक घटकांध्ये विलीन होतात. मात्र मानसिक/भावनिक घटक मात्र पूर्णत: विलीन होत नाहीत. कर्म व त्याचो परिणाम यांची एक साखळी पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. परंतु जो पुनर्जन्म होतो, तो अविनाशी आत्म्याचा होत नसून कर्माचे परिणाम भोगणाऱ्या जीवाचा होतो. कर्माला कारणीभूत असणारी तृष्णा जर संपली तर जिवाच्या पुनर्जन्माचे कारणही संपुष्टात येईल व तो जीवही विलीन होईल, म्हणजे परिनिर्वाण साधेल. अशी थोडक्यात भगवान बुद्धांची मांडणी दिसते. संसाराचे हे चक्र कोणी ईशर वा परमात्मा चालवीत नसून कमुळेच ते चक्र चालते कारण प्रत्येक कर्माचा परिणाम हा असतोच. कर्माची प्रेरणा इला, वासना (तृष्णा), हेवा यासारख्या भावनांधून उत्पन्न होते. आणि दुःख हाच कर्माचा मुख्य परिणाम आहे. व्यक्ती आपल्या आंतरिक साधनेद्वारे तृष्णेचा त्याग करू शकते. त्यामुळे तो द:खमुक्त होईल व संसारचक्रातून त्याची सुटका होईल. प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत तपस्येवर/साधनेवर भगवान महावीरानेही (जैनदर्शनाने) भर दिला. अनादि अनंत अशा आत्म्याचे व सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा ईशराचे अस्तित्व त्यानेही नाकारले. परंतु सृष्टी अनित्य, विनाशी आहे असे मात्र जैन दर्शन मानत नाही. त्यांच्या मते जीव व भौतिक सृष्टी हे अनादि-अनंत असून कर्मबंधनापासून मुक्त झालेले जीव हे आणखी उच्च लोकांत वास करतात.
मात्र पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन या जीवनापासून मुक्ती मिळविणे हेच असल्याची मांडणी बौद्ध व जैन या दोन्ही दर्शनांध्ये समान आढळते. थोड्याफार फरकाने अशीच मांडणी शंकराचार्यांच्या मायावादातही आढळून येते. शंकराचार्यांनी अमर, अविनाशी आत्म्याचे व सर्वव्यापी, सनातन ब्रह्माचे अस्तित्व असल्याचे जरी प्रतिपादन केले, तरी व्यक्त सृष्टी/प्रकृती ही केवळ आभासात्मक माया असल्यामुळे आत्म्याचा भ्र नाहीसा होऊन (म्हणजे तो या लौकिक जीवनाच्या मोहातून मुक्त होऊन) स्वत:च्या ब्रह्मरूपी मूळ स्वरूपात विलीन होणे, हेच त्यांच्याही मते जीवनाचे खरे उद्दिष्ट ठरते. कर्म-बंधनातून मुक्ती मिळावी या इच्छेने मनुष्य निदान नैतिक अंगाने तरी बऱ्यावाईटाचा विचार करून जबाबदारीने कर्माची निवड करू शकतो, हा वरील तिन्ही दर्शनांचा लौकिक अर्थाने चांगला भाग मानता येईल. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत. ते पूर्वकर्म बदलणे आपल्या हाती नाही. परंतु भविष्यात/पुढील जन्मी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू नये म्हणून अनैतिक कर्म करू नये. लोभ, मोह, मद, अहंकार बाळगू नये व दुसऱ्या व्यक्तीला दुखवू नये – इतक्या सामान्य अर्थाने सामान्य जनांच्या पातळीवर या दर्शनांचा प्रसार झाला. मात्र जीवनापासून पलायन करणे हाच जीवनाचा खरा उद्देश होय, असा जो खोल अर्थ वरील तत्त्वज्ञानांध्ये गृहीत आहे, तो बुद्धीला न पटणारा, विज्ञानाच्या व काळाच्या कसोटीवर न उतरलेला आहे. शून्यात अथवा ब्रह्मात विलीन होणे किंवा पृथ्वीलोक सोडून अन्य (स्वर्गासम) लोकांत वास करणे, हेच जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल तर जीवनाचा विविधांगी विकास का झाला? आणि जागण्याची व आनंदगयी जीवन जगण्याची प्रेरणा इतकी गूलभूत स्वरूपात का टिकून राहिली?
अडचणी – बाह्य आणि आंतरिक मागील शतकाच्या पूर्वार्धात सुप्रसिद्ध योगी व तत्त्वज्ञ श्री अरविंद यांनी सर्व प्राचीन भारतीय दर्शनांचा आढावा घेऊन आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी त्यांच्या ङळषश ऊळींळपश (दिव्य जीवन) या ग्रंथाद्वारे केली. त्या ग्रंथाच्या आधारे आध्यात्मिक विचारसरणीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे नमूद करता येतात.
या विशात मूलत: एका तत्त्व अस्तित्वात आहे. ते ‘आहे’ म्हणून त्याला ‘सत्’ म्हणायचे. ते जे एकच एक मूलतत्त्व अस्तित्वात आहे, ते जड अथवा अचेतन नसून संपूर्णत: सचेतन/चिन्मय आहे, म्हणून त्याला ‘चित्’ म्हणायचे. त्याचप्रमाणे त्या मूलतत्त्वाचा स्वभाव आनंद-स्वरूप आहे, म्हणून त्याला सत् + चित् + आनंद = ‘सच्चिदानंद’ असे नाव दिले आहे. या सच्चिदानंदा खेरीज दुसरे काहीही अस्तित्वात नाही, म्हणून त्याला ‘आत्मतत्त्व’ म्हणायचे. ईशावास्य उपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर . . .
ते आत्मतत्त्व एका एक, मुळीच हालचाल न करणारे, पण मनापेक्षाही वेगवान आहे. देव त्याला गाठू शकत नाहीत, त्याने मात्र देवांना केव्हाच गाठलेले आहे.’ ‘ते दूर आहे आणि ते जवळही आहे.’ ‘ते या सर्वांच्या आत आणि या सर्वांच्या (विशाच्या) बाहेरही आहे.’ अध्यात्माच्या या कपनेनुसार सर्वव्यापी, सर्वांतयाी, परंतु एकाएक असे ते आत्मतत्त्व/परब्रह्म/सच्चिदानंद सृष्टीच्या आरंभी असंख्य झाले. जे एक होते त्याने स्वत:ला असंख्य/अगणित रूपांत/आकारांत खंडित करून घेतले. जे संपूर्ण सचेतन होते, त्याने स्वत:ला या असंख्य आकारांध्ये संपूर्ण निश्चेतन/जड करून घेतले. आणि मग त्याने प्रवास सुरू केला असंख्य/अगणित रूपांतून/आकारांतून पुन्हा एकत्वाकडे, चैतन्याकडे आणि आनंदाकडे! सृष्टीची उत्क्रांती जडाकडून चेतनेकडे वाटचाल करत असलेली दिसते. परंतु या सर्व जडाच्या मुळाशी, त्याच्या आत आणि बाहेरही ते आनंदमय चैतन्य गुप्तपणे विराजमान आहेच. सृष्टीच्या निर्मितीचे कारण, निमित्तही तेच आहे आणि निर्मित सृष्टीचे सारे द्रव्य/घटक त्याच तत्त्वाचे बनलेले आहेत. निर्माता आणि निर्मिती यांच्यात द्वैत/ द्वंद्व नसून निर्माता निर्मितीतही उतरला आहे. निर्मात्यापासून निर्मिती वेगळी नाही. चैतन्यापासून जड तत्त्व वेगळे नाही.
चैतन्यमय व एका एक असलेल्या सर्वव्यापी आत्मतत्त्वाने अगणित जड कणांध्ये जे स्वत:ला विभाजित करून घेतले, ते एकदम नव्हे तर टप्प्याटप्प्याने. त्याने प्रथम स्वत:तून कार्यकारी शक्तीची निर्मिती केली, जिला ‘परा-प्रकृती’ म्हणतात. त्या पराप्रकृ तीच्या माध्यमातून अस्तित्वाच्या अनेक पातळ्या/लोक/जगत् निर्माण झाले. त्यांपैकी आपल्या दृष्टीस पडणारे भौतिक जगत् ही एकूण समग्र अस्तित्वाची केवळ एक पातळी आहे. भौतिक पातळीच्या आधी अस्तित्वाच्या विविध पातळ्या व त्यावरील जगतांची निर्मिती झाली. आज आमचे जे मानवी-जीवन आहे, त्यावर या सर्व पातळ्यांचा (planes) व त्यातील जगतांचा (worlds) व शक्तींचा (forces) प्रभाव सतत असतो. आमच्या सामान्य जाणिवेला भौतिकेतर पातळ्यांवरील अस्तित्वाचे भान नसते व म्हणून आमच्यासाठी ते सर्व ‘गुह्यागत्’ आहेत. मात्र या अनेकानेक गुह्य जगतांधून, त्यांत वास करणाऱ्या विविध शक्तींपासून आम्ही नित्य प्रेरणा घेत असतो अथवा त्यांच्या सामर्थ्याचे नकळत ‘वाहन’ ठरत असतो. भौतिक सृष्टीमध्ये प्राणाचा विकास व्हावा यासाठी प्राणिक पातळीतून भौतिक पातळीवर दबाव येत असतो. तसेच प्राणिजीवनात मनाचा विविधांगी विकास होण्यासाठी मानस-लोकांतूनही असाा दबाव व प्रभाव कार्यरत असतो. अर्थात् भौतिक पदार्थातही सुप्त रूपाने प्राण, मन इ. घटक अस्तित्वात असल्यामुळेच वरच्या लोकांतून येणारे दबाव जडातून प्राणाला व प्राणातून मनाला उमलण्यास सहाय्यभूत ठरतात.
सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश हाच आहे की परमात्मा असंख्य रूपे व आकार घेऊन त्या सर्व वरपांगी जड व अचेतन भासणाऱ्या रूपांधून पुन्हा चैतन्याचा संपूर्ण विकास करून एकत्व साधू इच्छित आहे. आमच्यापैकी प्रत्येक मानवात, पशुपक्ष्यांत, वनस्पती व जड पदार्थांतदेखील खोलवर तो परमात्माच दडलेला असून तो आमच्यातून प्रगटू इच्छितो. याप्रमाणे आम्हाला स्वत:मधील अवचेतन अंगाचे भान नसते त्याप्रमाणे या अति-चेतन दिव्य अंगाचेदेखील भान नसते. मात्र मानवतेला स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक साहसी, निर्भय, पराक्रमी, ज्ञानी, सुंदर व प्रेळ होण्याची तसेच इतरांसोबत एकत्व साधण्याची प्रबळ आंतरिक ओढ परमात्म्याशी असलेल्या आमच्या नेणिवेतील आंतरिक संबंधामुळेच निर्माण होते.
या आध्यात्मिक दर्शनानुसार मानवी जीवनाचा हेतू व उद्दिष्ट स्पष्ट आहे. स्वत:मधील अंतरात्म्याला हुडकून काढणे, त्याच्याशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या हाती आमच्या जीवनाची सूत्रे सोपविणे व आपल्या पूर्ण वैभवासह आमच्यातून त्या परमात्म्याने प्रगटावे व भूलोकीचे सर्व जीवन अधिकाधिक दिव्य, चैतन्यमय, संपन्न, प्रसन्न व सुसंवादी होत जावे; त्यातच जीवनाची सार्थकता आहे. प्रकृती अतिशय कठोर व अपरिवर्तनीय असून त्यामुळे जीवन दुःखद ठरते व म्हणून या प्रकृतीचा व जीवनाचा त्याग करून मानवी जीवाने मोक्षाचा वा निर्वाणाचा ध्यास घ्यावा, ही विचारसरणी श्री अरविंदांच्या आध्यात्मिक मांडणीमध्ये मुळीच समर्थनीय ठरत नाही. उलट प्रकृतीने स्वत:मध्ये परिवर्तन घडवूनच उत्क्रांतीचे इतके टप्पे पार केले आहेत. विश-प्रकृतीमध्येही परमात्म्याची दिव्य शक्ती गुप्तपणे कार्यरत असून प्रकृतीला आधिकाधिक लवचिक व चैतन्यमय करण्यासाठी ती दिव्य शक्ती अनेक प्रकारे झटत आहे. परमात्म्याच्या त्या दिव्य सामर्थ्याचे आवाहन करून मनुष्य स्वत:ची प्रकृती बदलण्यासाठी जर प्रयत्नरत राहिला तर त्याच्याही प्रकृतीचे दिव्य रूपांतर होऊ शकते व सोबतच विशप्रकृतीच्या उत्क्रांतीलादेखील त्याचा हातभार सजगपणे लागू शकतो, असे श्री अरविंद म्हणतात.
मला माझ्या जीवनात अडचणी असतील तर त्या अडचणी बाह्य जगातील इतर शक्तींळे किती व माझ्याच स्वभावातील उणिवjळे किती, हे मी स्वत:ला न्याहाळून तपासू शकतो. पैकी बाह्यजगामुळे निर्माण झालेल्या सर्व अडाणी सोडवणे मला शक्य नसते. तसेच माझ्या स्वभावातील या उणिवेळे एखादी अडचण निर्माण होत असल्याचे माझ्या लक्षात येते, ती स्वभावातील उणीव दूर करणेदेखील माझ्यासाठी सोपे काम नसते. मात्र माझ्या अंतरंगातील अंतरात्म्याशी माझी जाणीव जसजशी निगडित होत जाईल व परमात्म्याचे आवाहन करून ती स्वभावातील उणीव दूर करण्यासाठी मी तितक्या आर्ततेने त्याचे सहाय्य मागत राहील, तसतसे माझ्या स्वभावात अधिकाधिक चांगले बदा घडत जाताना आढळतील व त्याचसोबत बाह्य जगातील अडचणी मला कमी त्रासदायक ठरू लागतील. माझ्या प्रकृतीमधील हे परिवर्तन बाह्य जगाच्या प्रकृती-परिवर्तनालाही काही प्रमाणात चालना देत राहील. माझी आणि विशाची प्रकृती अधिकाधिक दिव्य, ज्ञानी, सशक्त, सुदृढ, जवळीक, प्रेळ, सचेतन व आनंदमय होत जाईल.
१२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.