१९४५ सालानंतर युद्धे झालीच नाहीत असे नाही. तीनेकशे झाली आहेत. हे खरे आहे की जगभरात सगळीकडे लोक लढून मेले नाहीत. ते फक्त इंडोनेशिया, ग्रीस, व्हिएतनाम, भारत, बोलिव्हिया, पाकिस्तान, चीन, पाराग्वे, येमेन, मादागास्कर, इझरायल, कोलंबिया, कोस्टा रिका, कोरिया, इजिप्त, जॉर्डन, लेबेनॉन, सीरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, ट्युनिशिया, केनिया, तैवान, मोरोको, ग्वाटेमाला, आल्जीरिया, कॅमेरून, हंगेरी, हैती, रवांडा, सुदान, ओमान, हाँडुरास, निकाराग्वा, मॉरिटानिया, क्यूबा, व्हेनेझुएला, इराक, झाईर, लाओस, बुरुंडी, गिनी-बिसाव, सोमालिया, फ्रान्स, सायप्रस, झांबिया, गबोन, यु.एस.ए., युगांडा, टांझानिया, ब्राझील, डोमिनिकन प्रजातंत्र, पेरु, नामिबिया, चाड, झेकोस्लोव्हाकिया, स्पेन, सोव्हिएत संघराज्य, ब्रिटन, एल साल्वादोर, कंबोडिया, इटली, श्रीलंका, बांगला देश, चिले, तर्कस्थान, इथिओपिया, पर्तुगाल, मोझांबीक, दक्षिण आफ्रिका, लिबिया, अफगाणिस्तान, जमेका, घाना, इक्वादोर, झिम्बाब्वे, बुर्कीना फासो, माली, पनामा, रुमानिया, सेनेगाल, कुवैत, आर्मेनिया, अझरबैजान, नायजर, क्रोएशिया, जॉर्जिया, भूतान, जिबूटी, मोल्डोवा, सिएर लिओन, बॉस्निया, ताजिकिस्तान, कांगो, रशिया, मेक्सिको, नेपाल, अल्बानिया, युगोस्लाव्हिया, एरिट्रिया, मॅसेडोनिया आणि पॅलेस्टाइन इथेच लढले आणि मेले आहेत. ढोबळ अंदाजात मृतांची संख्या दोन कोटींच्या बरीच वर आहे.
लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स च्या ६ सप्टेंबर २००१ च्या अंकात जेम्स मीकने वरील भाष्य केले. ह्यानंतर पाचव्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेंटॅगॉनवरचा ‘नाईन-इलेव्हन’ हल्ला झाला. आजचा ‘स्कोअर’ तीनेक कोटीही असू शकेल!]