‘मला कोणी शत्रू नाही ही तुझी बढाई आहे ना !
माझ्या मित्रा ! तुझी ही प्रौढी व्यर्थ आहे..
शूराला साजेशा पद्धतीने जीवनाच्या संघर्षात जे उडी घेतात
त्यांना अनेक शत्रू निर्माण होतातच
तुला जर कुणी शत्रूच नसेल तर….
त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या हातून
काही घडलेलेच नाही.
कोणाही विश्वासघातक्याच्या पेकाटात
तू लाथ घातली नाहीस.
दुष्टाच्या तावडीतील शिकार तू सोडवून आणली नाहीस.
कोणत्याही अन्यायाचा मुकाबला करण्यास तू धजावलाच नाहीस.
खरं सांगू ? तूं एक भ्याड आहेस भ्याड !