[अमर्त्य सेन यांचे द आयडिया ऑफ जस्टिस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने लेखकाने दिलेली एक मुलाखत इंडियन एक्स्प्रेस ने (८ ऑगस्ट ‘०९) प्रकाशित केली. त्यातील काही अंश असा -] प्रश्नकर्ता : हे पुस्तक आणि धोरणनिश्चिती यांतील संबंधाबद्दल तुम्ही म्हणालात की हा अभियंत्यांचा संदर्भग्रंथ (Engineer’s Handbook) नाही. सेन : तुम्हाला पूल कसा बांधावा हे या पुस्तकात सापडणार नाही – जमीन कशी, सामान कुठून आणायचे – नाही. तुम्हाला पूल किती रुंद असावा यावर कसा विचार करावा, ते इथे सापडेल; वाहतूक कश्या प्रकारची असेल ते हे सांगेल. यावरून स्थानिक स्थितीसाठी काय लागू पडेल, ते कळेल; धोरण ठरवण्याचा तपशील नाही. प्रश्नकर्ता : आणि भारतासाठीची काही शिकवण ? सेन : मागे सांगितलेल्या माझ्या भावना पुन्हा सांगतो. प्रागतिक विचार करणारे भारतीय आदर्श जगा- बाबतच्या मुद्द्यांवर फार वेळ घालवतात, आणि तातडीचे प्रश्न कोणते हे ओळखून त्यांबाबत काम करण्याला पुरेसा वेळ देत नाहीत.