आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (खङज) सांगते की २००३ साली २.८ अब्ज माणसांना औपचारिक रोजगार मिळाला, एकूण लोकसंख्येच्या सुमारे चाळीस टक्के लोकांना. पण हा अंदाज कामगार व त्यांची कुटुंबे यांच्यापुढील अनेक गंभीर आह्वाने दडवतो. सुमारे १.४ अब्ज लोक (औपचारिक रोजंदारांपैकी अर्धे) सरासरीने रोजी दोन डॉलर (रु.८९/-) पेक्षा कमी पगारात खर्च भागवायला धडपडतात. सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेतील नव्वद टक्के लोक या ‘गरीब रोजगारप्राप्त’ वर्गीकरणातले आहेत. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध नाही. याच काळात १८.६ कोटी लोक बेकार होते. एकूण बेकारांचे प्रमाण ६.२ टक्के आहे. आदल्या वर्षी ते ६.१ टक्का होते, पण १९९३ साली ते ५.६ टक्के होते. खङज या बेकारीवाढीमध्ये सुस्त अर्थव्यवस्था, इराक युद्ध, दहशतवाद, SARS व तत्सम रोग असल्याचे सांगते. (पण) संदेशवहन व माहिती तंत्रज्ञानातील घटता रोजगार, कारखानी उत्पादनातील विस्तृत कामगारकपात, प्रवासातील, पर्यटना-मधील घट व अनौपचारिक श्रमिकांकडे ओढ असणे, ही दूरगामी कारणे आहेत.
[द वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूट च्या व्हायटल साइन्स २००५ (डब्ल्यू.डब्ल्यू. नॉर्टन, न्यूयॉर्क व लंडन, २००५) या पुस्तकातून.]