जागतिक आरोग्य संस्थेच्या २००६ चा रिपोर्ट “आपण सर्व मिळून आरोग्यासाठी काम करू.” या विषयावर आहे. आता पुढच्या १० वर्षांत जगभरात आरोग्यसेवेतले मनुष्यबळ कमी होत चालले आहे. जगातल्या ६० देशांमध्ये कमी मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेत सुधारणा नाही. त्रेचाळीस दशलक्ष डॉक्टर्स, दाया, नर्सेस आणि आरोग्यसेवक यांची गरज आज आहे. आफ्रिकेतील सबसहारन देशात या सर्वांची सर्वांत जास्त गरज आहे. भयानक, गरिबी, काम करण्यासाठी लागणारी अपुरी साधने, वाईट वातावरण, अशिक्षित जनता, यामुळे प्रश्न बिकट होत आहेत.
एकोणसाठ दशलक्ष हा आकडा जगभरातील आरोग्यसेवेतील मनुष्यबळाचा आहे. यातील एक तृतीयांश बळ अमेरिकेत व कॅनडात आहे जिथे जगातील ५० टक्के आर्थिक सुबत्ता आरोग्यसेवेत आहे. ४ टक्केच बळ आफ्रिकेत आहे या आफ्रिकेत जिथे जगातली २५ टक्के रोगराई साठलेली आहे, आणि जगातल्या आर्थिक बळापैंकी १ टक्क्याहून कमी बळ आहे. हा असमतोल घालवण्याचा प्रयत्न करण्याची गरज उत्पन्न झाली आहे. आरोग्यसेवेतील मनुष्यबळ – त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, जरूर ते शिक्षण व साधनसामुग्रीचा पुरवठा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक देशातील सरकार जर आपापल्या देशासाठी जागरूकतेने प्रयत्न करेल तर त्यासाठी इतर जगातून मदत मिळू शकेल. त्याकरिता पुढील दहा वर्षांचा कृति-आलेख बनवलेला आहे. ताकदवान आणि चैतन्यमय आरोग्यदक्ष असे मनुष्यबळ असणे हे आज आणि भविष्यातही उपकारक राहील.
अंतिम ध्येयः
असे मनुष्यबळ हवे जे जगातल्या कुठल्याही रुग्णाला हवी ती मदत व इलाज करून देईल.
आरोग्यकर्मीची व्याख्या अशी ज्या लोकांचा प्रथम व प्रमुख उद्देश आरोग्यसुधारणा हा आहे. असे सर्व जागरूक, कुशल, ध्येयवेडे आरोग्यरक्षक प्रत्येक देशातल्या प्रत्येक खेड्यातनही तयार झाले पाहिजेत. आरोग्यकर्मी आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (चना)साठी येणारे अडथळे: १) अयोग्य किंवा अर्धवट शिक्षण (Training) नीड बेस्ड नसलेल्या सिलॅबस. २) माहिती आणि ज्ञान मिळवण्याच्या संधी उपलब्ध नसणे. ३) संख्येने आरोग्यकामगार कमी असणे व विविध कौशल्ये नसणे. ४) निरनिराळ्या कामांसाठी असमान संख्येने आरोग्यकामगाराची उपलब्धी असणे. ५) नीतीची चाड कमी असणारे, ध्येयाने प्रेरित नसलेले. ६) कामाच्या जागी असुरक्षितता असणे. ७) HRD मनुष्यबळ विकासाच्या क्षमता कमी असणे. (उदा. प्रमोशन नसणे, कामात जिव्हाळा नसणे, कमी पगार वगैरे) ८) आधार देणारे किंवा समजून घेणारे वरिष्ठ अधिकारी नसणे. ९) खाजगी संस्थांशी फारसा चांगला संबंध नसणे. १०) ज्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी ते काम करतात त्यानेच मृत्यू येऊन आरोग्यकर्मीच्या संख्येत घट होणे किंवा काम सोडून जाणे.
कित्येक दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये HIV-AIDS ने होणारे मृत्यू हे आरोग्य कर्मीना काम सोडून जाण्याचे कारण असते. अभ्यासाअंती असे आढळते की चुकीच्या पद्धतीचे रुग्णांचे इलाज बरेचदा त्यांचा मृत्यू घडवतात किंवा गुंतागुंत वाढवतात.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात एकीकडे मनुष्याची अफाट सुखाची परिपूर्ती होण्याच्या प्रगतीबरोबर दुसरीकडे अतीव कमतरता जाणवते. जागतिक आरोग्यपातळीवर नवीन विकसित तंत्रज्ञान आणि नवीन औषधे मनुष्याचा फायदा करून देत आहेत.
दुसरीकडे आकस्मिक दुर्घटना होत आहेत. सबसहारन आफ्रिकेतील अतिगरीब दरिद्री देशांमध्ये कवत-अखउड मुळे आयुर्मर्यादा एकदम श्रीमंत देशांच्या आयुर्मर्यादेच्या अर्ध्यापर्यंत घसरली आहे. त्याचबरोबर जगभरातील गरीब-श्रीमंत देशांमध्ये विषाणुंच्यामुळे होणारे नवे-सार्स, एव्हियन इन्फ्युएंझासारखे साथीचे रोग भीतीच्या लहरी निर्माण करतात, मानसिक रोगांचे आणि वाढणाऱ्या गृहकलहातील हिंसा यामुळे आपण दोन पावले पुढे जातो तर चार पावले मागे येतो.
रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा
रुग्णाला ज्या वेळी मदतीची गरज असते त्यावेळी तातडीने ती भागवली जाणे व कमीत कमी त्रास देऊन त्याला वाचवणे व गुंतागुंत न होता कमी खर्चात बरे करणे. रोगाप्रमाणे इलाज होणे. रोगाचे निदान लवकर करून – त्याप्रमाणे इलाज होणे.
रोग बरा होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी रुग्णाला जरुरीच्या असतात. Right thing at right time. योग्य वेळी योग्य इलाज होणे. त्यासाठी पंचतारांकित दवाखान्याची गरज नसते. महागड्या रूमची गरज नसते. रोगाचे निदान, निदानाप्रमाणे उपचार, हे सर्वांत महत्त्वाचे.
रोगनिदान कसे होते?
वर्षानुवर्षे आरोग्यसेवेत असणाऱ्या लोकांनी अभ्यास करून, संशोधन करून लिहिलेली पुस्तके त्यांच्या अनुभवावर व शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून बेतलेली असतात. विविध रोगांची विविध लक्षणे बहुतेकदा ठरलेली असतात. यात थोडे गणित असते, तर्कशास्त्रही असते. प्रामुख्याने रुग्णाचा आजारी पडल्यापासूनचा इतिहास अतिशय महत्त्वाचा असतो.
तब्येत चांगली केव्हा होती असा प्रश्न विचारल्यावर आजाराच्या लांबीची कल्पना येते. त्यानुसार अनेक प्रश्न तक्रारींच्या संबंधात विचारून डॉक्टर मनाशी गणित मांडत असतात. संपूर्ण इतिहास, कुटुंबातील रोगांची माहिती, आहार, सवयी व्यसने, जीवन जगण्याची पद्धत, रोग्याचा पेशा, स्त्री की पुरुष, वय, धर्म, हे सर्वच इथे महत्त्वाचे ठरते. लक्षणे व इतिहास समजल्यावर काय रोग असू शकेल याची कल्पना येते.
त्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी केली जाते. सामान्य तपासणी म्हणजे नाडी, ब्लडप्रेशर, तपमान, श्वासाची गती, लिम्फ नोड्स, डोळे, जीभ वगैरे. त्यानंतर ज्या संस्थेचा रोग वाटत असेल त्या संस्थेच्या इंद्रियांची तपासणी , आणि शरीरातील इतर संस्थांची तपासणी केली जाते. उदा. पोट दुखणे, उलटी – अशी तक्रार असल्यास – पोटाची पूर्ण तपासणी – रोग्याला झोपवून केली जाते. कधी आंतःतपासणीही जरुरीची ठरते.
त्यानंतर, छाती, श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके व इतर आवश्यक तपासणी करतात. याला उथळपळलरश्र एराळपरींळेप म्हणतात. आधीचा इतिहास व उथळपळलरश्र एराळपरींळेप झाल्यावर बहुतेक वेळा रोगाचे निदान होऊ शकते. क्वचित कधीतरी २ किंवा ३ वेगवेगळी-सारख्या लक्षणांची निदाने होऊ शकतात. त्यानंतर जरुरी त्या रक्त, लघवी, सोनोग्राफी, इसीजी, क्ष-किरण वगैरे तपासण्या केल्या जातात. एकदा निदान पक्के झाले की ठरलेला इलाज केला जातो. त्यात कधी पर्याय असल्यास ते रुग्णासमोर मांडून, समजावून सांगून मग इलाज त्याच्या मताप्रमाणे करता येतो. इलाजासाठी दवाखान्यात राहावे लागू शकते किंवा घरीही इलाज केला जाऊ शकतो.
रुग्ण जेवढ्या लवकर बरा होतो तेवढा त्याला आधार व मदतही कमी लागते. शक्य तेवढा प्रयत्न स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा करणे जरुरीचे.
काही रोगांमध्ये रुग्णाला भावनिक आधार जास्त लागतो. अशा वेळी अशाच इतर रुग्णांची भेट करून देऊन त्यांना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी करता आले तर ते लवकर स्वतःला सावरू शकतात. कधी कधी एकाच रुग्णाला एकाचवेळी २-३ रोगांचा सामना करावा लागतो. उदा. मधुमेह, रक्तदाब व हर्निया. मग क्वचित २ ३ तज्ज्ञ मिळून इलाज करावा लागतो. एकमेकांशी चर्चा करून इलाज करावा लागतो.
रुग्णाला त्याच्या रोगाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास – त्याला सोप्या भाषेत असणारी पुस्तके, फोटो उपलब्ध करून देणे जरूरीचे ठरते. रोग्याला गरज पडल्यास कधीही तो दवाखान्यातील डॉक्टरशी बोलू शकला तर पुष्कळदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी दवाखान्यात येणे, वाट पाहणे, त्रास करून घेणे टळू शकते. डॉक्टरला जरी फी मिळाली नाही तरी हा अनुभव सर्वांच्याच फायद्याचा व वेळ वाचवणारा असतो.
रुग्णाला जेव्हा स्वतःच्या रोगाबद्दलचे शिक्षण दिले जाते तेव्हा तो इलाज घेण्यास मनापासून तयार असतो. समजून औषध घेणे, वेळा पाळणे आणि धीर धरणे या तिन्ही गोष्टी रोग बरा होण्यासाठी आवश्यक असतात. याचसोबत त्या अनुषंगाने राहणीमानात बदल, आहाराच्या सवयीत बदल याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. याचा अनुभव मुख्यत्वे मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये फार फायदेशीर ठरतो. ते उत्तमरीत्या स्वतःच स्वतःचे रोग काबूत ठेवण्यात यशस्वी होतात.
असांसर्गिक जुनाट रोगांचे नियंत्रण केवळ औषधे देऊन होत नाही कारण त्याचा जीवन जगण्याच्या सर्वच अंगांशी संबंध असतो. रोग, औषधे, जगणे परस्परांवर परिणाम करीत असतात. भले अथवा बुरे. अशा परिस्थितीत आज्ञापालन ही उपचारपद्धती कामी येत नाही. जे करायला सांगितले त्यामागची तार्किकता, फायद्याचे प्रमाण समजावून देणे आवश्यक ठरते. एवढेच नव्हे तर जे करायला पाहिजे त्यामागे अडचणी किती मोठ्या आहेत, त्या कोणत्या टप्प्याने कमी करत पार करता येतील, आवश्यक पद्धती टिकवून ठेवण्यासाठी काय अडचणी येतील वगैरे विचार करणे आवश्यक ठरते. त्यासाठी पाश्चात्त्य व्यवस्थेत रोग्याचा “सहभाग, त्याच्याशी विचारविमर्श, वाटाघाटी, उभयतांच्या होकाराने साध्ये ठरवणे व ती साध्य झाल्यास/न झाल्यास कारणे शोधणे असा डॉक्टर/रुग्णाचा समान पातळीवरचा व्यवहार” आजकाल पुढे येत आहे. रोग्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या सर्व पद्धती रुग्णकेंद्रित पद्धतीने इथे एकत्र आणल्या जातात.
टेलेमेडिसिनशास्त्रीय प्रगतीमुळे आता इंटरनेटवरूनही रोग्याशी Video conferencing ने इलाज सांगणे व करवून घेणे दुरूनही शक्य झाले आहे.
आपल्याकडे बंगलोर येथील श्रीनारायण हृदयालया चे प्रख्यात हृदय-शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी प्रथम हा प्रयोग गेली ३-४ वर्षे सुरू केला आहे. आता ISRO च्या माध्यमातूनही असे कार्यक्रम केले जात आहेत.