पत्रसंवाद

‘आर्यांचे निसर्गगीत’
वाहोत हे झुळूझुळू मधु मंद वात
राहो वहात जल गोडचि या नद्यांत
देवोत दुग्ध मधु गोऽऽडचि नित्य गाई, रात्रि-प्रभातही असो,
मधु सौख्यकारी वर्तात गोड जन पार्थिव ते आम्हास
वृष्टीमुळे नभ करो, जग रक्षणास
झाडातुनि मधुरचि रस पाझरोत आरोग्यदायक असो रविची ही ज्योत
वरील निसर्गगीत ऋग्वेदातल्या ऋचा/सूक्ताचा अनुवाद आहे. आर्य (भारतार्य) निरीश्वरवादी होते आणि निसर्गोपासक.
माझ्या सनातनी कुटुंबातून आलेल्या आईने (स्मृतिरूप लीला मोडक यांनी) आमच्या प्रार्थनासमाजी पार्श्वभूमीला सुसंगत म्हणून ही ईश्वररहित ‘प्रार्थना’ आम्हा दोन भावंडांसाठी परवचांबरोबर म्हणण्यासाठी मिळविली होती व आम्हाला गोड चालीवर म्हणायला शिकवली होती. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. आप्पासाहेब उर्फ एस.एस. भावे यांच्याकडे या गीताचे श्रेय जाते.(मुंबई येथील रॉयल सोसायटीमध्ये आमच्या या विद्वान कुटुंबमित्रांचे नाव सुवर्णाक्षरांत कोरलेले आहे). अनुवादकाचे नाव वेगळे असल्यास मला ज्ञात नाही. त्याचप्रमाणे शेवटच्या दोन पंक्ती विसरल्याशा वाटतात. तरी कुणी या निसर्गगीताचा मूळ सोर्स (उगमस्थान) व संबंधित तपशील पुरवल्यास आभारी होईन.
संग्राहक-पद्मजा फाटक, बी ११ अथश्री-२, सुस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१

पद्मजा फाटक स्पष्टीकरण
ता. क.: प्रार्थनासमाज या एकेश्वरवादी पंथातली काही कुटुंबे दुसऱ्या पिढीपासून निरीश्वरवादाकडे सरकली.
अरुण डिके, ५३-बी, प्रेम नगर, इन्दौर ४५२ ००७. मे, जून २००६ च्या ‘शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था’ विशेषांकातील डॉ. पंजाबरावांचे सडेतोड बोल, कॉलिन टज्, बुधाजीराव मुळीक भावना आपटे, थॉमस स्टार्स, अनिल पाटील व दामले यांचे लेख उत्तम! वर्षाकाठी दोन शेती विशेषांक काढावे. अलवरचे राजेन्द्र सिंह, गांधीमार्गाचे अनुपम मिश्र, वन्दना शिवा, जीन कॅम्पेनच्या सुमन सहाय, देवेन्द्र शर्मा यांच्या अनुभवाचा पण लाभ घ्यावा ! वर्ध्याचे तारक काटे, अमरावतीचे सुभाष पालेकर यांनी पण सजीव शेतीचा सखोल, शेतात उभे राहून अभ्यास केला आहे. त्यांचे अनुभव पण वाचकांना आवडतील. शहरी उपभोक्ता (consumers) विशेषकरून गृहिणी यांचा ग्रामीण शेतीत रस वाढला पाहिजे. संपादकीय टिपण ‘कॉलिन टज्’
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील विशेषांकानंतर त्यातल्या कॉलिन टज् (Colin Tudge) याच्या लेखाबद्दल अनेकांनी चिं. मो. पंडित व आमच्याकडे चौकशी केली.
सो रॉल वुई रीप (So Shall We Reap) या टज्च्या पुस्तकातून काही वाक्ये निवडून संबंधित लेख घडवला होता. प्रकाशक ‘अॅलन लेन अॅन इंप्रिंट ऑफ पेंग्विन बुक्स’ या संस्थेची भारतात वितरणव्यवस्था असूनही पुस्तक सहज उपलब्ध नव्हते. “पेंग्विन’शी संपर्क साधून, आगाऊ पैसे भरून (२० पाऊंड), दीड महिन्यानेच पुस्तक मिळाले.
इतर एका ‘पेंग्विन’ पुस्तकाच्या शेवटी या पुस्तकाचे उपशीर्षक दिले होते, जे वाचून पुस्तक ‘गाठावेसे’ वाटले. उपशीर्षक असे ‘येत्या दहा हजार वर्षांत जन्मणारा प्रत्येक जण उत्तम अन्न कसे खाऊ शकेल, पण प्रत्यक्षात आपले निकटचे वंशज घोर त्रासात का असतील’, (How everyone who is liable to be born in the next ten thousand years could eat very well indeed; and why, in practice, our immediate descendants are likely to be in serious trouble.”टज् केंब्रिजला प्राणिशास्त्र शिकला व पत्रकारितेच्या निमित्ताने शेती, पाकशास्त्र, पोषण या क्षेत्रांत मुशाफिरी करून आज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तत्त्वज्ञान केंद्रात संशोधक म्हणून काम करत आहे.
पुस्तक सहज उपलब्ध नसले तरी त्याची अनुक्रमणिका खाली देत आहोत याने कोणाच्या ‘बौद्धिक मालकीहक्कां’ची पायमल्ली होत नसावी!
अनुक्रमणिका
(१) प्रश्नाचे स्वरूप.
(२) शेती म्हणजे काय, ती कशासाठी करायची, ती कशी घडली, व कशी चालते.
भाग | … प्रश्नाचे स्वरूप आणि शेतीचा अर्थ
भाग ||… अन्नः भविष्यकाळ खवय्यांचा आहे.
(३) चांगली शेती, चांगले खाणे, मस्त खवय्येगिरी.
(४) मांस : आपण येवढे कसे चुकलो ?
(५) असुरक्षित अन्न. भाग III … विज्ञान, पैसा आणि जागतिक सत्ता
(६) कारागिरी, विज्ञान आणि पिके वाढवणे.
(७) सुधारित पिके, सुधारित प्राणी, जनुकीय अभियांत्रिकी आणि पैदाशीमागची कला आणि विज्ञान.
(८) जेनेटिकदृष्ट्या परिवर्तित जीव (Genetically modified organism), आणि विज्ञानाचे विकृतीकरण.
(९) ‘मोल’ आणि ‘मूल्य’ (Cash and Value) भाग IV… प्रबोधित शेती
(१०) ‘तयार’ पर्यायः शाकाहार आणि सेंद्रिय शेती.
(११) जीवशास्त्र, नीती, सौंदर्यशास्त्र : प्रबोधित शेतीचा अर्थ.
(१२) ‘कुठे आहोत’ पासून कुठे असायला हवे आहोत!
(पृष्ठसंख्या ४१०, अधिक २७ पाने संदर्भ व सूची.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.