बिोलिंग फॉर कोलंबाइन या वृत्तपटादावारे त्याने अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण कायद्यातील त्रुटी दाखवून गिल्या. स्टुपिड व्हाईट मेन आणि एडन्साईज धिस या पुस्तकांद्वारे अमेरिकेच्या धोरणांमधला वंशवाद आणि कामगारविरोध उघडा पाडला. फॅरनहाइट ९-११ या वृत्तपटातून अमेरिकेच्या इराकबाबतच्या धोरणातील खोटारडेपणा ‘बाहेर’ काढला. हा आहे मायकेल मूर, अमेरिकेतील ‘बुशबाबा’चा आणि रिपब्लिकन स्थितीवादीवृत्तीचा सर्वात उपरोधिक आणि निर्भिड टीकाकार. काही अंशी तो ‘गावरान नोम चोम्स्की’ आहे!
तर मायकेल मूरच्या ड्यूड, व्हेअर्स माय कंट्री या (वार्नर बुक्स २००३) पुस्तकातील हाऊ टु स्टॉप टेररिझम ? स्टॉप बीइंग टेररिस्ट्स!’, या प्रकरणाचा हा संक्षेप
आजी आणि भावी दहशतवादी हल्ले कसे थांबवावे यावरच्या माझ्या सोप्या आणि झटपट अभ्यासक्रमात तुमचे स्वागत! हो, पुढेही हल्ले होतील, हे आपले राज्यकर्ते सतत ओरडून सांगताहेत. मी खूप अभ्यास केला आहे याचा. बुशबाबा जे संरक्षण देतो आहे ते कुचकामी आहे. खरे संरक्षण हवे असेल तर माझे ऐका!
१) त्या ओसामाला पकडाठीक आहे, मी नवे काही सांगत नाही आहे. मला वाटते तो सौदी अरेबियात ‘स्वगृही’ आहेकिंवा इथे न्युअर्कमध्ये, तुमच्या मागेच. पळा!
२) इतर देशांमधील लोकनियुक्त सरकारे पाडायला राज्यक्रांत्या घडवून आणताना त्या नीट घडवा. चिले, इंडोनेशिया, ग्वाटेमाला इथे आपण लोकांनी निवडलेली सरकारे उलथवून अमेरिकन काही नाठाळ समाजघटक आपला दुस्वास करू लागतात. हो, ‘रडवे’ असतात ते, पण त्रास आपल्यायालच होतो ना!
३) हुकुमशाहांना टेकू देण्याने आपण त्यांच्या प्रजेत नावडते होतो. आपण आधार दिलेल्या हुकुमशहांच्या यादीची सुरुवात सद्दाम आणि सौदी राजघराण्यापासून होते. त्यांच्या टाचेखाली चिरडले जाणारे दोष आपल्या माथी मारतात.
४) दक्षिण अमेरिकन हुकुमशहांना मदत करताना जोगतिणी (पीपी) आणि पीठाचार्य (रीलहलळीही) यांना फार संख्येने मारू नका.
५) क्यूबाच्या राष्ट्राध्यक्षांना मारताना नेहेमीच अपयशी ठरू नका. त्याने लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडतो.
६) तीन खंडामधल्या अनेक देशांच्या कोट्यावधी लोकांना इस्राइलांता राग का येतो, ते तपासा. एखाद्या पॅलेस्टीनी पोराच्या बहिणीच्या घरावर रॉकेटचा मारा होतो. त्याला इस्राएली खुणांची, अमेरिकन बनावटीची ‘अपाची’ हेलिकॉप्टर्स ओळखू येतात. अशी मुले वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यावर रस्त्यात नाचणारच ना? पॅलेस्टीनी हल्ल्यांमध्ये इस्त्रायली मुलेमुलीही मरतात, पण त्याने एस्त्राएली लोक पॅलेस्टीन्यांचा निर्वंश करायला धावत नाहीत. त्यांना माहीत आहे की पॅलेस्टीन्यांच्या जागी ते असते तर त्यांनीही आत्मघातकी हल्ल्यांनी हेलिकॉप्टर-रॉकेट्सना उत्तर दिले असते.
असे करू या का? पॅलेस्टीन्यांनाही अपाची हेलिकॉप्टर्स देऊ या! दर वर्षी यांना चार अब्ज डॉलर्स, त्यांना चार अब्ज डॉलर्स. मारू देत एकमेकांना!
७) जगातली ५२ लोक (म्हणजे आपण अमेरिकन) जगातली २५% ऊर्जा वापरतात. आपण, युरोप, जपान मिळून जगातील १६% लोक ८०% वस्तू उपभोगतात. हे जरा हावरट वाटते इतरांना. जर सर्वांना पुरेल इतकी ऊर्जा आणि सामान नाही आहे आणि आपण मोठा हिस्सा ‘लाटतो’ आहोत, तर इतरांना वाटणारच, की त्यांना रोज एका डॉलरमध्ये का भागवावे लागते आहे आणि आपण सहज त्यांना आठवड्याला आणखी पन्नासेक सेंट देवूही शकतो. पण ‘गॉड ब्लेस्ड अमेरिका’, त्याला आपण काय करणार!
८) आपण जगाला पेलाभर पाणी द्यायला हवे. एकशेतीस कोटी लोकांना पेलाभर शुद्ध पाणी मिळत नाही आहे. आणि मी म्हणतो , द्या ते पाणी त्यांना. त्यामुळे जर ते मला मारायला येण्यापासून परावृत्त झाले, तर द्या दांडेचे ते पाणी. स्वस्त पडेल ते आणि हो बेक्टेल आणि नेस्लेंना पाठवू नका तिकडे. ते आधीच अनेक जागी सगळे पाणी ‘हडपून’ स्थानिक लोकांना विकताहेत. तसे नका करू देऊ, त्यांना.
९) लोकांना ते ज्या वस्तू बनवतात त्या विकत घेण्याइतके पैसे मिळू द्या. फोर्डने स्वस्त कार्स बनवून त्या घेणे परवडण्याइतके पगार दिले लोकांना. आज सान साल्वादोरमधल्या मॅन्युएलला एकशेचाळीस डॉलर्सचा स्वेटर विणायला चोवीस सेंट मिळतात. बांगलादेशात तर अगदी गरोदर बायकांसकट साऱ्यांना ‘द गॅप’चे कपडे शिवतानाच्या चुकांबद्दल चक्क थपडा मिळतात. आपण परदेशी जाताना फोर्डचा संदेश विसरतो. फोर्ड ही श्रीमंत होता. आज श्रीमंती पुरत नाही आहे, लोकांना. ‘पुरे झाले’ असे कधी वाटतच नाही. या शेठियांना जरा ‘वाटून खा’ म्हणू द्या नाहीतर आलेच दहशतवादी आपल्या मागे!
१०) पोरांना कामे करायची गरज उरू देऊ नका.
११) लढाईत ‘मुलकी’ लोक मरतात, त्याला ‘उप-नुकसान’ (कोलेटरल डॅसेज) म्हणत जाऊ नका.
१२) जिंकलो’ म्हणताना खरेच जिंकलेले असा. केनेडी, जॉन्सन, निक्सन यांच्या काळात ५८,००० अमेरिकन मेले आणि चाळीस लक्ष व्हिएतनामी, कंबोडियन आणि लाओशिअन्स मेले. आपण आजवर माफीही मागितलेली नाही जिंकताहात कुठले ? विसरणार आहेत का जगातले गरीब लोक ?
१३) एक अगदी खात्रीचा दहशतवाद संपवायचा मार्ग सांगू? ज्या देशाकडे आज संहारक शस्त्रांचा सर्वात मोठा साठा आहे त देशाला ती शस्त्रे ‘तोडून टाकायला’ लावायची. याच देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त लोकांना संहारक शस्त्रांनी मारले आहे. हो मी आपल्याबद्दल, अमेरिकेबद्दल बोलतो आहे. युरेनियम ‘तलवारींचे नांगर’ करा, आणि मग उत्तर कोरिया, भारत, पाकिस्तान, इस्त्रायलना तसे करण्याचे सुचवा. खूप पैसेही वाचतील आणि तरीही इतर कोणत्याही देशाला नमवण्याइतपत शस्त्रे उरतील आपल्यापाशी.
१४) बुशची ‘युद्ध टाळायला आधीच युद्ध’ ही नीती ताबडतोब सोडून द्या.
१५) चोरासारखे बंदूक दाखवून ‘काढ तुझी संहारक शस्त्रे!’ असे दरडावून म्हणू नका. तेल हवे ना? मग थेट तेच ‘मागा’ की!
१६) आपल्याच नागरिकांवर ‘पेट्रियट डॉक्टेची’ दहशत लादू नका. ऑर्वेल वाचा नसला तर मी देईन काही उतारे, त्याच्या लिखाणातले.
१७) एखाद्या गोऱ्या राष्ट्रावरही बाँबवर्षाव करा.
१८) शेवटी – इतरांपुढे चांगला आदर्श ठेवा. तुम्हाला मारू इच्छिणारे लोक फार कमी आहेत. तसे स्वतः मरून इतरांना मारू ईच्छिणारे नेहेमीच असणार. पण म्हणूनच ‘वॉर ऑन टेरर’ हे अफगाणिस्तान, इराक, उत्तर कोरिया, सीरिया, इराणशी युद्ध व्हायला नको.
एक खोल श्वास घ्या आणि मागे हटा. दहशतवादी कसे निपजतात ते पाहा त्यांना पोषक परिस्थिती टाळा.
खरी सुरक्षा जगभरातल्या सर्व लोकांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करून आणि त्यांच्या मनात चांगल्या भविष्याची स्वपके आपण लुटत नाही आहोत, हे पटवून देऊ या!