अत्युच्च पातळीचे विचार, कल्पनाशक्ती आणि सहृदयता हे गुण असणे आणि ते वापरले जाणे, हे साऱ्या व्यासंगात अनुस्यूत असते. त्यानेच व्यासंगाची सर्वाधिक उपयुक्तता घडत असते. (म्हणून) अभ्यासकाच्या कृतींमध्ये व्यासंग असा प्रतिबिंबित व्हायला हवा की त्यातून अभ्यासक माणसांपासून दूर न जाता माणसांकडे ओढला जात आहे, हे सिद्ध व्हावे. व्यासंगातून माणसांची आणि पर्यायाने अभ्यासकाचीही साध्ये गाठली जायला हवीत. अभ्यासातून एखाद्या वर्गाचे लाड पुरवले न जाता साऱ्यांचे प्रबोधन होऊन भले व्हायला हवे. अभ्यासकाच्या कृतींमधून तो नागरिक आहे, कोणाचा पित्तू नव्हे; लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, हलकट अराजकतेचा पाईक नव्हे; हे दिसायला हवे आणि हे सिद्ध करण्याची जबाबदारी अभ्यासकाची आहे. लोकशाहीत नागरिकाला एकच कसोटी लावता येते, आणि ती म्हणजे, ‘तू तुझी कौशल्ये लोकांसाठी वापरतोस की लोकांविरुद्ध ?’
इलुई सलिव्हन हा आर्किटेक्ट, वॉल्ट व्हिटमनच्या संदर्भात व्यासंगाविषयी लिहिताना—-अमेरिकन रनेसान्स या एफ. ओ. मॅथीसनच्या (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९४१ ग्रंथातून.ट