भारताच्या लोकशाहीने काही घोडे मारलेले नाही. दिशाभूल होऊन ताळतंत्र सोडलेल्या आणि कोणत्याही सकारात्मक कामाला हात न घालता केवळ सत्तेच्या निखळ लालसेने मयूर बनलेल्या भ्रष्ट राजकीय पक्षांना ताळ्यावर आणले गेले, तरी भारतीय लोकशाही कार्यक्षम होऊ शकते. लोकशाही ही कमीत कमी दुष्ट राज्यव्यवस्था आहे, की जीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. गेल्या शंभर वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला तर कट्टर मार्क्स-वाद्यांना काय, पण स्वदेशी नाझींनादेखील हे पटू शकेल. फक्त यात गृहीत आहे, ती मध्यमवर्गीयांची आणि राजकीय पक्षांची लोकशाही मूल्यांशी बांधिलकी!
‘या नतद्रष्ट लोकशाहीचे काय करायचे?’ या अरुण साधूंच्या (लोकसत्ता १९ ऑक्टोबर २००३) लेखातील हा उतारा.
अरुण साधू