पत्रसंवाद

स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी मी काहीही लिहिण्याचे टाळतो कारण ते प्रश्न नाजुक तर आहेतच पण त्यातले काही अपरिवर्तनीय वास्तव पुढे मांडणे हे पुरुषी अहंकाराचे लक्षण मानले जाते.
(एखाद्या स्थितीला, ती) “आज आणि इथे आहे या कारणासाठीच मान्यता देणे मला शक्य नाही’ असे तुम्ही म्हणता. परिस्थिती बदलायची धडपड जो कोणी करतो तो असेच म्हणतो. पण वास्तव किती बदलता येईल हा प्रश्न पडतोच. स्त्री ही शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे. ती कामसुखाकरता पुरुषाच्या इच्छेतर अवलंबून आहे (पुरुष मात्र तसा नाही) व बाळंतपण, बाळांना स्तनपान देणे या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तिच्यावर बंधने येतात, ती परावलंबी होते. ही सगळी नैसर्गिक सत्ये आहेत. त्या सत्यांच्या मर्यादेतूनच स्त्रीजीवन सुधारण्याच प्रयत्न करता येईल. केवळ आदर्शवादातून नव्हे. शांतिप्रयत्नांसाठी नोबेल पारितोषिक मिळालेला David Trimble Fund AT A “politician of the possible” seeks to make a working peace, not in some perfect world, that never was, but in this, the flawed world, which is our workshop. … because he is a philosopher of practical politics, not of visionary vapours.
स्त्रिया दुर्बल नाहीत असे म्हणणाऱ्या पुरुषाने स्त्रियांच्या प्रश्नांवर मौन पाळावे. स्त्रिया दुर्बल नसतील तर त्या स्वबळावर आपल्या लढाया जिंकतील. सावरकरी भाषेत लिहायचे म्हणजे “पुरुषांनी साथ दिली तर त्यांच्या साथीने, साथ न दिली तर त्यांना (ललिता गंडभीर, आ.सु. जून 2002, पृ. 100) सोडचिट्ठी देऊन व विरोध केल्यास विरोध मोडून काढून’ स्त्रिया आपले जीवन सफल करतील; त्यांचे त्या बघून घेतील.
त्या अबला आहेत म्हणूनच पुरुषांनी दाक्षिण्य दाखवण्याची गरज असते. दाक्षिण्य दाखवणे यात ‘पुरुषार्थ’ आहे असे मी मानतो. स्त्रियांना त्या दाक्षिण्याची गरज नसेल तर फारच चांगले. [निष्क्रियतेला आवाहन उपयोगितावादाला काडीमोड देते. – संपादक
भ. पां. पाटणकर, 3-4-208, काचीगुडा, हैदराबाद — 500 027

सप्टेंबर २००३ च्या अंकात डॉ. अशोक केळकर व श्री. नारो दाजीबा यांची जुन्या शास्त्रीय शुद्धलेखनात लिहिलेली पत्रे वाचून बहुत आनंद जाहला. वैराण वाळवंटात अचानक पाण्याचा झरा नजरेस पडावा तसे झाले. डॉ. केळकरांचा खाजगीतील पत्रव्यवहार जुन्या शुद्धलेखनात चालतो. असे असता, त्यांच्यासारखे भाषाशास्त्रज्ञ जाहीररीत्या जुन्या शुद्धलेखनाचा पुरस्कार का करीत नाहीत हे एक कोडेच आहे!
एप्रिल २००३ पासून आजचा सुधारकने मराठी लेखनात अरबी वा रोमन अंकांचा वापर सुरू केला आहे असे दिसते. यामागें संपादकांची नेमकी भूमिका काय आहे यासंबंधी संपादक खुलासा करतील काय? त्यांनी तो करावा अशी माझी विनंती आहे.
मला, मराठी विज्ञान परिषदेला व इतर अनेकांना ते जास्त लोकांशी संवाद साधायला आवश्यक वाटते. — संपादक
सत्त्वशीला सामंत, १६, यशोदाकुंज सोसायटी, तेजस् नगर, कोथरूड, पुणे — ४११०३८

सुनीती देव यांची मित्रच्या निमित्ताने ही टिप्पणी (आ.सु. ऑक्टो ०३) वाचल्या नंतर मित्र या नाटकातील कच्चे दुवे जास्त स्पष्ट झाले.
दादासाहेब रूपवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण केल्यास ते मुळातच भित्र्या स्वभावाचे आहेत की काय असे वाटू लागते. स्वतःचे राहते घर सोडून कायमपणे वृद्धाश्रमात राहावे लागेल याच भीतीपोटी नाइलाजास्तव एखाद्या अपरिचित दलित स्त्री-कडून सेवा करून घेण्यास ते तयार होतात. सावित्रीबाईंच्या तोडीची दुसरी नर्स न मिळाल्यामुळे व त्यांच्या(च जातीतल्या) डॉक्टरांच्या आग्रहाखातर लवकरात लवकर बरे होण्यास दादासाहेब या स्त्रीचा आधार घेतात. तिच्या हातचे खाण्यास तयार होतात. जेव्हा माणूस रोगग्रस्त होऊन बिछान्यावर खिळून राहतो तेव्हा जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. याच वैराग्यावस्थेत एखाद्या दलित स्त्रीची मैत्रीसुद्धा स्वीकारली जाते. परंतु हे वैराग्य काही काळच टिकते. मूळ पिंड तसाच राहतो. दादासाहेबांच्या जडण-घडणीत विवेक, बुद्धी, विचार यांच्यापेक्षा आवेगशीलतेचाच (त्द्रद्वथ्मत्खदढय़द्म) भाग जास्त आहे. जे समोर आहे त्याच्याशी तडजोड करून पुढील टप्पा गाठणे हीच वृत्ती प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे डॉ श्रीराम लागूंचा अत्युच्च अभिनयसुद्धा (काही) प्रेक्षकांना मित्रत्वाचा अनुभव देऊ शकला नाही.
केवळ वृद्धाश्रमाचीच नव्हे, तर दादासाहेबांना अमेरिकेतील मुलीकडे कायमचे राहण्याची पण भीती वाटत असावी. म्हणूनच प्रबळ इच्छाशक्ती व सावित्रीबाईंचा करारी, शिस्तबद्ध व व्यावसायिकतेने केलेल्या डॉक्टरी उपचारामुळे दादासाहेब जीवघेण्या आजारातून बरे होतात. त्यात मित्रत्व वा प्रेम यांना स्थान नाही. त्यांच्या बरे होण्यामागे बाहेरच्या देशात जाऊन एकलकोंडे आयुष्य जगण्याची भीती कारणीभूत ठरते.
सावित्रीबाईंसारख्या स्त्रीच्या सेवेपासून वंचित होऊ नये या भीतीपोटी सुद्धा दादासाहेबांनी कदाचित मैत्रीचा हात पुढे केला असेल.
सुनीती देव यांच्याप्रमाणे या नाटककाराला नेमके काय सांगायचे आहे हाच प्रश्न आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना पडतो. एखाद्या छोट्या मारहाणीच्या प्रसंगातून दलितद्वेष उफाळून येत असल्यास दलित स्त्रीच्या निरपेक्ष सेवेने दलितप्रेम तितक्याच प्रमाणात उफाळून यायला हवे होते. नाटक पहात असताना सावित्रीबाईंकडून मैत्री प्रस्थापित करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जात आहेत हेही जाणवले नाही. एक प्रोफेशनल नर्स म्हणूनच सावित्रीबाईंचा वावर आहे. नाटकाच्या अर्ध्याअधिक भागात त्या घुम्याघुम्याच असतात. हा घुमेपणा दलित म्हणून परिस्थितिशरणतेतून आलेला आहे असे जाणवू लागते. म्हणूनच दादासाहेबांच्या (अमेरिकीकरण झालेल्या!) मुलीचा अरेरावीपणा सावित्रीबाई मुकाट्याने सहन करतात. व शेवटी तिला माफही करतात. नाटककाराला दलित स्त्रियांमधील किंवा एकूण स्त्रीवर्गातील परिस्थितिशरणता अधोरेखित करावयाची होती की काय हेही स्पष्ट होत नाही.
एखाद्या असाध्य रोगातून बरे होण्यास इच्छाशक्ती व शक्तीसाठी एखादी प्रेरणा हेच जर सांगायचे असल्यास तोही उद्देश सफल झालेला नाही. सावित्रीबाईंनी केलेल्या वैद्यकीय उपचार पद्धतीतूनच दादासाहेबांचा रोग पूर्ण बरा होतो. इच्छाशक्त उपचारास साथ देऊ शकते. परंतु ते पर्याय होऊ शकत नाही.
प्रभाकर नानावटी, 8, लिली अपार्टमेंट्स, वरदायिनी स.गृ.र. संस्था, पाषाण, पुणे — 411 021 मित्र नव्हे भित्रा !

कोणतीही कलाकृती, जी अनुभवणाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करते, पुढील वाटचालीसाठी वेगवेगळे संकेत पुढे ठेवते, विचार करायला लावते ती निःसंशय उच्च दर्जाची असते व त्या दृष्टीने ‘उंबरठा’ चित्रपट ही उच्च दर्जाची कलाकृती आहे. ह्या संदर्भात सुनीती देव ह्यांना पडलेले प्रश्न मुळातून आदर्शवादाच्या भूमिकेमुळे आहेत असे वाटते. ह्यावर खालील मुद्दे —-
१. सुलभाच्या सासूबाई समाजकार्य करतात म्हणजे त्या थन्डड्डद्धट असव्यात, उदार, मोठ्या मनाच्या असाव्यात, हे आपण गृहीत धरतो, परंतु महाजनांच्या कुटुंबात आदर्शाची चौकट दिसत नाही. ह्याचा अर्थ असाही असू शकतो की दिग्दर्शकाला नेमके ह्याच दुटप्पी धोरणाच्या प्रवृत्तीवर बोट ठेवायचे आहे, जिची उदाहरणे आपल्याला समाजात दिसतात.
देव म्हणतात, मोठी सून ऐकते व सुलभाला ते जमत नाही. व्यक्तीव्यक्तींमध्ये भिन्नता असते. दोन वेगळ्या व्यक्ती एकाच परिस्थितीला वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा देतात व हीच जीवनाची वास्तविकता ह्यात दिसून येते. पुढे देव विचारतात, सासूचा हट्टीपणा का? मुळात प्रश्न आहे की उद्गार? असो. कारण असे की प्रत्येकाचे एखादे स्वभाववैशिष्ट्य असते कोणी अबोल तर कोणी समाजप्रिय, कुणी डदृथ्द्रद्धदृश्त्मत्दढ़ तर कुणी ठुढ़ढ़वढद्मद्मत्ख. तशीच एखादी व्यक्ती हट्टी असू शकते. त्याचे स्पष्टीकरण एकच व की अमुक व्यक्ती अशी का, तर ती तशी घडली आहे म्हणून! तिच्यात बदल घडवून आणायचा असेल तर तो तिनेच घडविला तरच घडतो.
२. सुलभाच्या नवऱ्याचे ‘तू जाणार नाहीस’ हे वाक्य व ती हे ऐकेल ही अपेक्षा पुरुषप्रधान समाज व पुरुषप्रधान सामाजिक मन दर्शविते व तरीही सुलभा जातेच, तेव्हा तिला आचार-विचाराचे स्वातंत्र्य आहे, किंवा ते ती होऊ शकते. हे सिद्ध होतेच. ह्या ठिकाणी—-स्त्रियांच्या संदर्भात सहसा कमीच आढळणारे ‘निवडीचे स्वातंत्र्य’ दिसते. व महाजन कुटुंब त्याला साथ देते हे नोंदण्यासारखे आहे.
३. सुलभा मुंबईसारख्या महानगरातून पदवी घेऊन आलेली आहे व तीही सामाजिक कार्याची, तेव्हा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाबाबत ती अनभिज्ञ का?
सुलभा समाज-कार्याची द्यण्ड्डदृद्ध शिकलेली आहे परंतु व्यवस्थापनाची डुड्डढ्द्धड्डड्ड घेतलेली नाही. हे लक्षात घ्यायला हवे. एखादे तत्त्व, विचार वा माहिती असणे व वास्तवात तिला सामोरे जाणे ह्यात महदंतर असते. वास्तवाची प्रत्यक्ष अनुभूती जीवनाचे वेगळेच अंग आपल्यासामोर आणत असते, ज्यासाठी व्यक्ती मानसिकदृष्ट्या पुष्कळदा तयार नसते—उदा. : मरण किंवा मृत्यू सर्वांनाच एक ना एक दिवस येणार हे माहिती असूनसुद्धा आपल्याच प्रिय व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा ही घटना घडते तेव्हा काय होते, वाटते, हे ज्याचे त्यानेच जाणावे असे आहे.
४. सुलभा नोकरी सोडते म्हणजे ती अपयशी झाली असे मानायचे कारण नाही—-यश/अपयश कशावरून ठरवायचे? एखादी गोष्ट किंवा घटना आपण बदलू शकत नाही हे कळल्यावर त्याचा स्वीकार करणे ह्याला प्रचंड खंबीर मन लागते. प्रामाणिकपणा लागतो. तो सुलभात दिसतो—-शिवाय एखादे कार्य योग्य पद्धतीने न होण्यास अनेक कारणे असतात. त्यांवर आपले नियंत्रण नसते. हे समजून माघार घेणे ही एक शहाणे असल्याची खूण आहे. कधी कधी मदृ ठुड्डड्ड अपयशातूनच व्यक्ती उभरते, विकसित होते, हेही लक्षात घ्यायला हवे—-
५. सुलभा व्यस्त आहे म्हणून नवरा परत जातो—-त्याला कंटाळा येतो, त्यालाही नोकरी आहे, कामे आहेत, असे वाटून तो गेला तर काय हरकत असावी? बायकांनीही असे करावे, परंतु त्या तसे करीत नाहीत हा त्यांचा choice असतो. हे लक्षात घ्यायला हवे —-
६. ह्या मुद्द्याचे उत्तर प्रश्नातच आहे—-परस्त्रीशी नवरा मैत्री ठेवतो म्हणून सुलभा ते घर व कुटुंब सोडून जाते—सुलभाने किंवा इतर विवाहित स्त्रीने असे केले असते—-तर? अशी उदाहरणे कमी असतील पण अशा विवाहितांना नवऱ्यांनी परत स्वीकारल्याची उदाहरणे आहेत व हा आपापसांतील प्रश्न आहे. सुलभाने नवऱ्याला सोडायला नको होते, असा विचार करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आपल्याला समाजात सापडतील.
७. ‘उंबरठा’ ह्या शीर्षकाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या संस्कारित विचारांप्रमाणे लावू शकतो. माझ्या मते हा चित्रपट वास्तवाचे वास्तविक चित्रण केलेला चित्रपट आहे व म्हणूनच कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ ठरलेला आहे.
कल्याणी देशमुख, ‘मेहर’, गोकुळपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.