पत्रव्यवहार

द. रा. ताम्हनकर, ६७५, गव्हे, दापोली, रत्नागिरी – ४१५ ७१२
जुलै-ऑगस्टच्या आ.सु.च्या अंकांत श्री. वि. वा. ताम्हनकर, मिरज, यांनी—-कीव करण्यालायक अशा लेखकांना, संपादकांना, श्री. ढाकुलकरांना आणि मला स्वतःला—-काही शेलक्या शब्दांनी आमचा नालायकपणा थांबवावा अशी ऑर्डर दिली आहे. मी माझ्यापुरते लिहितो.
अहो, वि. वा. ताम्हनकर, मिरज, एवढ्या पत्त्यावर आपणांशी संपर्क साधणे कठीण, म्हणून आपणासाठी आ.सु. मधून हे पत्र. आपण “मला अनभिषिक्त भाष्यकार, मी समजतो” असे म्हटले आहे. मी अज्ञान, ज्ञान, आत्मज्ञानाबद्दल (यांत कदाचित् आपणही असाल) आपापले खंडन-मत मांडून ते खोडून काढून भारतीय जनतेला योग्य ज्ञानाचे दर्शन घडवावे हा त्यात हेतू होता.
मी “काहीतरी लिहीत सुटलो आहे” एवढे आपले मत पुरेसे नाही. आपणासारख्या विचारवंतांनी, सम्यक भाष्यकारांनी, आपले विचार मांडावेत. त्यामुळे आमच्या ज्ञानांत किंवा अज्ञानात भर पडू शकेल असे वाटते.
कलियुग संपायला अजून हजारो वर्षे शिल्लक आहेत. तोपर्यंत भगवंत अवतार घेणार नाहीत, असे त्यांनीच गीतेत म्हटले आहे. म्हणून आपणासारख्यांनी सुदर्शन-चक्राऐवजी हाती लेखणी धरून ज्ञानदीप पाजळावा अशी आपणास नम्र विनंती.
रामनाम जपाबद्दल पुनः केव्हातरी लिहीन.

श्रीधर दामोदर मेहेंदळे, १५ मेघदूत (टेलि. एक्स्चेंज जवळ), टिळक नगर, डोंबिवली (पूर्व) — ४२१ २०१
(निखिल जोशी यांच्या जूनच्या अंकातील पत्राबाबत)
राम-कृष्ण आदर्श नव्हते असे निखिल म्हणतात. हा दावा बहुजनांस मान्य नाही. परिणामी त्यांची अनेक मंदिरे आहेत. ते ऐतिहासिक असतील/नसतील. पण त्यांच्यांतील चांगल्या गुणांचे कीर्तन केले जाते कारण त्या गुणांची जोपासना जन-मानसांत व्हावी.
निखिल यांचा Placebo चा दावा थोड्याफार प्रमाणांत ग्राह्य आहे. तरीपण जाणून बुजून Placebo चा उपयोग स्व-उन्नतीसाठी करून घेतल्याची उदाहरणे आहेत. (१) एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा गुरु मानला. (२) पार्वतीने मातीचा गणपती संरक्षणार्थ ठेवून ती स्नानास गेली. (३) विंदा करंदीकर यांची पुढील कविता स्वयंबोधक आहे.
पत्थराच्या मूर्तिला हा पूजितो वेडा खुळा
आळवितो गाउनी अन् घालितो माळा गळां
पत्थराची मूर्ति ही ना हालते ना बोलते
चेतना नाही मुळी हे सर्वही ठावें मला मात्र ज्या सद्भावना चित्तामध्ये हेलावती सर्वही त्या वाहुनी मी वंदितों या देवीला आणि त्या सद्भावनांचें चाललें हैं पूजन वंदितों ना मी मुळीही पत्थराच्या मूर्तिला वाटतो वाटो तुम्हा निर्जीव ही पाषाण हा माझिया दृष्टीस ही देवीच भासे मंगला.
पूजनी तिच्या सदाही रंगुनी जाईन मी बोलती मातें जरी उपहासुनी वेडा खुळा
आता EEG, Bionics वगैरेसंबंधी खुलासा : www.de/bionik/bionics.htm/ या साइटवर व्याख्या व इतर माहिती आहे. सुमारे १९७३ चे दरम्यान Bionics चा अभ्यास प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. मूलतः Biology+mechanics/electronics असे ग्राह्य असले तरी आता अनेक शास्त्रे (Engineering, Architecture, Maths, Software ) त्यांत अंतर्भूत आहेत. त्याच्या सांकलिक अभ्यासाने EEG, Biofeed- back कातडीतून Pad-Sensor लावून त्यांतून Neural emissions घेऊन त्यानुषंगाने केवळ इच्छेनुसार (हात पाय न लावता) यंत्रे चालविणे वगैरे शक्य झाले आहे. (पहा : CNN.com/2002/HEALTH/02/18/bionic.human/) Weizmann Institute of Science मधील शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे हल्ली दाखविले की electrons-beam वर मानवाच्या ‘पाहण्याचा’ कसा परिणाम होतो. अधिक माहितीसाठी वाचा : (Nature Vol. 391. p. 871-874)
स्व-उन्नतीसाठी Electronics वर आधारित : ‘E 2-Personal Trainer’ नावाचे बॅटरीवर चालणारे व कातडी मार्गे neural emissions देणारे यंत्र बाजारात उपलब्ध आहे. (Newsletter@mindfitness.com)
तसेच त्याच साइटवर American Biotech & Health Training News- letter पहा.
शिवाय पुढील पुस्तके वाचा : “Biomechanics’ by David Bootzin & Harry C. Muffley “Bionics” by Lucien Gerardin “Bionics” by Vincent Masteka “Definition of Subject & Methods of Bionics” by V. I. Bel’kerich & E. U. Vende “The Magic of Senses” by Vitus B. Dreschner.
जुलै-ऑगस्टचा शिक्षणास वाहिलेला जोड अंक विविध पैलूंचे एकत्रित अवलोकन करतो. शिक्षणाचा हेतू व शिक्षणाचे ग्रहण व दान कसे असावे या संबंधीचे संपूर्ण तात्त्विक विवेचन त्यात आहे. शैक्षणिक प्रक्रियेचे ‘आर्किटेक्चर’ त्यात विदित आहे. (त्यामुळे कोणत्याही वादास आवेदन नाही.)
शिक्षणप्रक्रियेला आपल्या खेड्यातील घरापासून लंडनपर्यंत कसे जावे याचा दृष्टान्त मी देत आहे. प्रथम घरापासून बैलगाडीने बस स्थानकापर्यंत जावे. नंतर बसने रेल्वे स्टेशनवर, नंतर रेल्वेने मुंबईला व तेथून विमानाने लंडनला. सर्व रस्ते–मार्ग (म्हणजेच विविध सिलॅबसेस) व वाहने (infrastructure), तिकिटे (entry), तिकिट तपासनीस, वाहक, चालक, कप्तान (शिक्षक, परीक्षक वगैरे) : सर्व मार्ग विचारपूर्वक असावेत व वाहने, चालक/वाहक आपल्या कामात तत्पर आहेत व प्रवाशांनी सर्व सामान नीट घेतले, वेळेवर आले व तिकिट काढले तर प्रवास खात्रीने सुखाचा होईल व मजेत लंडन गाठता येईल.
या करिता आ.सु.च्या अंकांत दिल्याप्रमाणे आर्किटेक्चर व इतर नियमावली पाळली जाणे अपेक्षित आहे. ध्येयप्राप्ती नक्कीच! परंतु बस वाहकाने विमान वाहकासारखे वागू नये. (Skills must be taught gradually & not burdened on youngsters.)
हे सर्व नीट झाले तरीही प्रवासात गर्दीमुळे जीव हैराण होतो. लाइन चुकवून जास्त पैसे देऊन तिकिट मिळते. कधीकधी गर्दीमुळे तिकिट असूनसुद्धा खाली फेकले हेही नमूद करू या. गांधी, पटेल, नेहरू, इंदिरा, राजीव आदि सर्वांना अंत्यविधीच्या वेळी हिंदू पद्धतीनुसार मंत्रोच्चार होऊनच त्यांची चिता पेटवली गेली आहे. (डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अगदी जाहीरपणे सांगून सवरून कुंभमेळ्याला हजेरी लावलेली आहे.) त्यांच्या एकुलत्या एक अपत्याने, इंदिरेने, आणीबाणीच्या नावाखाली काही काळ तर, घटना बासनात गुंडाळून ठेवून, हुकूमशाहीच गाजवलेली आहे.) वंदे मातरम् हेच राष्ट्रगीत होणार ही बाब तर सर्वांनुमते मान्य होती. पण प्रत्यक्षात काय घडले? ‘वृंदताफ्यात वाजवता यावे’ ही सबब पुढे करून नेहरूंनी परस्पर जन गण मन परदेशात वाजवूनही टाकले. दीडएक वर्षापूर्वी नागपूरच्या डॉ. ल. ग. चिंचोळकरांनी “बलात्कार होत असतानादेखील त्या महिलेने गुंडाचा प्राण घेऊ नये तर आत्महत्या करावी.” असे काहीसे गांधींचे मत असल्याचे आ.सु.मध्ये म्हटले होते. नंतर त्यांनी मला एक पत्रही पाठवले होते. त्यात त्यांनी मला हरिजनमध्ये प्रसिद्ध झालेले मूळ आंग्ल भाषेतले उतारेच धाडले होते. (प्र न १ —- Can a woman be advised to take her own life rather than murder? गांधीजीचे उत्तर —- A woman would must certainly take her own life than murder. In other words, murder has no room in my plan of life. [Harijan 9-2-1947] प्र न २ —- If a choice is between taking one’s own life or that of the assailant, which would you advise?
“When it is a question of choice between killing oneself or the assailant, I have no doubt in my mind that the first should be the choice.”
[Harijan 9-2 1947]) (त्यावरचे माझे भाष्य इतकेच पण जे आ.सु.मध्ये प्रकाशित झाले नाही. “भारतात राहत असताना मी जर, “भो चोरा/दरोडेखोरा, तू भले टाटा, बिर्ला, डालमिया आदि मंडळींना लूट हवे तेवढे, पण गरिबांना नाडू नकोस रे.” असे काही बहकलो/बरळलो असतो तर मला थेट येरवड्यालाच पाठवले गेले असते—-आगाखान पॅलेसमध्ये नव्हे तर तुरुंगात तरी वा वेड्यांच्या इस्पितळांत. डॉक्टर महाशय, गांधीवधानंतर गोडसे व आपटे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यांत आल्यावर वा त्यांना फासावर चढवत असताना हरिजनचा तो ९-२-१९४७ चा अंक हातांत घेऊन दिल्लीला का नाही हो धावलात तुम्ही गांधींच्या पट्टशिष्यांना ते उतारे दाखवायला?”)
भारत स्वतंत्र झाल्याला आज ५० वर्षे पूर्ण होऊनही अशिक्षितांपासून अतिशिक्षितांपर्यंत बहुसंख्य भारतीय नागरिक, भले मूर्तिपूजक असोत वा नसोत, व्यक्तिपूजक तर खचितच आहेत. रिकामपणाची कामगिरीमध्ये गडकऱ्यांनी वसंत ऋतूत होणाऱ्या बदलांची नोंद केलेली आहे. त्यांतले एक वाक्य मी थोडेसे बदलतो. “पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो तद्वत् ‘हिंदुत्व’ वा/आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे शब्द कानावर पडताच वा दृष्टोपत्तीस पडताच ह्या विभूतिपूजकांची टाळकीच बिथरतात.”
(इकडे युरोपात व उत्तर अमेरिकेतही इस्लामी लोक राहत आहेत पण त्यांनाही, इतरांप्रमाणेच, द्विभार्याप्रतिबंधक व इतर कायद्याचे पालन करावेच लागते. पण भारतात मात्र . . . .! आंग्ल भाषेत असलेले “Of course we are all equal. It is just that some are more equal than others.” हे सदैव जागरूक रहाणाऱ्या या विद्वानांना एक प्र न विचारल्यावाचून राहवत नाही मला. “भो पंडितहो, पाकिस्तानातल्याच नव्हे तर तमाम इस्लामी राष्ट्रांतल्या अल्पसंख्यकांच्याविषयीपण, हिंदू, ख्रि चन व अन्यही, कणव एकजण चेंडूफळीचा कर्णधार होता. चित्रपटसृष्टीत तर अमाप मंडळी निरनिराळ्या क्षेत्रांत व विविध हुद्द्यांवर आहेत. पाकिस्तानातील/इस्लामी राष्ट्रांतल्या बिगरमुस्लिम मंडळींची अशी छाननी उपलब्ध आहे का कोठे?”
इस्लामी धर्मीयांचे आपापसांत किती गुण्यागोविंदाचे संबंध आहेत ते बघूया का जरा? बांगला देशाच्या जन्मवेळी तेथे उपस्थित असलेल्या हत्यारबंद प. पाकिस्तानी सैनिकांनी पूर्व पाकिस्तानातल्या बिगरशस्त्रधारी दशक झालेली रणधुमाळी, सलमान रश्दीवर निघालेला फतवा, सौदी अरेबियामधल्या श्रीमंत पौकिनांची कामवासना पुरी करण्यासाठी, मुस्लिम/बिगरमुस्लिम वा विवाहित/अविवाहित असा भेदभाव न करता, पाठवल्या जाणाऱ्या गरीब महिला (पुष्कळदा या व्यवहारानिमित्त पैसे उकळणारे त्या स्त्रियांचे निकटचे नातेवाईकच असतात), तसेच त्याच देशांत होणाऱ्या उंटांच्या शर्यतींच्यावेळी त्यांच्यावर बसण्यासाठी लागणारी कोवळी लहान मुले पाकिस्तानातून पकडून/पळवून आणलेली असतात, आदि घटना काय दर्शवतात?
भांगेतच तुळस निपजावी अशीही काही उदाहरणे अलबत आहेत. ‘प्रभात’चे दोन संस्थापक/मालक, विष्णुपंत दामले व एस्. फत्तेलाल यांचे निरपेक्ष व प्रसिद्ध बंधुतुल्य प्रेम—-त्यावरूनच शांतारामबापूंनी काढलेला ‘शेजारी’ हा बोलपट (बापू वाटवे लिखित एक होती प्रभातनगरी)—-जगजाहीर आहे. श्री. सुधीर फडके यांच्या लग्नात कै. महंमद रफींनी मंगलाष्टके म्हटलेली आहेत असा मजकूर कोठेतरी माझ्या वाचनात आलेला आहे.
जिज्ञासू मंडळींनी, ज्ञान प्रगल्भ करण्यासाठी, मराठी भाषेतली ही दोन पुस्तके अवश्य वाचावीत अशी मी जाहीरपणे, आग्रहाची शिफारस करतो.
(१) श्रीमती फ्लोरा सॅम्युएल लिखित संस्कृतिसंगम (ग्रंथाली प्रकाशन) व
(२) श्री. द. स. हर्षे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ ते १९९७ (मनोरमा प्रकाशन).
२. डॉ. महाशयांनी संत ज्ञाने वरांची एक ओवी, “दुरितांचें . . . . . . प्रणिजात”, उद्धृत केली आहे. मी माझ्या संग्रहातली गो. नी. दांडेकरकृत ।। श्री ज्ञाने वरी।। (दुसरी आवृत्ती : जून १९९२) बाहेर काढली. पृष्ठ ८४३ वर मला हा अर्थ आढळला. “दुरितांचे तिमिर हरपावें. वि वांत स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा, आणि जे प्राणिजात जी जी मंगळ इच्छा करतील, ती ती पुरी व्हावी.’ माझ्या ज्ञानांत फारशी काही भर पडली नाही. (विष्णुबुवा जोगकृत ‘सार्थ तुकारामाची गाथा’मध्ये (दहावी आवृत्ती : १९९५) प्रस्तावनेत, पृष्ठ ११ वर, पुढील अर्थ दिलेला आहे. “आपल्या राष्ट्रांत स्वधर्मसूर्याचा उदय होवो, म्हणजे स्वकर्तव्याविषयीची जागृति सर्वांत येवो, व कर्तव्यपराङ्मुख झाल्याने जे पातक झाले आहे ते सर्व नाहीसे होवो आणि स्वकर्मतत्पर जे झाले आहेत ते जी इच्छा करतील ती त्यांची इच्छा पूर्ण होवो, असे मागणे मागितले. . . . . . .” अद्यापिही त्या ओवीच्या पहिल्या अर्ध्या भागाच्या अर्थाबाबत मी अंधारातच आहे. माझ्या तुटपुंज्या ज्ञानावर दुसऱ्या अर्ध्या भागाचा मी काढलेला अर्थ–आस्तिक, मग ते कोणत्याही धर्माचे/पंथाचे असोत, वा नास्तिक, स्त्री/पुरुष, लहान/थोर असा कोणताही भेदभाव न करता (no conditional clause whatsoever) सर्व ‘प्राणिजातां’च्या मनांतल्या इच्छा सफळ होवोत. डॉ. साठ्यांना त्या ओवीत “वैश्विक हिंदुत्व’ कोठे वा कसे आढळले ते मात्र उमजत नाही. तसेच त्यांच्या लेखात अगदी शेवटी शेवटी एक वाक्य असे आहे. “ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्यापासून गांधीपर्यंत ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांनी ते हिंदुत्व अहिंसा व प्रेम या दोन तत्त्वांवरच आधारलेले होते.’ पण वेळप्रसंगी “नेसूंची लंगोटी’ही सोडून द्यायला तत्पर असलेला तुकाराम नाठाळांच्या/आडमुठेपणे वागणाऱ्यांच्या टाळक्यांत काठी हाणायलाही बिनिदक्कत तयार आहे. ‘ठकासी असावें महाठक’ या तत्त्वाचाच पुरस्कर्ता होता तो. ‘अशिक्षित, निरक्षर’ पण तरीही पूर्ण वेदान्त वाणी वदणारा देहूचा वाणी. रामदासस्वामींनी तर, “बुडाला औरंग्या पापी’, “मराठा तेतुका मेळवावा’ आदि संदेश दिलेला आहे. एका हिंदी भाषक संताने तर “काशी की लाज जाती, मथुरा मस्जिद होती। न होता शिवाजी तो, सुन्नत होती सबकी ।।’ असे म्हटले आहे. “कोणत्याही परिस्थितीत तू आपला शेपूट घालून बस स्वस्थ’ ही एकाही संताची शिकवण नव्हती. “अधिक सांगणे न लगे.” असो.
मध्ययुगात भारतात. विशेषतः हिंदू धर्मीयांत, एकापाठोपाठ एक, अनंत संत महंत पैदा झाले व त्यांनी जन्मभर अध्यात्माची फिकीर करत (भले त्यांनी वा नंतर त्यांच्या शिष्यांनी) भारदस्त ग्रंथही लिहिले. आजतागायत त्यांचे मनन/पठण चालू आहे. ठीक आहे हे सर्वकाही. पण त्याच वेळी दुनियेत अन्यत्र काय परिस्थिती होती? बागेत लोळत असताना महाभागाच्या डोक्यावर झाडावरचे फळ आदळले. झाले. त्याने विचारांती गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. दुसऱ्या एकाने “पृथ्वी चौकोनी नसून गोल आहे’ असा प्रचार चालवला. आणखी एकाने दुर्बिणीचा शोध लावला व त्या दुर्बिणीचाच उपयोग करून पुढे “पृथ्वीभोवती सूर्य फिरत नसून सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे’ हे सिद्ध झाले. हा सर्व इतिहास आता सर्वांच्याच परिचयाचा असल्याने मी अधिक लांबण लावत नाही.
तथापि भारत व अन्य देश यांच्यात अशी जमीनअस्मानाची तफावत का या संबंधात कोणी काही प्रकाश टाकेल का? एके काळी सर्व जगाला ‘शून्य’ व ‘दशमान पद्धत’ मुक्त हस्ते बहाल करणाऱ्या भारतीयांनी आजतागायत किती नोबेल पारितोषिके पटकावलेली आहेत?
[श्री गलांड्यांची दोन पत्रे व मागील अंकातील एक पत्र यांचे स्वरूप काहीसे ठिपके जोडून पूर्ण करण्याच्या चित्रकोड्यासारखे आहे. मला जाणवलेले ‘ठिपके’ असे —-
(१) गांधींचे आणि नेहरूवंशीयांचे वागणे—-बोलणे भारतीय राज्यघटनेनुसार नव्हे तर लोकशाही तत्त्वांनुसारही नसे.
(२) मुस्लिमधर्मीय इतरांशी व आपसांतही वाईट वागतात. भारत वगळता इतर बिगरमुस्लिम देश हे सहन करत नाहीत. भारतात मात्र अल्पसंख्य म्हणून मुस्लिमांचे गैरवर्तन सहन केले जाते आणि असे न करणाऱ्या हिंदुत्ववादी—-संघवादी लोकांवर अतिसहनशील विभूतिपूजक सतत रागावलेले असतात.
(३) हे लोक हिंदुत्व हा शब्द आला की वेड्या कुत्र्यासारखे पिसाळतात आणि सहिष्णु अशा संतपरंपरेचा आधार घेतात. पण अन्याय सहन करतच जावे, अशी संतांची शिकवण नाही.
(४) खरे तर संतादींच्या अध्यात्मिक शिष्यांच्या भारदस्त ग्रंथांच्या वाचन-मननात गुंतून न पडता इतर देश विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती करीत भारताच्यापेक्षा फार वेगळे झाले आहेत. हे वेगळेपण चांगल्या दिशेने जाणारे आहे.
आता यातून मला दिसलेल्या ‘रेषा’ अशा —-
(१) साठे (व त्यांच्या लेख आणि ‘धैर्य’ हा उतारा छापणारा आ.सु.चा संपादक) हे हिंदुत्वविरोधी पिसाळलेल्या कुत्र्यांपैकी आहेत.
(२) ते गांधी-नेहरूंचे वागणे न तपासता सारेच ग्राह्य धरणारे अनुयायी आहेत.
(३) गुजरात हिंसाचारावर टीका करणे हे आपोआपच गोध्रा घटनेचे समर्थनही होते. तसेच हिंदुत्वविरोध हे गांधी-नेहरू-काँग्रेस पक्षाचे समर्थनही आहे.
या रेषा आणि त्यांमधून आडवळणाने ‘उभरणारे’ चित्र मला पटत नाही. त्याऐवजी मी खालील काही ठिपके’ रेखतो —-
(१) एखादे वाईट काम करणाऱ्या माणसाचा किंवा माणसांचा धर्म (रंग, वंश, जात, लिंग वगैरे) ‘तपासून’ त्या धर्माच्या (रंगाच्या, वंशाच्या, जातीच्या, लिंगाच्या) सर्व व्यक्तींना दोषी ठरवणे अविवेकी, चुकीचे आणि अत्यंत गर्हणीय आहे.
(२) जर गलांडे म्हणतात तसे ते “सनदशीर मार्गाने —- पोलिसात वर्दी देऊन” दुष्टाव्याचा प्रतिकार करणारे असतील तर त्यांना साठ्यांचा लेख ‘दुखायला’ नको होता, कारण साठे परोपरीने ‘सनदशीर वागायला हवे होते’, असेच सांगत आहेत.
(३) राहता राहिला प्र न पोलिसात वर्दी देण्याचा. “गोध्रा घडवणाऱ्या लोकांच्या धर्माचे लोक दोषी, मग ते अमदाबादेत असोत की वडोदऱ्यात’, या जातीची चिथावणी देणारे हिंदुत्वनिष्ठच होते, यात के. पी. एस. गिलपासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत कोणालाही फारशी शंका दिसत नाही. पण गुजरात पोलिसांना ‘ते’ दिसले नाहीत किंवा त्यांना ‘दुर्लक्ष’ करायला सांगण्यात आले, असे मानायला सामाजिक पुरावे भरपूर आहेत. हे पुरावे कायदेशीरपणा–सनदशीरपणाच्या कसोट्यांवर टिकतील का, तेही गुजरातचे राज्यकर्ते ठरवू पाहत आहेत. कुंपणाने शेत खाल्ल्याचे एक उदाहरण नजरेपुढे असतानाच कुंपणाविरुद्धचा खटलाही कुंपणापुढेच चालणार आहे. याविषयीचा ‘मनस्वी विषाद’ आम्ही व्यक्त करत आहोत. पण तरी कुंपणाच्या इतिहासात’ चांगुलपणा बराच आहे, आणि त्याची कुंपणाला आम्ही आठवणही करून देत आहोत. संत–गांधी यांचा संदर्भ केवळ तेवढाच, कारण त्यांचे इतर सारेच विचार, वागणे, बोलणे आम्ही मान्य केलेले नाहीत.
(४) आणि गलांड्यांनी स्वतःचाच चौथा ‘ठिपका’ पुन्हा निरखावा, कारण मीही तेच म्हणत असतो. त्याकडून लक्ष ढळवणाऱ्या धर्मावर बेतलेल्या गोंधळांचा मला तरी तिटकारा आहे.
— संपादक
नी. मा. डोंगरे ३५/२,माधवी पं. सातवळेकर मार्ग, माहीम, मुंबई– ४०००१६

सहनिवास,
एप्रिलच्या अंकात “मागे एकदा डिस्कव्हर मासिकाने वजने लटकवलेल्या दांडीचा समतोल, याबद्दलचे नियम बदलून वाचकांना असे खेळ खेळायला लावले.” असे वाचले पण हा अंक कोणता याची माहिती नव्हती. त्याच संपादकीयात पुढे “सामाजिक बाबतीतही सध्यापेक्षा वेगळे जग . . .” असा परिच्छेद आहे व त्यात कुसुमाग्रजांच्या ‘कल्पनेच्या तीरावर’ या कादंबरीचा उल्लेख आहे.
असा समाज अस्तित्वात आहे, असा एक उतारा माझ्याकडे असल्याने तो पाठवीत आहे. संदर्भित उतारा असा आहे.
Not all languages have dirty words for sex. Most American Indian tongues don’t, nor do Malayan or Polynesian. The Tobrianders find all the words for sex and sex organs perfectly acceptable and proper. But it would be a grievous social error to ask a Tobrionder girl out to dinner. That’s because their dirty words have to do with chewing and swallowing food. If that seems a little ridiculous to us, the idea of obscenities that are sexual in nature seems pretty laughable to them. Which just goes to show that obscenity is in the ear of the beholder. (Sic).
हा उतारा Donna Woolfolk Cross यांच्या Word Abuse या पुस्तकात पृ. 144 वर आहे. प्रकाशक : Coward Mc Cann & Geoghegan, Inc., New York, 1979.
प्रस्तुत उतारा मी काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांना पाठवला होता. त्यावर त्यांचे ‘उतारा उपयुक्त आहे.’ असे उत्तर आले होते.
डिस्कव्हर उताऱ्याचा तपशील कळवावा.
[(१) Discover, ऑक्टोबर १९८५ मध्ये Intelligence : New Ways to Measure the Wisdom of Man हा Kevin Mckean चा लेख आहे. त्यात Weighty
Mathers on Counterearth ही चौकट या प्रयोगाची माहिती देते.
(२) Abuse मधील उताऱ्याबद्दल धन्यवाद.
संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.