देशाच्या राष्ट्रपतींनी पत्रकारांना प्रश्न करून बुचकळ्यात टाकावे, असा दुर्मिळ योगायोग आज घडला.
वृत्तपत्रांच्या आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ते आपल्या चिरपरिचित शैलीत म्हणाले की, आपण मला प्रश्न करीत असता. आज मला आपणास काही प्रश्न करायचे आहेत.
‘एडिटर्स गिल्ड’ या पत्रकार संघटनेने राष्ट्रपतींशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत कलाम यांनी संपादकांना चार प्रश्न विचारले. त्यांचे उत्तर कुणालाही देता आले नाही. विकसित भारताच्या ध्येयात वृत्तपत्रे सहभागी होऊ शकतात काय? वृत्तपत्रांना पुरेसे स्वातंत्र्य आहे काय? वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी काय करायला हवे? तुम्हाला सर्वाधिक चिंतेत टाकणारी बाब कोणती? असे ते चार प्रश्न होते. त्यांचे कुणीही उत्तर दिले नाही. अगदी व्यस्त असताना कलाम या कार्यक्रमात सहभागी झाले.
[लोकमत, दि. २०/१२/२००२ मधून प्रस्तुत]