श्री. भाटे ह्यांनी रास्त सल्ला डावलला
संपादक, आजचा सुधारक यांस,
आ. सु. च्या जुलै १९९९ च्या अंकात दुस-याच्या मताचे खंडन करायचे असेल तर ते कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ललिता गंडभीर यांची चर्चा या सदरातील टीप (“हिंदू कोण?”) पाहावी. तसेच निकृष्ट तथा सदभिरुचिहीन खंडन कसे करावे याचा नमुना म्हणून त्याच अंकात अनिलकुमार भाटे यांचा लेख (“दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ”) पाहावा, गंभीर यांनी अत्यंत मुद्देसूदपणे, कमीत कमी शब्दांत, आपले म्हणणे मांडले असून त्याचा रोख संपादकाचा अगर कुणाचाही उपमर्द करण्याकडे नाही. याउलट भाटे यांचा मूळ हेतू दि. य. देशपांडे यांच्यावर जास्तीत जास्त वैयक्तिक स्वरूपाची टीका करणे हाच असावा असे वाटते. त्यांच्या लेखातले अनावश्यक (“भारतीय समाजापुढील आर्थिक प्रश्न सोडून या विपयावर लिहिण्याचे प्रयोजन काय?”), व्यक्तिगत टीकात्मक (“देशपांड्यांना यातले काही माहीतच नाही…” या पालुपदाची पुनरुक्ति), आत्मश्लाघात्मक (“तत्त्वज्ञानविपयक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये मी बरेच लेखन करतो”), आणि पाश्चात्यांच्या थोरवीवावत (“पाश्चात्त्य जगतात logical positivism . . . मध्ये असलेल्या अनेक त्रुटी … लक्षात आल्याला अनेक दशके लोटली तरी नागपूरपर्यंत हे ज्ञान कसे नाही पोचले वरे?”), आणि भारतीयांच्या अवनत अवस्थेवावत (“अमेरिकेत कुठल्याही मास्टर्स डिग्रीच्या विद्यार्थ्यांना अवगत गोप्टी भारतीय विद्वान प्राध्यापकांना समजल्या नाहीत…”) असे सर्व विभाग वगळले तर लेखाची शब्दसंख्या वहुतेक निम्यावरच येईल. मला स्वतःला तत्त्वज्ञान हा विषय अवगत नाही आणि अध्यात्मात फारसा रस नाही, त्यामुळे मी अध्यात्म मान्य करावे की नाही यावावतच्या चर्चेत शिरत नाही. त्याचे उत्तर बहुतेक दि. य. स्वतः देतीलच. पण आपल्या मराठी मित्रांचा (रास्त) अभिप्राय’ डावलताना (लेखात वैयक्तिक स्वरूपाचे remarks नसावेत) भाटे यांनी पोरकट कारणे देऊन (“आ. सु. मध्ये वैयक्तिक स्वरूपाचे लेख प्रसिद्ध होतात,” किंवा “देशपांडे यांचे अज्ञान उघड करून त्यांचे लेखन ही प्रक्रिया थांबविण्याचा उत्तम उपाय…’, इ.) देशपांडे यांचेवर जास्तीत जास्त वैयक्तिक टीका भाटे यांनी केली त्याबद्दलच मला लिहायचे आहे. (माझेही आडनाव देशपांडे असल्यामुळे माझे व दि. वं. चे काही नाते असावे अशी शंका भाटे यांना असल्यास तिचे निराकारण आधीच करून त्यांना माझ्या या टिपणीवावत वैयक्तिक लिहायचे असेत तर दुसरे काही शोधावे लागेल असा सल्ला देऊन ठेवतो.)
मी आ. सु. चा जवळ जवळ त्याच्या जन्मापासून म्हणजे दहा वर्षांपासून वाचक आहे. आपल्या मताचे खंडन करताना आपणावर कुणी वैयक्तिक हल्ला केला तर त्यास संपादकीय कात्री अजिवात न लावता तो लेख जसाच्या तसा छापण्याचा दि. यं. चा पायंडा मला ज्ञात आहे. सध्याचे संपादकमंडळ हीच प्रथा चालू ठेवीत आहे हे उघड आहे. पण मला असे वाटते की याही प्रथेचे पालन एवढ्या काटेकोरपणे केले जावेच असे नाही. तरतमभाव असावा.
परंतु ललिता गंडभीर यांच्या टीपेविषयी. त्यांना अनुमोदन देऊन मी संपादकांना विनंती करतो की त्यांनी हिंदू असणे व भारतीय (हिंदूने) भारताखेरीज दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे या दोन संकल्पनांचा घातलेला घोळ स्पष्ट करावा. जे भारतीय अहिंदु (मुसलमान, शीख, बौद्ध, ख्रिश्चन इ.) परदेशात जातात अगर तेथले नागरिकत्व स्वीकारतात त्यांच्या वावतीत संपादकांचे काय म्हणणे आहे? तेही आपला धर्म सोडतात असे मानायचे का? तसेच परदेशात स्थायी होण्यासाठी तेथल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व पत्करणे आवश्यक आहे का? उदा., दक्षिण आफ्रिकेत जे कामगार मजुरीसाठी गेले ते सर्व दक्षिण आफ्रिकेचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व मान्य झाल्यामुळे काय? किंवा भारतातल्या भारतात खेड्यात नोकरी धंदा मिळत नाही म्हणून बायका मुलांस मागे ठेवून शहरी झोपडपट्टीत निवास करणा-या लाखो मजुरांचा ‘त्यांना शहरी संस्कृतीचे श्रेष्ठत्व पटले होते म्हणून ते झोपडपट्टीत राहायला गेले’ असे म्हणून त्यांच्या दुःखावर डागण्या देणार काय?
मधुकर देशपांडे
आज काय करावे ते सांगा
श्री. संपादक, आ. सु. यांस
अंक क्र. १०/४ मिळाला. या अंकाला चे स्वरूप आले आहे. आ. सु. च्याच भवितव्यासाठी हे नुकसानकारक ठरेल.
आ. सु. मध्ये पूर्वी स्त्री-पुरुपसंबंधांविषयी श्री. दिवाकर मोहनी यांचे अनेक लेख आले होते त्या वेळी मी लिहिले होते की आजचा सुधारकने आज काय सुधारू शकते तेवढ्यापुरतेच लिहावे. तेच पुन्हा म्हणतो.
विवेकवादाने तुम्हाला काय अभिप्रेत आहे हे या अंकातील संपादकीयावरून प्रथमच कळले. Rationalism पेक्षा बरेच जास्त काही म्हणजे आधुनिक मानवी मूल्ये (आधुनिक = आज पटणारी) तुम्ही विवेकवादात सामील करता असे दिसते. ही मूल्ये स्थलकालाप्रमाणे वदलत असतात तेव्हा अमके मूल्यच खरे असे म्हणण्याची गरज नाही.
“आम्हाला अन्याय दूर करायचा आहे” हेच जर तुमचे उद्दिष्ट असेल तर देव नाही देव नाही” असे ओरडत बसण्याची गरज नाही. गांधींनी देवाचे नाव घेऊन अन्यायाशी लढा दिला. तेव्हा “अध्यात्माविरुद्ध झोड का उठवता” हा श्री. भाटे यांचा प्रश्न मला रास्त वाटतो. भाटे यांचा तात्त्विक भाग मात्र फारसा पटला नाही. मी तत्त्वज्ञानात पारंगत नसल्यामुळे दोन प्राध्यापकांच्या शिरण्याचे धाडस करत नाही. एकंदरीत माझी धारणा अशी आहे की logic द्वारा सत्य कळत नसते. एकच नव्हे, दहा पर्याय एकाच वेळी खरे असू शकतात असे जरी logic ने सिद्ध करून दाखवले तरी खरे काय आहे हा प्रश्न logic ने सुटत नाही.
अतींद्रिय सत्य ज्ञानचक्षूना दिसते या म्हणण्याचा प्रतिवाद करण्याची गरज आ. सु. ला असू नये. अन्याय-निवारणासाठी त्याची गरज नाही.
भ. पां. पाटणकर
३-४-२०८ काचीगुडा,
हैदराबाद : ५०० ०२७
परमतसहिष्णुतेपेक्षा सदभिरुची श्रेष्ठ
श्री. संपादक, ‘आजचा सुधारक’ यांस
‘आ. सु.’ चा आरंभापासूनचा एक वाचक म्हणून जुलै ९९ च्या अंकात जी एक गोष्ट खूप खटकली त्यावद्दल हे पत्र लिहीत आहे. ती म्हणजे श्री. अनिलकुमार • भाटे यांचा लेख. हा लेख आपण जसाच्या तसा का छापावा हे कळले नाही. ह्या लेखात श्री. नानासाहेव देशपांड्यांसारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंतावद्दल जी उपमर्दकारक भापा वापरली आहे. ती अतिशय निंदनीय आहे. एक तर ती सदभिरुचीला सोडून आहे, असंस्कृत आहे. शिवाय ती सैद्धांतिक तत्त्वचर्चेत शोभत नाही. त्यात जागोजागी प्रकट होणारी लेखकाची दर्पोक्ती देखील अशा लेखनात शोभणारी नाही.
आपण आपल्या परमत सहिष्णुतेच्या धोरणाला सदभिरुचीचे बंधन घालून घेतले तर ते उचितच ठरेल.
विश्वास कानडे