वेश्यावृत्ती जोपर्यंत प्रतिष्ठित स्त्रियांचे पातिव्रत्य ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते तोपर्यंत विवाहसंस्थेला आणखी एका पूरक संस्थेची जोड द्यावी लागते, किंबहुना ही पूरक संस्था विवाहसंस्थेचाच भाग मानावा लागेल. मला अभिप्रेत असलेली संस्था म्हणजे वेश्यासंस्था होय. लेकी ज्या परिच्छेदात वेश्यावृत्ती गृहाच्या पावित्र्याची आणि पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेची रक्षक आहे असे म्हणतो तो प्रसिद्ध आहे. त्यात व्यक्त झालेली भावना व्हिक्टोरियाकालीन आहे, आणि तिच्या अभिव्यक्तीची तन्हा जुन्या वळणाची आहे; पण त्यात वणलेली वस्तुस्थिती मात्र नाकारण्यासारखी नाही. नीतिमार्तडांनी लेकीचा धिक्कार केला आहे. कारण त्यांना त्याचा भयानक संताप आला, पण का ते त्यांना सांगता येत नव्हते; आणि त्याचे म्हणणे खोटे आहे हे ते दाखवू शकले नाहीत. नीतिमार्तंड म्हणतात की पुरुषांनी आपली (नीतिमार्तडांची) शिकवण अनुसरली तर वेश्यावृत्ती शिल्लक राहणार नाही; पण आपले म्हणणे कोणी अनुसरणार नाही हे त्यांना पूर्णपणे माहीत असते, आणि म्हणून सर्वांनी त्यांची शिकवण अमलात आणली तर काय होईल हा विचार अप्रस्तुत आहे.
वेश्यावृत्तीची आवश्यकता भासते याचे कारण असे आहे की अनेक पुरुष एकतर अविवाहित असतात, किंवा प्रवासात आपल्या पत्नीपासून दूर असतात, ब्रह्मचर्य पाळण्याची त्यांची तयारी नसते, आणि परंपरानिष्ट नीतिमान समाजात त्यांना प्रतिष्ठित स्त्रिया उपलब्ध नसतात. म्हणून समाज स्त्रियांच्या एका वर्गाची योजना अशा पुरुषांच्या गरजा पुरविण्याकरिता करतो. त्या गरजांची वाच्यता करण्याची समाजाला लाज वाटते, पण त्या अतृप्त राहू देण्याची त्याला भीती वाटते. या योजनेत सोय अशी असते की वेश्या केव्हाही मागितल्याबरोबर मिळू शकते. एवढेच नव्हे, तर तिला आपल्या व्यवसायाबाहेर कसलेही जीवन नसल्यामुळे ती समाजापासून सहज लुप्त राहू शकते; आणि तिच्या सहवासात आलेला पुरुष आपली पत्नी, आपले कुटुंब आणि आपली धर्मसंस्था यांच्याकडे आपल्या प्रतिष्ठेला धक्का न लागू देता परत येऊ शकतो. परंतु वेश्या विचारी, समाजाची सेवा बजावीत असताना, पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेचे रक्षण करीत असूनसुद्धा, सार्वत्रिक तिरस्काराची धनीण होते आणि ती बहिष्कृत पतित मानली जाऊन सामान्य लोकांबरोबर मिसळण्याला तिला मज्जाव केला जातो. या भयानक अन्यायाचा आरंभ ख्रिस्ती धर्माच्या विजयापासून झाला, आणि तेव्हापासून आजपर्यंत तो चालू आहे. वेश्येचा खरा अपराध हा आहे की ती नीतिमार्तडांच्या शिकवणीचा पोकळपणा उघड करते. फ्रॉईडच्या पहारेकर्याने दडपलेले विचार जसे संज्ञेमध्ये (unconscious) गप होतात, तशीच वेश्याही अज्ञात प्रदेशात दडपली गेली पाहिजे.
वेश्यावृत्ती ही आज जरी तिरस्कृत आणि लपून छपून केली जाणारी गोष्ट असली, तरी ती नेहमीच तशी नव्हती. खरे म्हणजे तिचे मूळ अतिशय उच्च होते. मुळात वेश्या ही देवाला किंवा देवतेला वाहिलेली पुजारीण असे, आणि येणार्या जाणाच्या वाटसराला देह अर्पण करणे ही त्या देवाची किंवा देवतेची पूजा होती. त्याकाळी तिला सन्मानाने वागविले जाई, आणि जरी पुरुष तिचा वापर करीत तर ते तिचा मानही ठेवीत, या पद्धतींविरुद्ध ख्रिस्ती पितरांनी पानेची पाने निर्भत्सना आणि निंदा यांनी भरली आहेत. त्यांच्या मते ही पद्धत ख्रिस्तपूर्व समाजाच्या पूजापद्धतीतील भोगासक्तीची द्योतक असून ती सैतानाच्या कपटातून निर्माण झाली होती. पुढे देवळे बंद झाली, आणि वेश्यासंस्थेला व्यापारी पद्धतीने फायद्याकरिता चालविलेल्या व्यवसायाचे स्वरूप आले, फायद्याकरिता – पण अर्थातच वेश्यांच्या नव्हे, तर ज्यांच्या गुलाम त्या असत त्यांच्या फायद्याकरिता. अगदी अलीकडच्या काळापर्यंत वैयक्तिक वेश्या हा अपवाद होता, आणि बहुतेक वेश्या वेश्यागृहे, कुंटणखाने इत्यादि बदनाम संस्थांतच राहात. भारतात धार्मिक वेश्यावृत्तीचे व्यापारी वेश्याव्यवसायात अजून पूर्ण रूपांतर झालेले नाही. Mother India या पुस्तकाची लेखिका कॅथरिन मेयो हिने त्या देशातील वेश्यांचे वर्णन करताना धार्मिक वेश्यावृत्तीचा उल्लेख केला आहे.
दक्षिण अमेरिकेचा अपवाद वगळता वेश्याव्यवसायाची सर्वत्र पिछेहाट होताना दिसते आहे. याचे कारण स्त्रियांना आता उपजीविकेची अन्य साधने वाढत्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत हे तर आहेच, पण अंशतः हेही आहे की पूर्वीपेक्षा विवाहबाह्य संबंध ब्यापारी हेतूने नव्हे, तर आवडीने ठेवायला तयार असणार्या स्त्रियांची संख्या आता पाच वाली आहे. परंतु तरीही वे या प्रमग नाहीशा करणे शक्य आहे असे मला वाटत नाही. उदा. सागरावर दीर्घ काल प्रवास केल्यानंतर किनार्यावर आलेल्या खलाशाचा विचार करा. त्यांच्याकडे आपणहून येणार्या स्त्रियांचे प्रियाराधन करण्याचा धीर त्यांना धरवेल अशी अपेक्षा करणे कठीण आहे. किंवा विवाहात असंतुष्ट असणार्या पुरुषांचा बराच मोठा वर्ग घ्या, असे लोक जेव्हा घरापासून दूर जातात तेव्हा त्यांना स्वाभाविकच बंधनातून सुटल्याचा अनुभव हवा असणार, आणि तो अशा स्वरूपात की त्यातून शक्य तो मानसिक गुंतवणूक होता कामा नये. परंतु असे असले तरी वेश्याव्यवसाय शक्य तितका कमी असावा असे मानण्यास सबळ कारणे आहेत. त्या व्यवसायाला तीन गंभीर आक्षेप आहेत, एक समाजाच्या आरोग्याला त्यामुळे धोका संभवतो; दोन, स्त्रियांना होणारा मानसिक अपाय; आणि तीन, पुरुषांना होणारा मानसिक अपाय.
सामाजिक आरोग्याला असलेला धोका हा आक्षेप सर्वात महत्त्वाचा आहे. गुप्त रोगांचा प्रसार प्रामुख्याने वेश्यांच्या द्वारा होतो. या समस्येवर वेश्यांचे पंजीयन (registration) आणि त्यांची नियमित परीक्षा हा उपाय शुद्ध वैद्यकीय दृष्टीनेही फारसा यशस्वी ठरलेला नाही. शिवाय त्याने पोलिसांना वेश्यांच्या जीवनावर मिळणार्या पकडीमुळे त्याचा दुरुपयोग होणे शक्य आहे, आणि ज्या स्त्रियांचा धंदेवाईक वेश्या होण्याचा इरादा नसतो, पण ज्या न कळत कायद्याच्या कक्षेत येतात, अशाही स्त्रियांच्या बाबतीत त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. गुप्त रोग ही पापाची न्याय्य शिक्षा आहे ही समजूत जर नाहीशी करता आली तर त्यांचा बंदोबस्त अधिक प्रभावीपणे करणे शक्य आहे. त्या रोगाविरुद्ध प्रतिबंधक उपाययोजना करून त्याची लागण चपच कमी करणे शक्य आहे; पण त्या उपायांची माहिती लोकांना झाली तर त्याने पापाला उत्तेजन मिळेल या भीतीने ती माहिती लोकांना दिली जात नाही. आणि ज्यांना गुप्त रोग लागतो ते पुष्कळदा लाजेमुळे त्याच्यावर उपाय करीत नाहीत, कारण या प्रकारचे आजार लांछनास्पद समजले जातात. आज या बाबतीतील समाजाची दृष्टी पहिल्यापेक्षा उदार झाली आहे निःसंशय, आणि ती जर अशीच सुधारत राहिली तर तिच्यामुळे गुप्त रोगांची लागण बरीच कमी होईल, तरीही अर्थात् जोपर्यंत वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे तोपर्यत रोगप्रसाराचे ते अन्य कोणत्याही साधनापेक्षा अधिक भयानक साधन राहील हे उघड आहे.
उद्या स्वरुपात वेश्याव्यवसाय आज अस्तित्वात आहे त्या स्वरूपात तो उघडच एक अनिष्ट जीवनप्रकार आहे. रोगांच्या भयामुळे वेश्याव्यवसाय हा पांढर्या शिशाच्या वाकमा एक भयावह व्यवसाय आहे हे तर खरेच; पण त्याखेरीज त्यातील जीवन नैतिकता भ्रष्ट करणारे आहे. तो व्यवसाय निरुपयोगी आहे. आणि त्यात मद्यपानाचा अतिरेक होतो. वेश्येचा सर्वच तिरस्कार करतात. तिच्या गि-हाइकाकडूनही ती वाईट कामजात जाते, हा त्या व्यवसायातील एक मोठा दोष आहे. ते जीवन सहजप्नवृत्तिविरोधी असते-एकाद्या भिक्षुणीच्या जीवनाइतकेच सहज प्रवृत्तिविरोधी असते. या सर्व कारणास्तव या स्वरूपात हा व्यवसाय विस्ती देशात आढळतो त्या स्वरूपात तो अतिशय अनिष्ट जीवनप्रकार आहे.
जपानमध्ये मात्र स्थिती अगदी भिन्न असावी असे दिसते. वेश्याव्यवसायाला तिथे जीवनक्रम (career) म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा आहे, एवढेच नव्हे त्याचा स्वीकार आईबापांच्या सल्ल्यानेही केला जातो. लग्नाचा हुंडा जमविण्याचा तो एक फारसा असामान्य नसलेला मार्ग आहे. काही तज्ज्ञांच्या मते जपानी लोक निसर्गतःच थोड्याफार प्रमाणात उपदंशापासून मुक्त असतात. त्यामुळे जेथे नीती अधिक कठोर असते अशा देशातील वेश्याव्यवसायासारखा जपानमधील वेश्येचा जीवनक्रम पतित मानला जात नाही. म्हणून जर वेश्याव्यवसाय कायम राहणार असेल तर तो आपल्याला परिचित युरोपीय प्रकारचा न राहता जपानी प्रकारचा राहणे इष्ट होईल. नीतीचा दर्जा जितका कठोर असेल तितके वेश्येचे जीवन अध:पतित मानले जाईल हे उघड आहे.
वयाच्या सहवासाची जर सवय लागली, तर त्याच्या पुरुषावर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो, संभोगात सुरत घेत असताना सुख देण्याची गरज नाही असे मानण्याची त्याला सवय लागते. तसेच जर त्याला प्रस्थापित नीतिनियमांविषयी आदर वाटत असेल तर ज्या स्त्रीशी तो समागम करील तिच्याविषयी तिरस्कार वाटण्याची प्रवृत्ती वाढेल. या प्रकारच्या मनोवस्थेची वैवाहिक जीवनातील प्रतिक्रिया अतिशय अनर्थकारी होऊ शकेल. एकतर तो विवाहाकडे वेश्यावृत्तीकडे पाहावे तसा पाहू लागेल; किंवा याच्याविरुद्ध, विवाह आणि वेश्यावृत्ती यांत शक्य तितकी जास्त तफावत मानू लागेल.
या जीविषयी आपल्याला गाढ प्रेम आणि आदर आहे तिच्याशी समागम करण्याची इच्छा काही लोकांना होऊ शकत नाही. ह्याचे कारण फ्रॉइडवादी लोकांच्या मते ईडिपस गंड हे होय; पण माझ्या मते त्याचे कारण अशा स्त्रिया आणि वेश्या यांच्यामध्ये अनुलंघ्य दरी आहे असे मानणे हेही असू शकते. पुष्कळ पुरुष, विशेषतः जुन्या वळणाचे पुरुष या टोकापर्यंत न जाता, आपल्या पत्नीला अतिशयोक्त आदराने वागवितात; पण त्यामुळे त्या मानसशात्रीय दृष्ट्या कुमारीच राहतात आणि त्यांना समागमातून सुख घेता येत नाही. याच्या उलट आपल्या पत्नीकडे एकवेश्या म्हणून पाहण्याचे परिणाम वरील परिणामांच्या नेमके विरुद्ध होतात. समागम जेव्हा दोघांनाही हवा असेल तेव्हाच व्हावा, आणि त्याचा आरंभ प्रियाराधनाने व्हावा या गोष्टीचे त्याला विस्मरण होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीशी घसमुसळेपणाने वागतो, आणि त्यामुळे तिच्याठिकाणी असा उबग निर्माण होतो की जो दूर करणे फार कठीण असते.
लैंगिक जीवनात आर्थिक दृष्टीचा प्रवेश नहुनौच आर्थिक मागात अनथविह होतो. लैंगिक संबंध हे परस्परांना सुखदायी होणारे असावेत, आणि त्यांत दोऩ्ही पक्षांनी उत्स्फूर्त ऊर्मीन प्रवेश केलेला असावा. जिथे अशा स्थिती नसते, तिथे मूल्यवान असलेल्या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. या निमाया माद्ध मानता दुसर्या माणसाचा वापर करणे म्हणजे मनुष्यमात्राविषयी वाटणार्या या आदन सव नातीचे मूळ आहे, तो आदर आपल्याजवळ नाही अशी कबुली देणेच होय. कोणाही संवेदनशील मनुष्याला असे कृत्य कदापि आकर्षक वाटणार नाही ना जानने कम शारर इच्छेच्या प्राबल्यामुळे घडले, तर त्यातून पश्चाताप होण्याचा संभव असतो आणि मचात्तप्त अवस्थेत मनुष्याची मूल्यावधारणे (Judgements of value) विपर्यस्त होतात, हे अर्थातच केवळ वेश्यावृत्तीविषयीच खरे आहे असे नसून विवाहविषयीही ते तितकेच खरे आहे. स्त्रीच्या बाबतीत विवाह हे उपजीविकेचे सर्वात सामान्य साधन आहे आणि त्यांना सहन कराव्या लागणाच्या वांछित संबंधाची मात्रा नेमकायापेक्षा विवाहात बहुधा जास्तच असावी. लैंगिक संबंधातील नीती जेव्हा अंधश्रद्धेपासून (Superstition) मुक्त असते, तेव्हा तिचे स्वरूप प्रामुख्याने दुसर्या व्यक्तीसंबंधाने आदर बाळगणे आणि तिच्या इच्छांचा विचार न करता तिचा केवळ आपल्या समाधानाकरिता वापर करण्यास तयार नसणे-असेच असते. जारी वेश्यांना आदराने वागविले गेले, आणि गुप्त रोग नाहीसे झाले, तरी चश्यावृत्तीमध्ये चीन तत्त्वाचा भंग होत असल्यामुळे तो व्यवसाय अनिष्टच राहील.
हॅवलॉक एलिस यांनी वेश्यावृत्तिविषयक आपल्या महत्त्वाच्या ग्रंथात त्या व्यवसायाला अनुकूल असे एक कारण दिले आहे, पण मला ते संयुक्तिक वाटत नाही. तो उच्चिवल न्युत्सवांच्या (orgies) विचारापासून आरंभ करतो हे उत्सव बहुतेक प्राचीन नागरणांत आढळतात, आणि ते मानवांच्या गव्ही आवराव्या लागणा-य अदम्य प्रेरणांना वाट करून देतात. त्याचे असे म्हणणे आहे की वेश्यावयवसायाची उत्पत्ती या राज्युत्सवांतून झाली असून, त्या उत्सवांचा प्राचीन काळी जो उपयोग होता तोच उपयोग काही प्रमाणात वेश्यावृत्तीचाही आहे. तो म्हणतो की अनेक पुरुषांना प्रतिष्ठित विवाहाच्या सभ्य आणि संयमी वातावरणात पूर्ण समाधान मिळू शकत नाही, आणि अशा पुरुषांना वेश्यांकडे मधून मधून जाता येणे हा त्यांना शक्य असलेल्या सर्व उपायांत कमी समाजविघातक उपाय दिसतो. परंतु तत्त्वतः हा युक्तिवाद वर दिलेला लेकीचा युक्तिवादच आहे; फक्त तो अधिक आधुनिक आहे एवढेच. स्त्रियांचे लॉगक जीवन अनिरुद्ध असेल तर त्यांच्या ऊर्मी पुरुषांच्या ऊर्मीइतक्याच प्रमार्थी होऊ शकतात; आणि जर स्त्रियांचे लैंगिक जीवन मुक्त झाले, तर अशा स्त्रियांच्या सहवासात पुरुषांना हवे असलेले समाधान, धंदेवाईक स्त्रियांकडे न जाताहीं, मिळू शकेल. खरे म्हणजे हा स्त्रियांच्या लीगक मुक्तीचा एक मोठा फायदा होणार आहे. माझ्या माहितीनुसार ज्या स्त्रियांची लिगविषयक मते आणि भावना जुन्या प्रतिषेधांनी (taboos) बद्ध नसतात, त्या स्त्रिया विवाहातून व्हिक्टोरियन काळाच्या तुलनेत अधिक पूर्ण समाधान मिळवू आणि देऊ शकतात. जिथे जिथे जुनी नौती क्षीण झाली आहे, तिथे तिथे वेश्याव्यवसायही क्षीण झालेला आहे. ज्या तरुण मनुष्याला पूर्वी मधून मधून वेश्याकडे जाण्याची पाळी येई, त्याला आता आपल्याच वर्गातील मुलींशी समागम मिळू शकतो. हे संबंध दोन्ही बाजूंनी उत्स्फूर्त असून त्यात शारीरिक अंशाइतकाच मानसिक अंशही असतो, आणि त्यांपैकी काहींत उत्कट प्रेमही थोड्याफार प्रमाणात आढळते. कोणत्याही अस्सल नीतीच्या दृष्टिकोणातून पाहिले तर जुन्या व्यवस्थपक्षा ही मोठीच प्रगती म्हणावी लागेल, नीतिमातांना ती पसंत नाही, कारण ती लपविणे कठीण आहे; पण काही म्हटले तरी आचाराचे प्रमाद नीतिमार्तडांच्या लक्षात येऊ नयेत हा काही नीतीचा आद्य नियम नव्हे, तरुण स्त्री-पुरुषांमधील नवीन स्वातंत्र्य ही गोष्ट सवधा स्वागतार्ह आहे असे माझे मत आहे आणि त्यातून पशवृत्ती नसलल पुरुष आणि फाजील दुराराध्य नसलेल्या स्त्रिया यांची नवी पिढी तयार होत आहे. याचा या नव्या स्वातंत्र्याला विरोध आहे त्याने प्रांजलपणे कल कराने की आपण अतिकठोर नौतिव्यवस्थेतून सुटण्याचा वेश्याव्यवसाय हा एकमेव उपाय म्हणून त्याचे समर्थन करतो आहोत.
अनुवादक : म. गं. नातू