[‘A Free Man’s Worship’ हा बरट्रॅंड रसेलच्या अत्युत्प्ट लिखागांपैकी एक निबंध. तो त्याने १९०२ साली म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा निबंध म्हणजे एक तसदर काव्य हे झार तसेच ते विश्वाचे आणि मानव जीवनाचे अतिशय मार्मिक दर्शनही आहे. हे विश्व निर्हेतुक आहे, निष्प्रयोजन आहे, त्यात मानवाची उत्पत्तीही तशीच अर्थहीन, प्रयोजनहीन आहे, हे विश्व मानवाच्या झाकांक्षाविषयी पूर्णपणे उदासीन आहे – या विज्ञानाच्या निर्णयाच्या संदर्भात मानवाने आपल्या ध्येयांची आदराची उपासना कशी करावी या प्रश्नाला रसेलने दिलेले हे उत्तर, साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवलेल्या एका भाषाप्रभूच्या राज्याचा अनुवाद करणे महाकठीण काम आहे. परंतु त्याचा मोडकातोडका का होईना अनुवाद आमच्या वाचकांना उपलब्ध करून द्यावा म्हणून त्याचा अनुवाद करण्याचे धाडस केले आहे. तो वाचकांना क्षमाशील वृत्तीने स्वीकारावा अशी विनंती आहे.
– अनुवादक ]
डॉ. फाउस्टला त्याच्या अभ्यासिकेत मेफिस्टॉफिलीसने सर्जनाची पुढील कहाणी सांगितली. तो म्हणाला:
‘स्वर्गीय गायकगणांनी गायिलेल्या निरंतर स्तुतीचा परमेश्वराला कंटाळा येऊ लागला होता; कारण नाही म्हटले तरी तो त्या स्तुतीला पात्र होताच, त्याने त्या सर्वांना अपार आनंद दिला नव्हता काय? अनर्हत स्तुती मिळविणे, ज्यांना आपण छळतो अशा जीवांच्या आराधनेचा विषय होणे अधिक सुखकर होणार नाही काय?’ परमेश्वर अंतर्यामी हसला, आणि त्या महानाट्याचा प्रयोग करण्याचे त्याने ठरविले.
तप्त तारकामेघ अगणित युगे आकाशात निरुद्देश भ्रमण करीत होता. शेवटी तो आकार घेऊ लागला. मध्यवर्ती पिंडातून ग्रह बाहेर फेकले गेले. ते थंड होऊ लागले. खदखदणारे तप्त समुद्र आणि धगधगणारे पर्वत यांचे तांडव सुरू झाले. कृष्ण मेघपुंजातून उष्ण जलधारांनी नुकतेच घनरूप झालेले कवच पुरात बुचकळून काढले. आणि आता जीवनाचा पहिला अंकुर सागराच्या तळाशी वाढू लागला. फलदायी उबेत त्याचे रूपांतर वेगाने भव्य वन्य वृक्षांत, भीमकाय जलचर प्राण्यांत, प्रजोत्पादन करणार्या, परस्परांशी संग्राम करणार्या, एकमेकांचे भक्षण करणार्या आणि कालांतराने नाहीसे होणार्या भीमकाय प्राण्यांत झाले.
आणि ह्या नाट्यातून शेवटी मानवाचा जन्म झाला. त्याला विचारशक्ती होती, भल्याबुर्याची जाण होती, आणि भक्तीची जीवघेणी लालसा होती. आणि मानवाच्या लक्षात आले की या भ्रांत, राक्षसी जगात सर्व प्राणी जाणारे, नाहीसे होणारे आहेत, आणि त्यांपैकी प्रत्येक काही तरी करून मृत्यूच्या अटळ आदेशापूर्वी जीवनाचे हाती लागतील तेवढे क्षण हस्तगत करण्याकरिता झगड़तो आहे. आणि तो मानव म्हणाला “या संबंध नाटकात एक गूढ हेतू आहे, त्याचा आपल्याला थांग मात्र लागला पाहिजे; आणि तो हेतू चांगला आहे. कारण आपण कशाची तरी भक्ती केली पाहिजे, आणि दृश्य जगात तर काहीच आदरणीय नाही.” आणि मानवी प्रयत्नांनी या अव्यवस्थेतून व्यवस्था निर्माण व्हावी अशी परमेश्वराची इच्छा आहे अशी खात्री पटून मानव या संग्रामातून बाजूला झाला, आपल्या हिंस्र पूर्वजांकडून त्याला प्राप्त झालेल्या सहजप्रेरणांचा त्याने अवलंब केला तेव्हा त्याला तो पाप म्हणू लागला, आणि त्याबद्दल त्याने परमेश्वराची करुणा भाकली. परंतु आपण क्षमेला पात्र आहोत काय याविषयी तो साशंक होता. आणि शेवटी त्याने ईश्वरी कोप शांत करण्याची एक दैवी योजना शोधून काढली. वर्तमान वाईट आहे हे पाहून ते त्याने आणखी वाईट केले, हेतू हा की त्याने भविष्य चांगले होईल, आणि जी सुखे त्याला मिळणे सुलभ होते, त्यांचाही त्याग करण्याची शक्ती दिल्याबद्दल त्याने परमेश्वराचे उपकार मानले, परमेश्वर हसला, आणि त्याच्या जेव्हा लक्षात आले की त्याग आणि पूजा यात मनुष्य परिपूर्ण झाला आहे, तेव्हा त्याने अवकाशात आणखी एक सूर्य पाठवून दिला. तो मानवाच्या सूर्यावर आदळला, आणि वस्तुजाताचे परत तारकामेघांत रूपांतर झाले.
‘छानच खेळ झाला हा!’ तो स्वतःशीच पुटपुटला. त्याचा आणखी एक प्रयोग करू या.
विज्ञान आपल्यापुढे विश्वाचे जे चित्र उभे करते ते स्थूल मानाने असे, किंबहुना याहूनही निष्प्रयोजन आहे. या अशा जगात आपल्याला आपल्या आदर्शाची उपासना करायची आहे. मानव हा अशा कारणांतून उत्पन्न झाला आहे की ज्यांना आपण काय निर्माण करतो याची पूर्वकल्पना नव्हती; त्याची वाढ, त्याच्या आशा आणि त्याची भये, त्याची प्रीती आणि त्याचे विश्वास ही सारी परमाणूच्या अकस्मात् झालेल्या संयोगांतून उद्भवली आहेत; कोणतीही श्रद्धा, कसलेही शौर्य, कसलेही उत्कट विचार किंवा भावना व्यक्तीचे जीवन मृत्यूच्या पलीकडे एक क्षणभरही राखू शकत नाहीत; युगानुयुगांचे कष्ट, सर्व प्रकारची भक्ती आणि स्फूर्ती, मानवी प्रतिभेचे सर्वोच्च तेज, ही सारी सूर्यमालेच्या विराट ध्वंसामध्ये नष्ट होणार आहेत; मानवी विक्रमांचे भव्य मंदिर उद्ध्वस्त विश्वाच्या भग्नावशेषांच्या ढिगार्याखाली गाडले जाणार आहेर्या सर्व गोष्टी पूर्ण निःसंशय नसल्या तरी इतक्या बहुतांशाने निश्चित आहेत की त्या नाकारणारे कोणतेही तत्त्वज्ञान उभेच राहू शकत नाही. या सत्यांच्या चौकटीतच, पराभव न स्वीकारणाच्या निराशेच्या आधारावरच, यापुढे आत्म्याला आपले वसतिस्थान उभे करावे लागणार आहे, अशा परक्या आणि उग्र अमानुष विश्वात मनुष्यासारखा दुर्बल प्राणी आपल्या आकांक्षा मलिन होऊ न देता त्यांचे रक्षण कसे करू शकेल? हे एक चमत्कारिक गूढ आहे की सर्वशक्तिमान् परंतु अंध अशा प्रकृतीने अवकाशाच्या गभीर गर्तेतून भ्रमण करता करता शेवटी अशा अपत्याला जन्म दिला की जे अजून तिच्या अधीन आहे, पण ज्याला दृष्टीची देणगी आहे, भल्याबुयाचे ज्ञान आहे, आणि आपल्या अविचारी मातेच्या कर्माचे मूल्यन करण्याचे सामर्थ्य आहे. मृत्यू हे मनुष्य आपल्या निर्मात्रीच्या अजून ताब्यात असल्याचे चिन्ह आहे. त्या मृत्यूने बद्ध असूनसुद्धा, आपल्या अल्पायुष्यात, मनुष्य परीक्षा करायला, गुणदोषविवेचन करायला, ज्ञान प्राप्त करून द्यायला आणि कल्पनेत सर्जन करायला मुक्त असतो. या संबंध जगात त्याच्या एकट्याच्या जवळ हे सामर्थ्य आहे. आणि यातच त्याच्या बाह्य जीवनावर आधिपत्य गाजविणार्या दुर्निवार शक्तीपेक्षा त्याची श्रेष्ठता आहे. वन्य मानव निसर्गाच्या शक्तीपुढे आपले काही चालत नाही म्हणून चडफडतो; परंतु ज्याविषयी आदर वाटावा असे शक्तीखेरीज त्याच्याजवळ काहीच नसल्यामुळे तो आपल्या देवांपुढे लोटांगण घालायला तयार होतो. ते आपल्या पूजेला पात्र आहेत की नाहीत याचा विचार तो करू शकत नाही. क्रौर्य आणि छळ, अवमान आणि नरमेध यांचा दीर्घ इतिहास अतिशय करुण आणि भयानक आहे. आपल्याजवळ जे सर्वात मूल्यवान असेल ते मुक्तहस्ताने दिल्यानंतर तरी देवतांची रुधिरपिपासा शांत होईल, आणि ते अधिक काही मागणार नाहीत, असे भयकंपित श्रद्धाळू मनुष्य समजतो. रुधिरपिपासू देवांचा हा धर्म म्हणजे आपला स्वामी प्रशंसेस पात्र नाही हा विचार ज्याच्या मनाला शिवत नाही अशा गुलामाची दीन शरणागती होय, आदर्शाचे स्वयंपूर्णत्व त्याला अजून ज्ञात नसल्यामुळे तो शक्तीची पूजा उचित मानतो, आणि तिच्यामुळे अनन्वित दुःखे भोगावी लागूनही तो तिची अमर्याद भक्ती करतो.
परंतु हळूहळू नीतिविचार धीट होतो, आणि आदर्शाचा अधिकार जाणवू लागतो. पूजा जर बंद करायची नसेल, तर ती वन्य मानवाने निर्मिलेल्या देवांहून अन्य देवतांची करावी लागेल. काही लोक आदर्शाची जाणीव झाल्यानंतरही त्यांना नकार देतील, निखळ शक्ती पूजनीय मानतील, परमेश्वराने चक्रवातातून बाहेर आलेल्या जोबला दिलेल्या उत्तरात हीच वृत्ती व्यक्त झाली आहे. त्यात ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी ज्ञान यांचा मोठा देखावा आहे, पण दैवी साधुत्वाचा लेशही नाही. अलीकडच्या काळात जीवनार्थ (survival) संग्रामावर जे नीतीची उभारणी करतात, आणि म्हणतात की जे टिकून राहतात ते सर्वांत पात्रही असतात, त्यांचीही विचारसरणी हीच असते. परंतु नीतिबुद्धीला अतिशय प्रतिकूल असलेले है मत स्वीकारण्यास तयार नसलेले काही जिला आपण विशेषतः धार्मिक वृत्ती म्हणतो ती स्वीकारतात, आणि म्हणतात की वास्तवांचे जग हे आदर्शाच्या जगाशी कुठल्या तरी गूढ अथनि संवादी आहे. अशा रीतीने मनुष्य जे आहे ते आणि जे असावे ते यांच्या गूढ तादात्म्याच्या स्वरूपाच्या सर्वशक्तिमान आणि सर्वसाधु परमेश्वराची निर्मिती करतो.
परंतु वास्तवांचे जग हे चांगले नाही हे निश्चित; आणि आपली मूल्यने त्याच्यावर आधारण्यात गुलामी वृत्तीचा जो एक अंश आहे तो आपल्या विचारातून आपण धुऊन काढला पाहिजे. मानवाची प्रतिष्ठा सर्वच बाबतींत उंचावणे श्रेयस्कर आहे, आणि त्याकरिता अमानवी शक्तीच्या जुलमातून त्याची शक्य तितकी मुक्तता करणे अवश्य आहे. शी बह्वशी अनिष्ट असते, आणि इष्टानिष्ट्राचे भान असणारा मानव ते भान नसणार्या जगात एक असहाय परमाणु आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा आपल्यापुढे फिरून प्रश्न उभा राहील: आपण शक्तीची पूजा करावी की शुभाची? आपला देव अस्तित्वात असणारा पण अशुभ असावा, की तो आपल्या सदसद्विवेकाने आपण निर्मिला आहे हे आपण ओळखावे?
या प्रश्नाचे उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्याने आपल्या संबंध नीतीवर खोल परिणाम होणार आहेत. कार्लाइल, नीत्शे आणि युद्धवादी पंथ यांनी पुरस्कारलेली बलाची उपासना प्रतिकूल विश्वात आपले आदर्श जोपासण्यात आपणास आलेल्या अपयशातून निर्माण झाली आहे. तसे करणे म्हणजे अशुभापुढे सपशेल लोटांगण घालणे होय, आपल्यातील उत्तमांशाचा निर्भेळ बळापुढे होम करणे होय. जर शक्तीचाच आदर करायचा असेल, तर वास्तव पुष्कळदा अशुभ असते हे न ओळखणारे वास्तवाचे खोटे भान नाकारणाच्या शक्तीचा आपण आदर करू या. आपल्या परिचित जगात अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या नसत्या तर बरे झाले असते, आणि आपण जे आदर्श बाळगतो ते जड़ सृष्टीत मूर्त होत नाहीत – हे आपण स्वीकारू या. सत्य, सौंदर्य आणि जीवनात अप्राप्य अशा पूर्णतेचा आदर्श यांपैकी एकहीं जरी अचेतन विश्वाला संमत नसले तरी त्यांविषयी आपल्याला वाटणार्या आदराचे आपण रक्षण करू या. जर बल वाईट असेल, तर आपल्या हृदयातून आपण त्याची हकालपट्टी करू या. शुभाच्या प्रेमाने आपण निर्मिलेल्या ईश्वराचीच आपण पूजा करू, असा निर्धार, आपल्या अत्युत्तम क्षणांत प्राप्त होणाच्या मर्मदृष्टीला प्रेरणा देणारा स्वर्गच आपण मान असा निर्धार- यातच मानवाची खरी मुक्ती आहे. या जगात कर्मे करताना, इच्छा करताना, आपल्याला सतत बाह्य शक्तीच्या जुलूमजबरदस्तीपुढे मान तुकवावी लागते; पण विचार, आकांक्षा यांत आपण मुक्त आहोत, आपल्या बांधवांपासून मुक्त आहोत, ज्यावर आपली शरीरे असहायपणे खुरडत चालतात त्या या क्षुद्र ग्रहापासून मुक्त आहोत, आपण जिवंत आहोत तोपर्यंत मृत्यूच्या जुलमापासूनही मुक्त आहोत. म्हणून शुभाचे दर्शन सतत घडविणारी श्रद्धा आपण अंगी बाणवू या, आणि ते दर्शन सतत यापु न भाग वास्तवाच्या जगात उतरू या.
जेव्हा वास्तव आणि आदर्श यांचा विरोध प्रथम स्पष्ट होतो तेव्हा बंड करण्याची तीव्र वृत्ती, देवांचा भयानक राग, या गोष्टी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रस्थापनेकरिता आवश्यक वाटतात. प्रॉमध्यसच्या अचल निष्ठेने प्रतिकूल मित्राला आव्हान देणे, त्याचे अशी रूप सतत नजरेसमोर देणे. आणि त्याचा सतत द्वेष करणे, बलाच्या दुष्ट शक्तीने आपल्यावर आणलेले कोणतेही दुःख स्वीकारणे हे अनिवार्यापुढे मान तुकविण्यास नाकारणाच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु क्रोध हेही एक बंधन आहे, कारण त्यामुळे आपण अशुभ जगाच्या विचारात गुंतून पड़तो; आणि ज्या उग्न इच्छेतून बंड उद्भवते तिच्यात एक प्रकारची आत्मप्रस्थापना असते—अशी आत्मप्रस्थापना की जिला प्राज्ञ लोक बळी पडत नाहीत. क्रोधात आपण विचाराला दडपून टाकतो, पण इच्छांना नाही; इच्छांच्या विनयनात स्वातंत्र्यांचे सार असते असे मानणाच्या स्टोईक विचारसरणीत विचारांचे विनयन होत नाही. इच्छांच्या विनयनातून संन्यासाचा इष्ट गुण निर्माण होतो; विचाराच्या स्वातंत्र्यातून कला, तत्त्वज्ञान आणि ज्याच्या साह्याने आपण प्रतिकूल जग अर्धेअधिक जिंकतो ते सौंदर्याचे दर्शन–ही उभवतात. परंतु सौदर्याचे दर्शन फक्त अनिर्बध चिंतनालाच, म्हणजे उत्कट इच्छांनी अनाक्रांत विचारालाच, मिळू शकते.
आणि म्हणून मुक्ती फक्त अशांनाच मिळते की ज्यांना जीवनाकडून कोणत्याही वैयक्तिक इष्टाची–कालांतराने क्षय पावणाच्या इष्टाची अपेक्षा नसते.
जरी संन्यासाची आवश्यकता ही अशिवाच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे, तरी ख्रिस्ती धमनि संन्यासाचा पुरस्कार केला यात प्रामिथ्यूसच्या विद्रोहवादी तत्त्वज्ञानापेक्षा जास्त प्राज्ञता दिसून येते. आपण ज्या गोष्टींची इच्छा करतो त्यांपैकी काही अप्राप्य आहेत असे दिसून आले, तरी त्या खरोखर शुभ असतात हे मान्य केले पाहिजे; परंतु अन्य काही गोष्टी कितीही उत्कटपणे वांछित असल्या तरी त्या पूर्ण निर्दोष आदर्शाचा भाग होऊ शकत नाहीत. जे आपण त्यागले पाहिजे ते अशिव असते ही समजूत जरी कदाचित खोटी असली, तरी ती अविनीत लालसेला चाटते त्याहून कमी वेळा खोटी असते. आणि ती कदापि खोटी नसते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाच्या धर्मामुळे अनेक कठोर सत्यांचा शोध लागून आपल्या आशांचे शुद्धीकरण झाले आहे.
परंतु संन्यासात (निवृत्ती – resignation मध्ये) आणखी एक इष्ट अंश आहेः खरोखर चांगल्या असलेल्या गोष्टीही जेव्हा अप्राप्य असतात, तेव्हा हावरेपणाने त्यांची इच्छा करू नये. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी, लवकर किंवा उशीरा, संन्यासाचा क्षण येतो. तरुण माणसांना काहीच अप्राप्य वाटत नाही; एखादी वस्तू इष्ट आहे, तिची उत्कट आकांक्षा आहे, आणि तरी ती अप्राप्य आहे ही गोष्ट त्यांना अनाकलनीय वाटते. परंत मृत्युमुळे, आजारामुळे, दारिद्र्यामुळे किंवा कर्तव्याच्या जाणिवेमुळे आपणा सर्वांना शिकावे लागते की जग आपल्याकरिता निर्माण झाले नाही, आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कितीही संदा असल्या तरी नियती त्या आपल्याला मिळ देणार नाही जेव्हा दुर्दैवाचा फटका बसतो तेव्हा आपल्या आशांचा विध्वंस न चडफडता स्वीकारणे, आणि व्यर्थ उद्वेगापासून दूर होणे यात मोठ्या प्रमाणात धैर्य सामावलेले आहे. बळापुढे एवढी शरणागती उचित आहे, एवढेच नव्हे तर तो प्राज्ञतेचा आरंभ आहे.
परंतु निष्क्रिय संन्यास म्हणजे पूर्ण प्राज्ञता नव्हे; कारण केवळ संन्यासाच्या साह्याने आपण आपल्या आदेशचे मंदिर बांध शकत नाही. त्या मंदिराचे भान टाकणारे पूर्वावतार आपल्याला कल्पनेच्या भरायांत, संगीतात, वास्तुकलेत, प्रज्ञेच्या क्षोभरहित प्रदेशात, आणि भावगीतांच्या सोनेरी जादूत पाहायला मिळतात. त्यात दुःखाच्या स्पर्शापासून दूर, परिवर्तनाच्या भीतीपासून लांब, वास्तवांच्या जगातील अपयशे आणि भ्रमनिरास यांच्यापासून मुक्त, असे सौंदर्य नांदते, विराजते. या गोष्टींच्या चिंतनातून स्वर्गाचे दर्शन आपल्या हृदयात आकार घेईल, त्याच्या साह्याने आपल्या भोवतालच्या जगाला लावायची कसोटी आपल्या हातात येईल, आणि तसेच त्या पवित्र मंदिराचे दगड म्हणून वापरण्याकरिता या जगातील वस्तूंना आकार देण्याची स्फूर्तीही मिळेल. जे अत्यंत थोडे महात्मे जन्मतःच निष्पाप असतात ते सोडून दिले तर बाकीच्या जीवांना त्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एका अंधार्या गुहेतून जावे लागते. त्या गुहेचे द्वार म्हणजे हताशता; त्या गुहेची भूमी त्यक्त आशांच्या समाधिप्रस्तरांनी बांधलेली असते. तिथे अहंकार नाहीसा व्हावा लागतो; तिथे उत्कंठा, अविनीत लालसेचा लोभ, ह्यांचा नाश व्हावा लागतो, कारण त्यायोगेच आत्म्याची नियतीच्या साम्राज्यातून सुटका होऊ शकते परंतु गुहेतून बाहेर पट्टण्याचे द्वार – संन्यासाचे द्वार -ओलांडले की आपण प्राज्ञतेच्या प्रकाशात येतो. त्याच्या तेजाने एक नवी मर्मदृष्टी, एक नवीन आनंद, एक नवीन करुणा ही प्रगट होतात आणि यात्रिकाचे हृदय आनंदाने भरून जाते.
बलहीन विद्रोहाचा कडवटपणा न अनुभवता, जेव्हा आपण नियतीच्या बाह्य शासनाचा स्वीकार करण्यास आणि अमानवी जग आपल्या पूजेस अपात्र आहे. हे ओळखण्यास शिकतो, तेव्हा अचेतन विश्वाला आपल्या कल्पनेत आपल्या मनासारखे रूप देणे शक्य होते, आणि त्यायोगे जुन्या मातीच्या मूर्तीच्या जागी भास्वर सोन्याची मूर्ती स्थापता येते. जगातील सर्वच बहुरूपी वास्तवात–वृक्ष, पर्वत आणि मेघ यांच्या दृश्य आकारांत, मनुष्याच्या जीवनातील घटनांत-फार काय मृत्यूच्या अपार शक्तीतही–सर्जनशील आदर्शवादाच्या मर्मदृष्टीला तिच्या स्वतःच्या विचारांनीच घडविलेल्या सौंदर्याचे प्रतिबिंब दिसू शकते. याप्रकारे आपले मन अचेतन शक्तींवर आपले आधिपत्य प्रस्थापित करते. ज्या द्रव्याशी त्याला व्यवहार करायचा आहे ते जितके अधिक अशिव, अप्रशिक्षित इच्छांना जितके अधिक बाधक, तितकाच अनुत्सुक पाषाणाला त्यात दडलेली संपत्ती आपल्या हवाली करण्यास तयार करण्यातील विक्रम मोठा, विरोधी शक्तींना त्या विजयाची शोभा वाढविण्यास बाध्य करण्यातील या अधिक आभिमानास्पद, सर्व कलांत शोकात्म नाटक सवति उत्तुंग, सर्वात जयशाली, कारण ते आपला तेजस्वी दुर्ग शत्रूच्या मुलखाच्या मध्यभागी, त्याच्या सर्वांत उंच पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर बांधते. त्याच्या अभेद्य टेहळणी–बुरुजावरून शत्रूची शिबिरे, त्याची शस्त्रागारे, त्याच्या सेना आणि किल्ले–ही सारी दृष्टिपथात येतात. त्याच्या कोटाच्या आत मुक्त जीवन अनिर्बध चालू असते, आणि मृत्यू, वेदना आणि निराशा यांच्या चमू आणि जुलमी नियतीचे सर्व सेनानी त्या निर्भय नगरातील रहिवाशांना सौंदर्याची नवनवीन दृश्ये दाखवितात. धन्य ते पवित्र प्राकार, आणि त्रिवार धन्य त्या सर्वसाक्षी उन्नतभूमीवर राहणारे रहिवासी! त्या शूरवीरांचा विजय असो, ज्यांनी युगानुयुगे संग्राम करून स्वातंत्र्याचा अमूल्य वारसा जतन करून ठेवला आहे, आणि अजिक्य वीरांचे वसतिस्थान विडंबक आक्रमकांच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राखले आहे.
परंतु शोकात्म नाटकामुळे जीवनात सर्वदा सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हजर असलेले एक वैशिष्ट्य प्रगट होते. मृत्यूच्या प्रसंगात, असह्य वेदना सहन करण्यात, आणि अतीत भूताच्या अनन्यथाकरणीयतेत एक प्रकारची उदात्तता आहे, एक अभिभावक भयादर, एक विराटाची भावना, अस्तित्वाची अगाध गूढता आहे. या सर्वांच्यामुळे दुःख भोगणारा वेदनेच्या कुणा विलक्षण बंधाने, शोकाच्या पाशांनी या जगाला बांधला जातो. मर्मदृष्टीच्या या क्षणांत आपल्या अल्पकालिक इच्छांचे औत्सुक्य नष्ट होते, क्षुद्र लक्ष्यांच्या प्राप्त्यर्थ होणारी सर्व धडपड संपते, उथळ दृष्टीला महत्त्वाच्या वाटणाच्या दैनंदिन जीवनातील सर्व तुच्छ गोष्टींविषयींचा प्रयत्न थांबतो, मानवी मैत्रीच्या अस्थिर प्रकाशाने उजळलेल्या आपल्या चिमुकल्या तराफ्याभोवती पसरलेला महासागर दिसतो. त्याच्या रोरावणाच्या लाटांवर आपण इतस्ततः फेकले जात असतो. बाहेरच्या भयाण रात्रीतून थिजवणाच्या थंडीचा झोत आपल्या होडक्यावर येतो. प्रतिकूल शक्तींच्यामध्ये सापडलेल्या मानवाचा एकाकीपणा व्यक्तीच्या आत्म्यात केंद्रीभूत होतो; आपल्या आशा आणि भये यांच्याविषयी पूर्ण बेफिकीर असणान्या उभ्या विश्वाच्या माध्याशी त्याला एकट्यानेच, आपले असेल नसेल ते सर्व धैर्य एकवटून झगडावे लागते. अंधकाराच्या बळाविरुद्ध विजय मिळविणे ही वीरांच्या समाजात प्रवेश मिळण्याची खरी दीक्षा आहे. बाह्य जगाशी झालेल्या त्या भयानक युद्धातून संन्यास, प्राज्ञता आणि भूतदया यांचा जन्म होतो. आणि त्यांच्या जन्मानंतर एका नवीन जीवनाचा आरंभ होतो. ज्या अनिवार्य शक्तींच्या हातातील आपण बाहुली आहोत असे वाटते त्या शक्तींचा – म्हणजे मृत्यू आणि परिवर्तन, अतीताचे अनन्यथाकरणीयत्व, एक निरर्थक गोष्टीकडून दुसर्या निरर्थक गोष्टीकडे होणार्या विश्वाच्या अंध धावपळीत मानवाची बलहीनता यांचा अनुभव घेणे आणि त्यांचे स्वरूप समजून घेणे यानेच त्यांच्यावर विजय मिळविता येतो.
अतीताच्या जादूचे हे कारण आहे. त्याच्या अविचल आणि निःशब्द चित्रांचे सौंदर्य शिशिर ऋतूच्या मंत्रमुग्ध पवित्रतेसारखे असते-वृक्षांची पिकलेली पाने एका उछ्वासाने गळून पडतील असे वाटते, पण ती सोनेरी तेजाने तळपत असतात, अतीत बदलत नाहीं की कसली धडपड करीत नाही. डंकनप्रमाणे जीवनाच्या ज्वराक्रांत धकाधकीनंतर ते शाँत पहुडलेले असते. जे आसक्त आणि आक्रमक होते, जे क्षुद्र आणि क्षणजीवी होते, ते नाहीसे झाले आहे, जे सुंदर आणि शाश्वत आहे ते रात्री प्रकाशणार्या तार्यांप्रमाणे प्रकाशमान झाले आहे. त्याचे सौंदर्य अनुभवण्याला अपात्र असणार्याला ते असह्य होते, पण ज्या आत्म्याने नियतीला जिंकले आहे त्याला त्यात धर्माचे रहस्य सापडते.
मानवाचे जीवन बाह्यतः पाहता, निसर्गाच्या शक्तींच्या तुलनेत, एक अतिशय क्षुद्र अशी गोष्ट आहे. गुलामाला काळ, नियती आणि मृत्यु यांची पूजा करण्यावाचून गत्यंतर नसते, कारण ती सर्व त्याच्याजवळ असणाच्या कशाहीपेक्षा महान आहेत, आणि तो ज्या गोष्टींचा विचार करतो त्या सर्वांना वरील शक्ती गिळंकृत करतात. पण या गोष्टी महान असल्या तरी त्यांच्याविषयी महान विचार करणे, त्यांचे निर्विकार तेज अनुभवणे हे त्याहून महान आहे. अशा विचाराने आपण मुक्त मानव होतो. अनिवार्यापुढे आपण पौर्वात्य दीनपणाने मान तुकविण्याची गरज नाही हे आपल्या लक्षात येते. आपण ते आत्मसात् करतो, आपल्यात समावून घेतो. वैयक्तिक सुखासाठी धडपड थांबवणे, तात्कालिक इच्छाविषयी औत्सुक्याचा त्याग करणे, शाश्वत गोष्टींचा ध्यास लागणे हीच मुक्ती आहे. आणि हीच मुक्त मानवाची पूजा आहे. ही मुक्ती नियतीच्या चिंतनाने प्राप्त होते, कारण नियतीही मानवाकडून पराजित होते. काळाच्या दाहक अग्नीला भस्मसात् करायला मानवाने काही शिल्लकच ठेवलेले नसते.
समान अंताच्या शिक्षेने आपल्या बांधवांशी बांधल्या गेलेल्या मुक्त मानवाला एक नवे दर्शन सतत आपल्याजवळ आहे याची जाण असते, आणि ते दर्शन त्याच्या प्रत्येक कर्मात प्रेमाचा प्रकाश पाडीत असते. मानवाचे जीवन ही रात्रीतून करावी लागणारी एक दीर्घ यात्रा आहे; तिच्यात भोवताली अदृश्य शत्रूचा वेढा असतो; थकवा आणि वेदना यांची पीड़ा सतत होत असते. त्या यात्रेच्या अंतापर्यंत फारच थोडे पोचतात, आणि तेथे कोणीही फार काळ राहू शकत नाही. आपण पुढे जात असताना आपले साथीदार सर्वशक्तिमान मृत्यूच्या निःशब्द आज्ञेने एकामागून एक आपल्या नजरेआड होत असतात. त्यांना मदत करण्याकरिता फारच थोडा वेळ असतो. त्यांच्या मार्गात सूर्यप्रकाश पसरणे, सहानुभूतीच्या अंजनाने त्यांचे दुःख हलके करणे, कधीही क्लांत न होणार्या स्नेहाचा आनंद त्यांना देणे, डळमळणाच्या धीराला बळ देणे, निराशेच्या क्षणी विश्वास उत्पन्न करणे ही कामे आपल्या हातून होवोत. आपण त्यांच्या गुणदोषांचे मोजमाप कृपण काट्यावर करू या नको. आपण फक्त त्यांच्या गरजांचाच म्हणजे त्यांची दु:खे, त्यांची अडचणी, किंवा त्यांच्या क्लेशांना कारणीभूत झालेले अदूरदर्शित्व यांचाच विचार करू या. आपण एकाच अंधकारातील सहप्रवासी आहोत, एकाच शकिनाट्यातील पात्रे आहोत. आणि म्हणून त्यांचा दिवस जेव्हा संपेल, जेव्हा त्यांच्यातील भले आणि बुरे दोन्ही अतीताच्या अमरत्वाने शाश्वत होतील, तेव्हा आपल्याला म्हणता येऊ दे की जिथे ते अपेशी झाले, जिथे त्यांच्या वाट्याला दुःख आले, तिथे आपले कोणतेही कर्म कारणीभूत नव्हते; परंतु जेव्हा जेव्हा दैवी प्रकाशाची ठिणगी त्यांच्या जीवनात पेटली, तेव्हा तेव्हा प्रोत्साहन, सहानुभूती, उदात्त धीराने उजळलेले उत्तेजनाचे निर्भय शब्द इत्यादींसह त्यांच्या सोबतीला आपण हजर होतो.
मानवाचे जीवन अल्प आणि बलहीन आहे, त्याच्यावर आणि त्याच्या सबंध वंशावर मंद पण निश्चित सर्वनाशाची अंधकारमय निष्करण छाया पडलेली आहे. भल्याबुयाविषयी उदासीन असणारा, विध्वंस करायला न कचरणारा, सर्वशक्तिमान अचेतन निसर्ग आपला मार्ग निघृणपणे आक्रमीत असतो. मानवाला शाप आहे, आज आपले प्रियतम गमावण्याचा, आणि उद्या स्वतः अंधःकाराच्या द्वारातून निर्गमन करण्याचा, तो शेवटचा प्रहार पड़ण्याआधी आपला छोटासा दिवस उदात्त करणारे महान विचार जतन करणे, नियतीच्या दासाला वाटणार्या भेकड भयांचा तिरस्कार करीत आपण स्वतःच्या हातांनी बांधलेल्या मंदिरात पूजा करणे, दैवाच्या साम्राज्याने विचलित न होता बाह्य जगावर चाललेल्या त्याच्या अनियंत्रित अधिराज्यापासून आपले मन मुक्त राखणे, आपले ज्ञान आणि आपण केलेला धिक्कार किंचित्काल सहन करणाच्या अनिवार्य शक्तींना साभिमान आह्वान देत, अचेतन शक्तींच्या बेगुमान मार्गक्रमणाला न जुमानता आपण स्वतः निर्मिलेले आदर्शाचे जग एकाकीपणे, श्रांत, पण हार न मानणाया अँटलसप्रमाणे सावरणे-एवढेच त्याच्या हातात आहे.