संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसास विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित्त मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणार्यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी निर्दोष सुटतात है। सिद्ध केले तर (व तसे सहज शाक्य आहे) खून करण्याची प्रवृत्ती वाढेल. पाप व पुष्प या कल्पना विवेकवादाच्या कसोटीवर उतरत नाहीत, परंतु ८०-९०% लोकांच्या मनावर या कल्पनांचा पगडा असल्यामुळे ते चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. या वृत्तीमुळे भारतात घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. याचा अर्थ या अंधश्रद्धांचा मी पुरस्कार करतो असे नव्हे. चांगले वागणे हे नीतिमत्तेस धरून आहे हे लोकांच्या मनावर ठसले पाहिजे. पण आपल्या लोकांना बडगा दाखवल्याशिवाय चांगले वागणे माहीत नाही. नाहीतर सार्वजनिक ठिकाणी जी घाण दिसते ती दिसलीच नसती.
विवेकवादानुसार वैज्ञानिक सिद्धान्त तर्काच्या कसोटीवर घासून घेता येतात. एखादा सिद्धान्त (उदा. न्यूटनचा) प्रस्थापित होतो याचे कारण त्यानुसार अनेक वास्तवांचा उलगडा करता येतो किंवा काही वास्तवे सिद्ध करता येतात. उदा. पृथ्वी गोल आहे म्हणून त्या वास्तवाचा स्वीकार करणे इष्ट. परंतु यापुढे जाऊन पृथ्वी गोलच का आहे? या प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही; म्हणून त्याची कारणे शोधणे अयोग्य नाही. E = mc^2 हा सिद्धांत आइन्स्टाइनने मांडला; परंतु हे असे का होते यावर मात्र त्याला यापलीकडे कुठली तरी दाक्ती आहे व तिच्या नियंत्रणाने या गोष्टी घडतात असे म्हणावे लागले. आइन्स्टाइनने असे उद्गार काढले याचा अर्थ तो अंधश्रद्ध होता असा तर घेता येणार नाही. एकाच प्रकारच्या मातीत, एकाच परिस्थितीत लावलेल्या १०० बीजांपैकी ५० च उगवतात व ५० उगवत नाहीत. पन्नास का उगवतात याचे उत्तर विज्ञान देते; पण ५० च का उगवतात याला मात्र त्याला हात वर करावा लागतो. त्याहीपुढे जाऊन तीच ५० का उगवतात हा प्रश्न तर आणखीच अवघड आहे. १०० फूट दरीत गाडी कोसळून किंवा हजारो फुटांवरून विमान कोसळून सर्वच्या सर्व माणसे मरतात व एखादा मात्र अगदी सहीसलामत सुटतो याचे कारण काय?
स्टॅटिस्टिक्सला विवेकवादानुसार दाख म्हणता येते. त्यानुसार हवामानाचे अंदाजच असले तरी विवेकवादी ते मान्य करतो. (अनेकवेळा ते खोटे ठरले तरी.) मात्र भविष्य सांगणाच्याचा तो उपहास करतो. भविष्य सांगणारयाने जर स्टॅटिस्टिक्सच्या आधारे भविष्य सांगितले तर तेही हवामानाच्या अंदाजाइतकेच बरोबर वा चूक ठरण्याची शक्यता आहे.
विज्ञानाने एखादी गोष्ट सिद्ध करणे शक्य नसेल तर ती विवेकवादी मान्य करत नाही; पण ती गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात असली तर विवेकवादी ती अमान्य करणार की काय? उदा. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिणे ही गोष्ट कुठल्याच वैज्ञानिक निकषावर बसणार नाही. ज्ञानेश्वरीचे उदाहरण फार जुने झाले. अगदी अलीकडे The world this week या कार्यक्रमात वयाच्या पाचव्या वर्षी अतिशय उत्कृष्ट पियानो वाजवणारा मुलगा दाखविला होता. किंवा भारतातच एक मुलगा वयाच्या ८व्या वर्षी अनेक वैज्ञानिक व गणिती प्रमेये मांडतो. त्याला भारतातील कुठल्या ठित प्रवेश मिळत नाही अशी बातमी मध्यंतरी होती. या गोष्टींची उपपत्ती कशी लावायची?
माझ्या मते अध्यात्म ही विवेकवादाच्या पुढची पायरी आहे. ज्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक व तर्कसंगत पद्धतीने माणूस लावत जातो व तो अशा एका ठिकाणी येतो की त्यापुढची उत्तरे त्याला देता येत नाहीत, तेथे अध्यात्माची सुरवात होते. त्यामुळे विवेकवादाच्या सुरवातीसच अध्यात्म खोडून काढण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. कमीतकमी अध्यात्म दारुड्याला दिसणाच्या गुलाबी उंदराइतके cheap नाही येवढी तरी जाणीव ठेवावी असे मला वाटते. असो.
माझे विचार अधिक सुस्पष्टपणे मांडण्याइतका माझा सराव राहिला नाही. तरीही त्यातील भावार्थ आपण जाणून घ्याल अशी आशा आहे.
आपला,
श्याम कुळकर्णी
यमाई, तंत्रनगर, जवाहर कॉलनीजवळ, औरंगाबाद ४११००१
चौसाळकरांचा संताप असमर्थनीय
‘जातिविग्रहाच्या मयांदा व धोक’ या लेखात (नवा सुधारक ऑक्टः १०/१५ ) श्री. अशोक चौसाळकर यांनी समाजवाद्यांवर बरीच आगपाखड केली आहे.
मंडल–निर्णयाच्या विरुद्ध विशेषत: उत्तर भारतात जे आंदोलन झाले त्यान आत्मदहनाच्या घटना घडल्या त्या लक्षात घेऊन आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी चर्चा करायला हवी होती व तो निर्णय स्थगित सुध्दा करायला हवा होता. पण तसे न करता विशेषत: डॉ. आंबेडकर व डॉ. लोहियांच्या अनुयायांनी ताठर भूमिका घेतली. याबद्दल चौमाळकरांनी त्या अनुयायांना व विशेषत: प्रमिला दंडवते, मृणाल गौर, मधु लिमये, ना. ग. गोरे यांना दोष दिला आहे.
चौसाळकरांची चीड, संताप व तळमळ समजण्यासारखी आहे. पण त्यांनी याच मुद्यांची गल्लत केली आहे. त्या आंदोलनात तरुण पदवीधर विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता हे खरे आहे. पण आंदोलनाचे नेतृत्व किंवा संचालन कोण करीत होते हे कधीतरी स्पष्ट झाले होते का? सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी व भाजप आणि काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते हेच त्या आंदोलनाचे खरे सूत्रधार होते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण या मंडळींनी चळवळीची जबाबदारी घेतली नाही.
त्यामुळे चर्चा व वाटाघाट करणे फारच अवघड होते. तरीही सुरेंद्र मोहनांनी अ.भा.वि.प. चे काही नेते व इतर काही विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधला होता. (मृणाल गोरे किंवा ना.ग. गोरे दिल्लीत राहात नाहीत. त्यांनी आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी संपर्क का साधला नाही हा प्रश्न योग्य आहे का?) तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दोन-तीनदा जाहीरपणे सांगितले की आंदोलनकारी विद्याथ्र्यांशी मी चर्चा करू इच्छितो. पण आंदोलनकारांकडून प्रतिसाद आला नो असा — आधी मंडल निर्णय स्थगित करा. मगच बोलणी होतील. ही निवेदनेमुध्दा कुणा नेत्याने केली नाहीत. समता मंच, इक्वॉलिटी फ्रंट व अँटीमंडल ऊंट अशा अंत्यत तात्कालिक व अस्थायी संघटनांच्या नावाने ती जाहीर झाली. बहुसंख्य वृत्तपत्रे मंडल–निर्णयाच्या विरोधी असल्याने निवेदनावर कुणाची श्रध्दा आहे – वगैरे गोष्टींविषयी कोणी खातरजमा करून घेण्याची तसदी घेतली नाही.
आत्मदहनाच्या ज्या घटना घडल्या त्यातल्या काही अत्यंत दांकास्पद आहेत. सात, तेरा किंवा सतरा वर्षाच्या मुलामुलींनी आत्मदहन किंवा अन्यप्रकारे आत्महत्या केल्या हे वर. त्यांनी प्रश्नाचा नीट अभ्यास केला होता का? लोकांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला का तरीही आत्मदहन करणारी मुले माझीच मुले आहेत, त्यांचे जीवन अकाली संपले याबद्दल मला अतिशय वेदना होत आहेत असे वि.प्र. सिंगांनी दोनतीन वेळा सांगितले.
चौसाळकरांना नेमके काय म्हणायचे आहे हे त्यांनी आता तरी शांतपणाने परत लिहावे. आपला राग्र कुणावर तरी व्यक्त करायचा ही पद्धत बरोबर नाही.
पन्नालाल सुराणा
दैनिक ‘मराठवाडा’, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद, ४३१००१
‘श्री. दिवाकर मोहनींना उत्तर’ (‘नवा सुधारक’, मे २०) या लेखात श्री. के.रा. जोशी, सुरुवातीलाच असे प्रतिपादतात की “हिंदू म्हणून करावयाची कर्तव्ये कोणती, या प्रश्नाचे उत्तर निश्चित ठरले तर, ती कर्तव्ये न करताही एखाद्याला हिंदू म्हणवून घेता येईल का, हा प्रश्न निकालात निघतो.” परंतु, त्यांच्या सबंध लेखात ही कर्तव्ये कोणती याचा उल्लेख आढळत नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय इ. ज्या सद्गुणांचा त्यांनी उल्लेख केला आहे, ते सर्व धर्मांना समान आहेत, असे तेच मान्य करतात, मग हिंदुविशिष्ट अशी कर्तव्ये कोणती? हिंदुसमाज हा स्वाभाविकपणे ज्या गुणांकडे झुकणारा आहे, असे ते म्हणतात, त्यातील सहिष्णुता हा गुण बराच विवाद्य आहे, असे मला वाटते. परधर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा हा समाज स्वधर्मीयांशी मात्र किती पराकाष्ठेच्या असहिष्णुतेने वागला, याची उदाहरणे पुरात, इतिहासात हवी तेवढी आहेत. तसे नसते तर स्वा. सावरकरांसाररव्या द्रष्ट्या पुरुषाला या वृत्तीविरुध्द आयुष्यभर मोहीम उघडावी लागली नसती व डॉ. आंबेडकरांसारख्या दुसर्या एका महामानवाला आपल्या लक्षावधी अनुयायांसह इतर करायची पाळी आली नसती!
आपला,
य.ज. महाबळे
डॉ.एस.एस. रिसबूड यांचे घर, एस.टी. स्टॅडजवळ,
नायगाव बाजार, ता, बिलोली, जि. नांदेड, ४३१ ७००
आपला ‘नवा सुधारक’ मला फार आवडतो. सप्टेंबरचा अंक उत्कृष्ट आहे. मॉक्रटिमचा संवाद, विवेकवाद छान आहे. एवढेच नाही तर आपण अशिष्ट पत्राला दिलेले शिष्ट उत्तर फार महत्त्वाचे आहे….
दुर्गा भागवत
राजेन्द्र विहार,गिल्डर लेन, मुंबई ८