राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-३) 

निवृत्तलेले जनाब ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि व्याकरणतज्ज्ञांना आणि फलक रंगाऱ्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या (कारण राष्ट्रपती’ या शीर्षकात ‘बीबीजी’ला कसे बसवणार?) सौ. प्रतिभा देवीसिंग शेखावत (पूर्वीच्या कु. प्रतिभा नारायण पाटील) या दोघांचा या लेखात समाचार घ्यायचा आहे. तत्पूर्वी काही फुटकळ बाबी स्पष्ट केल्या पाहिजेत. 

प्रस्तुत वैचारिक मासिकाशी अत्यंत घनिष्ठता असणाऱ्या खरे टाऊनच्या विख्यात विचारक मित्राने ‘तुमच्या लिखाणात अंतर्मुख करणारे काही नाही’ असा सूर काढला आहे. त्याचप्रमाणे इतरांनी ‘इंडिया टुडेच्या ओंजळीने पाणी पिण्यावरही आक्षेप घेतला आहे. (नुकत्याच संपन्न झालेल्या प्रांतिक थिऑसॉफिस्ट फेडरेशन’ आणि ‘अंताराष्ट्रिय संस्कृत संमेलना’त भेटलेल्या परग्रामस्थ मित्रांनी पाठही थोपटली आहे.) प्रथमांशाच्या प्रारंभी याच विषयावर का लिहावेसे वाटले याचा संकेत दिला आहे. आणि सर्वच अकरा- बारा प्रोग्रेसिवली चीपर बाय द डझन ?) यांच्यातील ‘पंक्तिप्रपंचा’ साठी एक आधार हवा होता इतकेच. 

याच तपशिलांत (दुर्दैवाने) अनेक नवे पायंडे पाडणाऱ्या बाराव्या राष्ट्रपतीशी म्हणजेच रामेश्वरमच्या संगीतज्ञ, विज्ञानवीर, स्वतंत्रप्रज्ञ आणि एकांडा शिलेदार अशा नवनिवृत्त राष्ट्रपतीशी फक्त एकदाच अगदी ओझरती अशी भेट झाली, याची मोठीच खंत आहे. माझे असमवयस्क पण समतोल (की समतार) परस्परप्रशंसक मित्र के. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी सुचवले होते की तुम्हाला फुरसतीने भेटायचे असेल तर भेट ठरवतो. तेव्हा मीच म्हटले की ‘नको, मुख्यतः मुलांच्या व त्यांच्या परस्परभेटीसाठीच हे आयोजन, तेव्हा ते साधले पाहिजे. 

असे काय केले कलामांनी? सर्वप्रथम प्रत्येक अभिभाषणात व आकाशभाषणात आवेशपूर्ण पण अभिनिवेशहीन आणि सर्वकष अशा विकासाची भूमिका वारंवार मांडली. दिखाऊपणापेक्षा टिकाऊपणावर भर देणारी त्यांची वागणूक, लेखणूक व जी करणे भाग होती ती राजकीय ‘वागणूक ही लक्षणीय असे एकदोन उदाहरणांतच स्पष्ट होते. दृष्टांततः “बिहार विधानसभा विसर्जन मान्यता’ या प्रकरणात त्यांनी चलसंगणकावर लेखी स्वरूपात सर्व माहिती मागवून दोनदा प्रधान मंत्र्यांशी संभाषण पण केले. (अर्थात् मनमोहन सिंगांची ‘मोहिनी’ आणि कदाचित अगोदरच ‘नीड बेस्ड’ म्हणजे देणाऱ्याला द्यावीशी वाटली तेवढीच माहिती दिली गेल्यामुळे.) तरीही सर्वोच्च न्यायालयासमोर बिचारे कलाम तोंडघशी पडले. अर्थात् न्यायालयाने निर्णयात ‘जोरका धक्का’ धीरेसेच मारण्याचा प्रयत्न करीत म्हटले की, “राष्ट्रपतींना संपूर्ण परिस्थितीचे समग्र आकलन करून देण्यात आले नाही हा शासनाचा व अधिकाऱ्यांचा दोष आहे. ‘ 

या ‘चटकदार दुधाने तोंड पोळल्यामुळे (समस्थित ब्रह्मचारी म्हणून मलाही असे अनुभव 

आले.) ‘लाभ-पद’ प्रकरणी कलाम अवर्गळ यांनी संबंधित विधेयक परत पाठवले आणि लोकसभाध्यक्ष, उपराष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या सहमतीने एक समिती स्थापन करण्यात आल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू झाली. या समितीच्या किती बैठका झाल्या ( न झाल्यास का नाही) हे समजून घेण्याचे प्रयत्न कर्तव्य नव्या राष्ट्रपतींचे राहील हे उघड आहे. विवाद्य मुद्दा अत्यंत संवेदनीय असा संसदेवरील हल्ल्यात आरोप पूर्णपणे शाबीत झालेल्या व दयायाचना करणाऱ्या मियाँ अफजल गुरूचा उपर्युक्त इंडिया टुडेच्या अंकात कलामांनी वारंवार स्पष्ट केले की प्रथमदर्शनी प्रकरण त्यांच्या नजरेत आणले गेल्यावर त्यांनी दिलेल्या पूर्णपणे तपासून प्रस्तुत करावे’ या आदेशाचे पालनच झाले नाही! गृहमंत्री व इतर सर्व अशी सारवासारव करीत गेले की नेहमीच्या (म्हणजे देर देर दिरंगाईच्या) पद्धतीने तपासणी चालू आहे. दरम्यान ‘फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द का करू 

गेले. नये’ वगैरे फूट फाट फाटे या प्रकरणात फुटत 

या तीन (बिहार, लाभपद विधेयक आणि संसद हल्लाप्रकरण या सर्व दंड्यांना दंड) मूळ चिंतनीय राष्ट्रपति निर्णयांशिवाय नव्या (त्यावेळी येऊ घातल्याचे ज्ञान नसलेल्या) राजस्थान राज्यपालां (?) नीही राजस्थान विधानसभापारित एक विधेयक वरिष्ठ विचारार्थं केंद्राकडेच रवाना केले असे ऐकिवात आहे. या कालक्रमात निष्पक्ष, निर्भीड, तटस्थ पण आदर्श सल्ला कोण देऊ शकेल या धर्मसंकटात सापडलेल्या सड्या राष्ट्रपतीची अवस्था शेक्सपीयरच्या अथेल्लोप्रमाणे झाली असावी. 

1962 च्या संसद् राज्य निवडणुका झाल्या त्यावेळी मी विधानसभा उपसचिव व जवळ जवळ सर्व समित्यांचा (विशेषतः आर्थिक व वेतन) सचिव होतो. मी कडक नियम केला होता (जो आधी नव्हता) की प्रत्येक जाणाऱ्या व येणाऱ्या विधानसभा- सदस्याने आपले अंतिम व आदिम वेतन माझ्या कक्षात येऊनच घेतले पाहिजे – सुदैवाने वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा असल्याने कोणीही यात खळखळ केली नाहीं. काही अपदस्थ आमदारांचे निवास भोजन-फोन इत्यादींचे देणे समक्षच वसूल केल्यामुळे पूर्वीसारखे प्रलंबित नुरले. 

नव्या आमदारांमध्ये खूपच फरक पडला होता, कारण मे 60 मध्ये द्वैभाषिक महामुंबईतून महाराष्ट्र वेगळा झाल्यामुळे विरोधकांची संख्या एकदमच घसरली होती. माझ्या आठवणीप्रमाणे ती 50 च्या आतच (278 पैकी). काँग्रेस पक्षाला ‘श्रमिक दिनी’ तो महाराष्ट्रस्थापनादिन झाल्यामुळे 60 चे 8 महिने व पूर्ण 61 वर्ष या काळात मोकळा श्वास घेऊन फोडाफोडी करायला व त्याचप्रमाणे नव्या समीकरणाला वाव द्यायला बळ मिळत होते. (जे पूर्वी शक्य किंवा राजव्यवहार्य नव्हते). 

या नव्या मनूच्या नव्या दमाच्या शूर शिपायांमध्ये मनू नावाच्या नसल्या तरी काही धाडशी ‘लक्ष्म्या समोर सरसावल्या व यशस्वीही झाल्या. बार्शीच्या सौ. प्रभावती झाडबुके या पुढे दरवर्षी प्रथम अधिवेशनात राज्यपालांच्या आभाराचे औपचारिक ठराव मांडत असत. इतर काही महिला आपापल्या आवडीचे विषय उचलून धरीत, प्रश्न उठवीत मधून मधून मध्ये पडणे (इंटरप्शन, इंटरवेन्शन) देखील करायला सोकावल्या (?) होत्या. 

या नव्या बहरांमध्ये ठळकपणे उठून दिसणारी (इतरांपेक्षा ठेंगणी असली तरी ) प्रतिभा पाटील नावाची पूर्व खानदेश (म्हणजे जळगाव) जिल्ह्यातील चुणचुणीत आमदारीण चर्चेत येऊ लागली. ग्रंथालयात डोकावणे (मी निवडून अध्यक्षांनी नव्याने नेमलेल्या) ग्रंथपाल व माहिती अधिकाऱ्यांना भंडावून सोडणे, प्रश्नतासात उपप्रश्न विचारून मंत्र्यांना अस्तित्व जाणवून देणे, शुक्रवारच्या ‘खाजगी’ (म्हणजे अशासकीय)’ ठराव- विधेयकाचे मसुदे (कधीकधी माझ्याच मदतीने) बनवून घेऊन ईश्वरसोडतीत (बॅलट) आल्यास सखोल चर्चा करणे असे अनेक दृक्श्राव्य विक्रम (की विभ्रम?) प्रतिभाताई करू लागल्या. इतर स्त्रीआमदार तर सोडाच, पण पुरुषआमदारसुद्धा आपले वैधानिक कर्तव्य इतक्या इमानेइतबारे करतात का याची शंका असे. 

माझ्या लक्षात आले की हे पाणी काही वेगळेच आहे. मूळचे राजपूत सोळंकी व नंतर खानदेशी ‘गांवबूढा’ (हा खास आसामी शब्द आहे) अशा श्रीमंत नारायणराव पाटलांची ही कन्या पुढेमागे मोठे नाव काढील अशी खूणगाठ तेव्हाही बांधणे शक्य होते. प्रतिनियुक्तीची 3 वर्षे उलटल्यावर 63 च्या अखेरीस पदोत्रतीवर खात्यांत परतलो, तरी 65 मध्ये पुन्हा नागपूरच्या मुलकी किंवा डाकतार लेखापरीक्षेत परत आल्यावर प्रत्येक नागपूरसत्रांत माझी विधानभवनात फेरी असे. वर्धिष्णुर्विश्वदर्शिता अशी ही देखणी आमदारीण यथावकाश अमरावती निवासी होऊन सौ. प्रतिभा देवीसिंग झाली. 

दंपतीची प्रथमभेट आयकर प्रशिक्षणात वीजउपमंत्री कृष्णचंद्रपंत आले असताना झाली, आता उपमंत्री व गृहस्थिनी झाल्यावरही अजिबात न ढळणारा शिरावरचा पदर अदब व अगत्य यांचे अजब मिश्रण आणि एकंदरीतच ‘आप बड़े हैं तो हम भी कुछ कम नहीं’ असा सविनय आत्मविश्वास या सर्व गोष्टी माझ्या पूर्वानुमानाप्रमाणे होत्या. 

क्रमाक्रमाने उपमंत्री, राज्यमंत्री, मंत्री – मध्यंतरी विरोधी पक्षनेत्या अशा चढत गेलेल्या सौ. प्रतिभाताईंची उन्नत प्रगती दिलासा देणारी होती. नागपूर सत्रामधील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे, विदेशी सांसदांच्या येण्या-जाण्याचे, संसदीय अभ्यासवर्गांचे आणि विशेषतः (असेंब्लीच्या वेळी घेतल्या जाणाऱ्या) सांस्कृतिक कार्यक्रमाचे मला आमंत्रण असायचेच आणि या सर्व भेटीगाठींत उभयतांचे उन्नयन लक्षात घेतले जायचे. 

योगायोगाने बरोबर दहा वर्षांनी (11.63 मध्ये जाऊन 11,73 मध्ये पुनश्च)मी मुंबईत पधारलो. 

खानदेश-विदर्भ अशा अनेक ठिकाणी भेटीगाठी व्हायच्या. प्रत्येक वेळी बाईंच्या दर्शनी रूपात अभेद पण कार्यपद्धतीत उत्तरोत्तर सुधारणा जाणवत असे… त्यावेळचा एकच खूप गमतीचा प्रसंग नोंदवून मी या ‘त्रयोदशगुणी’ तांबूलचर्वणाच्या अंतिम चरणाकडे वळतो. चोखंदळ वाचकांना स्मरत असेल (आ.सु.चे सर्वच वाचक चोखंदळ असे मी समजतो) की 1974 मध्ये जागतिक महिला वर्ष साजरे करण्यात आले. (नुकतेच ‘अहिंसा’ व जिले गेले, त्याप्रमाणे). एक दिवस मुंबईतील सर्वांत मोठ्या नियतप्रकाशनसंस्थेच्या (अँड ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर) फेमिना मासिकाच्या संपादिका अचानक माझ्या कक्षेत धडकल्या. 

मी ओळखले होते तरीही आपली ओळख देत त्या म्हणाल्या, 

‘आमच्या महिलावर्ष विशेषांकासाठी तुमचा लेख घेण्यास आले आहे.’ मी म्हणालो, 

‘अहो मी केंद्रीय अधिकारी -सध्या इथे उसनवारीवर आहे. शिवाय अविवाहित. मी तुमच्यासाठी काय लिहिणार? त्या उत्तरल्या, 

‘महिला कल्याणमंत्रीणबाईंनी पाठवलं आहे. तुम्ही आगळंवेगळं लिहिता असंही त्या म्हणाल्या.’ मी थोडे थांबून म्हणालो, 

‘मी एक काय दोन लेख देऊ शकेन (असे मी सध्याही सर्व संपादकांना मुद्रा केल्यावर सांगतो.) पण तुम्ही ते छापाल का याची शंका आहे. त्यांनी प्रश्नार्थक मी म्हटले 

“जिवंत कर्वे आणि मृत आगरकर यांची शताब्दी ज्या एका वर्षी आली तेव्हाच मी जाहीरपणे म्हणालो होतो की आगरकर यांच्या अगदी विरुद्ध कार्य कर्व्यांनी करून दाखवले आणि मग सांगितले- सहशिक्षण नसावे असे माझे मत आहे. शिवाय नोकऱ्यांत विशेषतः सरकारी कामात ज्या घरी एक पुरुष कमावतो तिथल्या स्त्रियांना अर्ध किंवा अंशवेळच नोकरी द्यावी- विशेषतः प्रजननक्षम काळात असे मला वाटते. त्यांचा चेहरा पडला व म्हणाल्या बाईबाई, हे कसं छापायचं?’ (मी पण खंतावलो) व पुढे प्रतिभाताईंनी मला हटकल्यावर माझे लेख तयार असूनही त्यांनी कसे घेतले नाहीत हे कळले. 

हे सर्व कदाचित पाल्हाळाने लिहिण्याचे कारण असे की पंचवार्षिक अंतर असले ती आम्हा उभयतांचे एकमेकांवर लक्ष होते (जेव्हा प्रतिभाताई राज्यसभा उपाध्यक्ष झाल्या तेव्हा मी हेही त्यांना सांगितले की या पदावरील तीनही महिला-व्हायोलेट आल्वा, नजमा हेपतुल्ला व तुम्ही- मुंबई/महाराष्ट्र संलग्र आहात ) 

नाव दूरदर्शन आकाशवाणीवर घोषित होताच (माझा फोनोग्रॅम व नंतर शुभेच्छा मिळाल्यावर) जाहीरपणे सांगण्यात आले की मी रबर स्टॅम्प होणार नाही.’ नंतरच्या सर्व प्रगट भाषणांतही स्वतंत्र बाणा, तारतम्य, सारासारविवेक, राष्ट्रहित, राष्ट्रपतिपद सर्वांच्या ‘भल्यासाठी’ अशी धोरणे, व्यवहारदृष्टी बाळगण्यात येईल असे ऐकले. 

कलामांची कसोटी ठरलेली 3 पैकी 2 प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. पूर्वराष्ट्रपतीपेक्षा निश्चितच जास्त राजकीय अनुभव असलेल्या आताच्या राष्ट्रप्रमुख (मला वाटते हाच शब्द आता पुढे रूढ व्हावा) कलामांप्रमाणे विश्वव्यापी, सर्वकष, वैज्ञानिक, सर्वसमरस आणि विशेषतः पक्षावेशमुक्त (विलायत आणि युरोपात सभाध्यक्षांप्रमाणेच राष्ट्रप्रमुखही पक्षालिप्त असतात) निर्णय घेऊन आपली वरिष्ठता, प्रथम नागरिकता आणि संपूर्ण देशहित संबंधी जागरूकता दाखवतील काय? 

[लेखक- परिभाषा निर्मिती, संसद सेवा आणि भारतीय लेखा परीक्षा सेवेत (IAAS) 35 वर्षांहून अधिक काळ अधिकारी होते.] 

फोन क्र. (0712) 224650 (पी.पी.) 

**********************************************************************************************************************

प्रकाशक : तुम्हाला तुमच्या नव्या कादंबरीचं कथानक कसं सुचलं? 

लेखक : माझ्या पहिल्या कादंबरीवरून निघालेल्या सिनेमावरून! 

*********

बायको : काय हो, बायको बोलत असताना तुमचा तो मित्र सारख्या जांभया काय देत होता? 

नवरा : तसं नव्हे ग! मध्ये बोलण्याचा त्याचा प्रयत्न होता… 

**********************

पेशंट डॉक्टर, अगदी उत्तेजित करणारं काही प्रक्षोभक करावंसं वाटेल असं काही द्या… 

डॉक्टर : ते तुम्हाला बिलात आढळेल. 

*********************

हॉलीवूडमधल्या एका नटीची मैत्रीण तिच्या लग्नाला येऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, तेव्हा ती म्हणते, “जाऊ दे ग! पुढल्या वेळी येशील !” 

***********************

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.