मासिक संग्रह: जानेवारी, 2025

बलात्कारी मानसिकता कशी घडते?

बलात्कारी मानसिकता कशी घडते? ह्या प्रश्नाकडे वेगळ्या अंगाने पाहण्याची शक्यता पडताळण्यासाठीचा हा यत्न समजावा. मी मानसशास्त्राचा अभ्यासक नव्हे; पण ‘अथातो कामजिज्ञासा’ म्हणून ह्यात डोकावतो एवढेच!

आपल्या वाचनात , ऐकण्यात पुरुषांनीच केलेले बलात्कार येतात. स्त्रीदेखील पुरुषाला मोहात पाडते, वश करते, सिड्यूस करते; पण बलात्कार केल्याचे मी कधी वाचले, ऐकले नाही. ह्यासाठी केवळ पुरुषांची जास्त शक्ती किंवा पुरुषप्रधान समाजरचना एवढे स्पष्टीकरण पुरणार नाही. मला वाटते, पहिले लिखित वाङ्मय किंवा कला हे पुरुषांनी निर्माण केलेले आहे. त्यातील धार्मिक वाङ्मयात स्त्रीचे प्रातिनिधिक चित्रण म्हणजे विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणारी मेनका किंवा पाश्चात्य इव्ह.

पुढे वाचा

नरकात फुललेल्या स्वर्गीय प्रेमाची शोकान्त कहाणी

देवानारचा डोंगर आणि फर्झाना

पुस्तक परिचय
लेखिका – सौम्या रॉय
भाषांतर – छाया दातार
पाने – २३०
किंमत – २९० रुपये

‘देवनारचा डोंगर आणि फर्झाना’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. ही एक भयकथा आहे, पण ही काल्पनिक नाही, तर वास्तव आहे आणि हे वास्तव जळजळीत आहे. 

देवनार हा मुंबईतलाच विभाग आहे. मध्य-मुंबईपासून अगदी जवळ असलेला. पण सुखवस्तू मुंबईकराला देवनार म्हणजे देवनार कत्तलखाना आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड ह्या दोनच गोष्टींची थोडीफार माहिती असते, आणि ती पण पेपरमध्ये अधूनमधून येणाऱ्या तुरळक बातम्या वाचून.

पुढे वाचा

मुखवटा

मोठा होत गेलो
आणि आणि एकेक मुखवटा चढवत गेलो.
प्रत्येकाकरिता एकेक वेगळा मुखवटा
आणि मग चढवला मी एक मुखवटा
माझ्याकरिताही.

कळत नाही आता
कोणता मी आणि कोणता मुखवटा.
होते भेसळ दोघांची.
वाक्याची सुरुवात होते मुखवट्याने
आणि शेवट होतो स्वतःच्या बोलण्याने.

आणि कधी याच्या अगदी उलट.
अनेकदा तर मी बोलतो आहे असे वाटते
आणि मग लक्षात येते मुखवटाच बोलत होता.

जीवन असे गुंतागुंतीचे झाले आहे.