बलात्कारी मानसिकता कशी घडते? ह्या प्रश्नाकडे वेगळ्या अंगाने पाहण्याची शक्यता पडताळण्यासाठीचा हा यत्न समजावा. मी मानसशास्त्राचा अभ्यासक नव्हे; पण ‘अथातो कामजिज्ञासा’ म्हणून ह्यात डोकावतो एवढेच!
आपल्या वाचनात , ऐकण्यात पुरुषांनीच केलेले बलात्कार येतात. स्त्रीदेखील पुरुषाला मोहात पाडते, वश करते, सिड्यूस करते; पण बलात्कार केल्याचे मी कधी वाचले, ऐकले नाही. ह्यासाठी केवळ पुरुषांची जास्त शक्ती किंवा पुरुषप्रधान समाजरचना एवढे स्पष्टीकरण पुरणार नाही. मला वाटते, पहिले लिखित वाङ्मय किंवा कला हे पुरुषांनी निर्माण केलेले आहे. त्यातील धार्मिक वाङ्मयात स्त्रीचे प्रातिनिधिक चित्रण म्हणजे विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणारी मेनका किंवा पाश्चात्य इव्ह. दोघींची पुरुषाला मोहात पाडण्याची शक्ती हा समान घटक. लिहिणारा उघडच पुरुष असल्याने, आपण बळी जात असल्याचे दाखवून दोष मेनका/इव्ह ह्यांच्यावर ढकलून मोकळे होण्याचा त्याचा साळसूदपणा सहज समजून घेता येईल!
धार्मिक वाङ्मयातील स्त्रीत्वाची, कामवासनेची निंदा करणारा भाग क्षणभर बाजूला ठेवून आपण ललित साहित्य, चित्रपटांकडे पाहू. त्यातील स्त्रीचे चित्रण उत्सुकता, कुतूहल आणि आकर्षण वाढवणारे असते. त्यातल्यात्यात चित्रपट हे माध्यम निरक्षरांनादेखील उपलब्ध होणारे आणि विक्रयशास्त्राने (मार्केटिंग) प्रेरित झालेले त्यामुळे अधिकाधिक प्रभावी, लाखो लोकांवर परिणाम करणारे आहे. ह्या दोहोंमुळे पौगंडावस्थेतीलच नव्हे तर, प्रौढ, प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या पुरुषांचीदेखील मानसिकता नेमकी कशी घडली आहे, ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात अश्लील साहित्य आणि चित्रफिती आंतर्जालावर सहज, मुबलक प्रमाणात कोणालाही उपलब्ध असल्याने, रिकाम्या मनात सैतानाला थैमान घालायला अमर्याद वाव आहे.
तसे पाहता, निसर्गाने सातत्यासाठी निर्माण केलेले दोनतीन फरक सोडल्यास स्त्रीदेहात वेगळे काही नाही. तरीपण, अतिरिक्त, अतिशयोक्त चित्रणाने नकळत त्याबाबतचे ‘ऑब्सेशन’ किंवा अदम्य कुतूहल निर्माण केले जाते. ह्याशिवाय विज्ञानाने देवधर्म, पापपुण्य किंवा मरणोत्तर मिळणारी गती इत्यादी सगळे निकालात काढले असल्याने, माणसाच्या अधोगामी वृत्तीला अटकाव राहिलेला नाही. कायद्याच्या कचाट्यात न सापडण्याची दक्षता घेतली की झाले, अशी भावना निर्माण झाली आहे. बलात्काराच्या मानसिकतेला हे वातावरण निश्चितच अनुकूल आहे, हे नाकारता येणार नाही. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात एकाच वेळी तीव्र आणि टोकाच्या दोन भावना – आकर्षण आणि शत्रुत्व कार्यान्वित होतात/असतात, असा माझ्या विवेचनाचा रोख आहे. ललित वाङ्मयाबरोबरच अश्लील साहित्य, सिनेमे ह्यांची निर्मिती ह्या अधोगतीला कारणीभूत असते. कौटुंबिक हिंसाचारात होणाऱ्या लैंगिक अत्याचारात आणि वृत्तपत्रातून येणाऱ्या बलात्काराच्या दुर्घटनांच्या मागे ह्या वाङ्मयाने, विविध कलांनी निर्माण केलेली स्रीदेहाविषयीची अकारण उत्सुकता आहे.
स्त्रीवादी लेखनातून पुरुषांची सारी अक्कल सभ्य शब्दात सांगायचे (युफेमिझम) तर दोन पायांमध्ये असते. मेन आर ग्रोन अप टीनेजर्स इत्यादी टीका आढळते, ती ह्यामुळेच.
जे शरीराचे तेच मनाचे. विकार किंवा अंतरंग, स्त्रियांचे काय किंवा पुरुषांचे काय समानच असते; पण अन्फॅथोमेबल आर द वेज ऑफ वुमेन अशा वचनातून त्याच्याभोवती गूढतेचे वलय निर्माण केले गेले आहे. त्याच्या अनेक अनिष्ट साइड इफेक्ट्सपैकी एक बलात्कार आहे.
रोहन सहनिवास, दहिसर ( पश्चिम)
The root of rape culture lies in societal attitudes that objectify women, normalize toxic masculinity, and fail to teach respect for consent and boundaries. These attitudes exist independently of cinema or literature
खूप नेमके विवेचन ! पण पुरुषी शारिरीक वर्चस्व गाजविण्याची वृत्ती आणि बलात्कारामुळे पीडित स्त्रीच्याच चारित्र्यावर डाग पडतात ह्या विरोधाभासी मानसिकतेखाली वावरणारा समाज अशी अवघड परिस्थिती आहे.
य