मोठा होत गेलो
आणि आणि एकेक मुखवटा चढवत गेलो.
प्रत्येकाकरिता एकेक वेगळा मुखवटा
आणि मग चढवला मी एक मुखवटा
माझ्याकरिताही.
कळत नाही आता
कोणता मी आणि कोणता मुखवटा.
होते भेसळ दोघांची.
वाक्याची सुरुवात होते मुखवट्याने
आणि शेवट होतो स्वतःच्या बोलण्याने.
आणि कधी याच्या अगदी उलट.
अनेकदा तर मी बोलतो आहे असे वाटते
आणि मग लक्षात येते मुखवटाच बोलत होता.
जीवन असे गुंतागुंतीचे झाले आहे.