स्नेह.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी काही संकल्प आखायचे आणि पुढे वर्षभरात त्यातील किती पूर्ण होतात, किती अपूर्ण राहतात ह्याचा हिशोब मांडल्यावर अनुषंगाने आनंदी वा दुःखी व्हायचे, हे आपल्यापैकी अनेकांसोबत वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात झाले असतेच!
ह्या संकल्पांमध्ये एक नागरिक ह्या नात्याने आपण किती आणि कुठले संकल्प करतो, ह्याचाही विचार असायला हवा. विवेकाने केलेले असे संकल्प आपल्या सगळ्यांना पूर्णत्वाला नेता आले असते तर, आज आपल्या देशाच्या प्रगतीला काही वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. पण, नागरिकत्वाची आपली कर्तव्ये पार पाडण्याचे साधे, सोपे यत्नदेखील आपण करीत नाही आहोत.