स्नेह.
येत्या एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’चा अंक प्रकाशित करतो आहोत. आव्हाने अनेक आहेत. भाजप आत्तापासूनच आपल्या सलग तिसऱ्या विजयाच्या दुदुंभी फुंकत आहे. INDIA आघाडी पर्याय म्हणून समोर यायला धडपडत आहे. निवडणुकांआधी प्रचार, अपप्रचार, कुप्रचार ह्यांचा कोलाहल असतोच. त्यात आता सोशल मीडिया, एआयचा वाढता वापर यांतून वाढलेला गोंधळ!! अश्यात सामान्य नागरिक मतदाता म्हणून विचारपूर्वक समोर येऊ शकतो आहे का हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे.
आपण प्रत्येकच जण पाच वर्षामधून एका दिवसासाठी मतदाता असतो, तर इतर पूर्ण वेळ जबाबदार नागरिक असतो.