चित्र : तनुल विकमशी
आपल्या समाजात नास्तिकांची संख्या किती या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे कठीणच! याचे एक कारण म्हणजे याच्या नोंदणीची कुठे सोय नाही. आणि दुसरे म्हणजे नास्तिक असणारे अनेकजण उघडपणे आपली अशी ओळख देऊ इच्छित/धजावत नाहीत.
खरे तर संशयवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतून सुरू होणारा प्रवास स्वाभाविकपणे नास्तिकतेकडे जातो. विज्ञान, तंत्रज्ञान यांतून मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग सगळे जण उचलतात. पण तरीही विज्ञानाने साध्य केलेल्या अनेक छोट्या-मोठ्या शोधांचे श्रेय शेवटी देवाला देण्याकडेच आस्तिकांचा कल जातो. आणि म्हणूनच आस्तिक असणाऱ्यांचा आस्तिक नसणाऱ्यांसोबतचा संवाद उदार नसतो.