आवाहन

स्नेह

सध्याच्या सामाजिक वातावरणात वर्तमानपत्रे, निरनिराळ्या वाहिन्या, सोशल मीडिया या सर्व माध्यमांना आपल्या कह्यात घेऊन देव-धर्माचा आणि बुरसट परंपरांचा कर्कश कोलाहल करणाऱ्यांचा उन्माद वाढताना दिसतो आहे. धर्म, धार्मिक आस्था यांमुळे जगभरात अनेक युद्धे झाली, नरसंहार झाला. अगदी अलीकडे सुरू असणारे  इस्राईल आणि हमस यांच्यामधील युद्ध याच प्रकारचे. असे असूनही मानवी जीवनात धार्मिक आस्था, श्रद्धा यांचे स्थान वरचढ राहावे हा विरोधाभास बुचकळ्यात पाडणारा आहे.

या पार्श्वभूमीवर बुद्धिप्रामाण्यवादाचा, नास्तिक्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सातत्याने प्रसार आणि प्रचार करण्याचे धाडस दाखवणारे काही गट सक्रिय कार्यरत असणे हे आपल्या सामाजिक समृद्धीचे लक्षण ठरते.

महाराष्ट्रात बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचा पुरस्कार करणाऱ्या ‘ब्राईट्स सोसायटी’ने सप्टेंबर २०२३ला सांगली येथे नास्तिक परिषद आयोजित केली होती. तेथे झालेल्या दोन दिवसांतील कार्यक्रमांचे व्हिडीओज्    https://m.youtube.com/playlist?list=PLoLdh13o3KB-r_Uu-B2wfrEbYOP3lg4eU येथे उपलब्ध आहेत. 

जानेवारी २०२४ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात सांगली येथील परिषदेत झालेल्या चर्चा, परिसंवाद, भाषणे आपण समाविष्ट करतो आहोत. कोणताही विचार मांडला जात असताना तो एकांगी न होता त्याचे मूल्यमापन अनेकांगांनी व्हायला हवे असे आम्हाला वाटते. आपण या विषयावरील आपले विचार, आपली मते, आपला दृष्टिकोन ह्या व्यासपीठावर मोकळेपणाने मांडावा असे आवाहन आम्ही करतो.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २५ डिसेंबरपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp करा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.