Book: The Song of The Cells: An Exploration of Medicine and the New Human
Siddhartha Mukherjee, Imprint: India Allen Lane, October 2022
‘पेशींचे गाणे’ ह्या आपल्या नव्या पुस्तकात प्रसिद्ध लेखक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी म्हणतात, “आपण म्हणजे आपल्या शरीरात नांदणारी पेशींची संस्कृती!” पुस्तकाचे शीर्षक आणि पुस्तकाबद्दल लेखकाच्या दिल्लीत झालेल्या वार्तालापाचे वृत्त वाचले, तेव्हा पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले. गंमत म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला माझ्याच शरीरातले पेशींचे गाणे ऐकू यायला लागले, थोडेसे समजायला लागले. आपले शहर जसे बहुविध नागरिकांमुळे तयार होते, तसेच आपले शरीर म्हणजे आपली बहुविध पेशींनी तयार होणार संस्कृती हे लेखकाने वापरलेले रूपक मला एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून विशेष भावले.