कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटले की आजही एका पिढीला डोळ्यांसमोर येते ते टर्मिनेटर चित्रपटातले रोबोट्सचे दृश्य! स्वतःच्या अफाट ताकदीची जाणीव झाल्यानंतर मानवजातीचा संहार करायला निघालेला स्कायनेट आणि त्याने बनवलेले टर्मिनेटर हे आपल्या नेणिवेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भागच बनलेत जणू! भविष्यात कधीतरी वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर संगणकांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होईल, ‘स्व’ची जाणीव झालेले यंत्रमानव निर्माण होतील, आणि ते मानवाकडे कसे पाहतील या मूळ कल्पनेचा आधार घेऊन अनेक कल्पित विज्ञानकथा-कादंबऱ्या जगभरात लिहिल्या गेल्या, असंख्य नाटके-चित्रपट बनवले गेले. अगदी डॉ. जयंत नारळीकरांसारख्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात संशोधक असणाऱ्या, कल्पित विज्ञानकथा लिहिणाऱ्या लेखकालाही ‘वामन परत न आला’ या पुस्तकात ही कल्पना घेऊन कथा रचावी वाटली.
मासिक संग्रह: जुलै, २०२३
तुका म्हणे सोपी केली पायवाट ….
विलियम झिन्सरचे पुस्तक Writing to Learn (१९८८) मध्ये ते म्हणतात, “विचारांचा आणि शिकण्याचा परिपाक म्हणजे लिहिणे नव्हे; तर विचार करणे हेच लिहिणे”. लिहिण्याची कृती आपली समजूत अधिक प्रगत करत जाते असेही ते पुढे म्हणतात. असे म्हणणारे किंवा लिहिणारे झिन्सर एकटेच नाहीत. आईनस्टाईननंतरचे सर्वांत महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे, नोबल पारितोषिकाचे मानकरी, पुरोगामी विचारांचे भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईन्मन ह्यांनी केलेल्या काही नोंदी वाचून त्यांचा एक सहकारी म्हणाला, “तुझ्या लिखाणातून तुझे विचार खूप चांगल्या रीतीने प्रगट झाले आहेत.” यावर त्याला खोडत रिचर्ड फाईन्मन त्वरित उद्गारले, “लिखाण माझ्या विचारांचे प्रगटीकरण नाही, माझे विचार हेच माझे लिहिणे होय.
कृत्रिमप्रज्ञेचा दशकांपासूनचा प्रवास
कृत्रिम आणि नैसर्गिक
कृत्रिमप्रज्ञा (Artificial Intelligence: AI) म्हणजे काय हे सांगणे हे सोपे नाही. येथे सुरुवातीलाच कृत्रिम आणि नैसर्गिक या शब्दांचे द्वंद्व आहे. सोपे करून सांगायचे झाल्यास कृत्रिम म्हणजे मनुष्यप्राण्याच्या इच्छेनुसार (free will, स्वेच्छेनुसार) बनलेले आणि या बनवण्याच्या प्रक्रियेत जीवशास्त्रीय प्रक्रियांचा समावेश नसलेले असे काहीतरी. नैसर्गिक प्रक्रियांमध्ये आपण स्वेच्छा किंवा हेतू नसलेल्या सर्व भौतिक प्रक्रियांचा आणि त्याचबरोबर जैविक प्रक्रियांचा, विशेषतः गर्भधारणा आणि प्रजोत्पादन प्रक्रियांचा, समावेश करू. उद्या मानवाने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून महाबुद्धिमान प्राण्यांची नवीन जात बनवली तर त्यांच्या प्रज्ञेला आपण कृत्रिम म्हणण्याचे कारण असणार नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग
कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक विकास आणि निरूपयोगी समाजाचे वरदान
जोपर्यंत समाजातील सर्वांत वरच्या कुलीन वर्गाच्या हितसंबंधांना बाधा येत नाही, तोपर्यंत ती घटना चर्चेच्या केंद्रस्थानी येत नसते. कुलीन वर्गाचा विकास म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास आणि कुलीन वर्गाचे नुकसान म्हणजे ते सर्व समाजाचे नुकसान, अशी एक धारणा जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेली आहे. कुलीन वर्गातील एका व्यक्तीवरील संकट हे संपूर्ण देशावरील संकट असल्यासारखा प्रचार केला जातो. आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कुलीन वर्गाचे हितसंबंध धोक्यात येण्याची शक्यता दिसत नव्हती, तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) विकास आणि वापर सरळसोटपणे सुरू होता.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईन
आज ताऱ्यांचे आणि तारकाविश्वांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आहे. जनुकांमधील DNA च्या घटकक्रमानुसार कुठल्या आकाराची प्रथिने बनतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधते आहे. जगभरातील हवामानखात्यांच्या उपकरणांकडून, उपग्रहांकडून मिळणाऱ्या प्रचंड माहितीच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. ड्रोनने, उपग्रहांनी घेतलेल्या हजारो छायाचित्रांच्या आधारे स्थलांतर करणारे पक्षी, प्राणी यांच्या गणनेचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. आकाशगंगेतील परग्रहांचे वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्याची क्षमता दिवसागणिक वाढते आहे. उद्याचा डार्विन किंवा आईन्स्टाईन कृत्रिम बुद्धिमत्तेचा असेल का?
चॅटजीपीटी (ChatGPT) आणि नैतिकता
चॅटजीपीटी ही एक संभाषणात्मक एआय प्रणाली आहे, जी प्रदान केलेल्या इनपुटवर आधारित मानवासारखे उत्तर निर्माण करण्यासाठी सखोल शिक्षणतंत्र वापरते. ‘चॅटजीपीटी’ हे नाव ‘चॅट’ आणि ‘जीपीटी’ चा संयोग आहे. GPT म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. सर्वमान्य इंटरनेट मोठ्या मजकूर विदेवर प्रशिक्षित केले जाते, जे मानवासारखे उत्तर निर्माण करण्यास अनुमती देते.
चॅटजीपीटी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ प्रारूप म्हणून सुरू करण्यात आले. काही दिवसांतच याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे ओपनएआयने सुरू केले होते, पण मोठी गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीने त्यासाठी $10 बिलियनची गुंतवणूक केली होती.
कृत्रिमप्रज्ञा – दुधारी शस्त्र
कृत्रिमप्रज्ञा या विषयावर काही तज्ज्ञ विचारवंतांनी धोक्याची सूचना दिली आहे. जसजशी कृत्रिमप्रज्ञा प्रगत होत जाईल तसतशी मानवी मेंदूची अधोगती होईल. प्रज्ञा या मूळ विषयाचा गाभा माहिती नसलेली पिढी केवळ संगणकाच्या सहाय्याने कामे करू लागतील. संपूर्ण समाज कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. कोरोनाच्या धोक्यापेक्षा किंवा अणूयुद्धाच्या धोक्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. मेंदूचा ताबा कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. OpenAI ही कृत्रिमप्रज्ञेवर संशोधन करणारी संस्था आहे. ChatGPT आणि DALLE/2 अश्या कंपन्यांसोबत आता मायक्रोसॉफ्ट कंपनी जोडली गेली आहे. रोबोटिक्स प्रणालीने तंत्रज्ञान जेवढे विकसित केले त्यामुळे अमर्याद बेकारांचे लोंढे तयार झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
कृत्रिमप्रज्ञा! वरदान की आपत्ती!!
या विश्वात मनुष्य हा सर्वांत हुशार किंवा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून आजवरचा त्याने केलेला प्रवास व विकास हा स्तिमीत करणारा आहे. जगण्याच्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मानवाने अनेकविध शोध लावले. काही समाजाच्या दृष्टीने हितकारक तर काही अत्यंत हानिकारक व विध्वंसक. भूतकाळात लावलेल्या अनेक शोधांच्या आधारावर नवे तंत्रज्ञान बेतलेले आहे. वर्तमानकाळातही अधिकाधिक संशोधन करून नवनवीन शोध लावण्याचा माणसाचा ध्यास अजूनही कमी झालेला नाही. भविष्यातील पिढीच्या कल्याणासाठी आजची त्याची मेहनत, त्याची तपस्या खरोखरच कौतुकास्पद म्हणावी अशी आहे. अणूंचा शोध लागल्यावर अनेक वर्षांनंतर जर कोणता महत्त्वाचा शोध लागला असेल तर तो संगणकाचा शोध.
लिव्-इन विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स
२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा.
कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.
तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत.
काळ बदलत आहे…!
अलीकडे माणसं होतायेत निकामी
भेसूर चेहरे अडकताहेत
तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात…
गतिमान होणाऱ्या काळात
धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत..
ऑक्सिजन झालाय गढूळ!
हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी..
मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत
ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू
सारं अगदी चिडीचूप
फक्त आदेश घेणे…पुढे जाणे…
हे हात पडलेत गळून
सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर
गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण
माणूस होतोय बेवारस दिवसेंदिवस
हे तेच उगवलं जे पेरलं होतं
अती विकासाच्या नावातील भयंकर अंधार…
पायरीवर पाऊल टाकून स्तब्ध उभे राहा
गर्दीचा भाग बनून, रेंगाळत
पुढे सरका
नव्या युगात तुमचे स्वागत आहे
डोळे मिटवून माना हलवा
आता काळ बदलत आहे…!