माझ्यावर मुख्य दोन जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे आभार मानायचे. पण मी सुरुवातीला आजच्या सत्राबद्दल बोलणार आहे. शिवाय संघटनेला कशाची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, हेही सांगणार आहे.
तर आजचं सत्र मी खरोखर एन्जॉय केलं. मला वाटलं नव्हतं की या बाजूने एन्जॉय करणं मला कधी जमेल! पण खाली बसून एन्जॉय करण्यासारखंच हे सत्र होतं. प्रत्येक वक्ता खूपच इंटरेस्टिंग बोलला असं मला वाटलं. इथं मुख्यतः, मला फार चांगलं वाटलं की प्रसन्न इथे आलेत आणि त्यांनी एक वेगळी बाजू मांडली. आपल्याकडे कसं असतं, एक कुणी संशयवादी असतो.