गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या बोलणार आहेत. सगळ्यात आधी थँक्यू म्हणते. माझ्या धडाडीसाठी मला पुरस्कार दिला जात आहे. आणि चुकीची गोष्ट म्हणणार नाही पण गैरसमज दूर करते. धडाडी वगैरे असं काहीही नाही. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. आणि हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अनेक ओळखी-अनोळखी लोकांनी मदत केली आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपाची मदत आहे. सोर्सेस म्हणून आम्हाला बातमी देणं, पोलिसखात्यात असल्यावर ती कन्फर्म करण्याचं काम असेल, इत्यादी. पाटील यांच्यासारखे गोव्याचे सीनियर अधिकारी होते, ज्यांनी सनातन संस्थेविषयीचा रिपोर्ट दिला. तो कधी अमलात आणला गेला नव्हता, पण त्यात मांडलेली सरकारी तथ्ये खूप महत्त्वाची होती. त्यामुळे आपण व्यवस्थेला फक्त नावं ठेवायला नकोत. तिथेसुद्धा अनेक महत्त्वाचे लोक आपापली काम करत असतात. तर ते आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी कबूल करते.
त्यानंतर मघाशी दोन संस्थांचा इथे उल्लेख झाला. सीआयडी आणि सीबीआय. सीआयडी आणि सीबीआयने मला काही त्रास दिला नाही. परंतु त्यांचे अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये आले होते हे विचारायला की त्यांचे अंतर्गत रिपोर्ट आम्हाला कसे मिळतात आणि आमची सूत्रे आम्ही त्यांना सांगावी. ती न देण्याचा अधिकार आम्हाला राज्यघटनेने दिलेला आहे. आम्ही तो अमलात आणला. सनातन संस्थेने डेफेमेशनच्या केसेस चालवलेल्या आहे. त्या लढण्यासाठी वकील विनामूल्य काम करत आहेत. कुठलीही फी न घेता. तर हे लोक आमच्या पाठीशी आहेत. वाचक आहेत. त्यामुळे वाचक मूर्ख असतात, त्यांना काही कळत नाही, हे मी कधीही मानत नाही. वाचक सुजाण असतो, असंच मी मानते. प्रेक्षक सुजाण असतो, असं मी मानते. आणि या विश्वासातूनच आम्ही आमचं काम करत आलेलो आहे.
मला एक सांगावंसं वाटतंय, जे मी तसंही सतत सांगत असते की, पत्रकारांना धडाडीची गरज नाहीये. काही वेगळे निर्भीड करण्याची गरज नसते. तुमचे फॅक्टस मात्र क्लीअर असले पाहिजेत. ती तथ्ये मी गोळेबंद पद्धतीने दिलेली असल्यामुळे आजपर्यंतची माझी कुठलीही बातमी नाकारण्यात आलेली नाही किंवा ती छापणार नाही असं सांगितलेलं नाही.
टाइम्स ग्रुपसारख्या नामवंत राष्ट्रीय ग्रुपच्या अंतर्गत मी ‘मुंबई मिरर’मध्ये काम करत होते. जिथे आम्ही फ्रंटपेजवर या विषयांच्या बातम्या वारंवार छापून आणलेल्या आहे, प्रसिद्ध केलेल्या आहे. आणि हे करण्यामागची जी भूमिका होती ती ही होती की, आपण बघतोच आहोत की नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची काल कोर्टात केस होती. तर आपण बघतो आहोत की दहा वर्षांनंतर आता कुठे ट्रायल सुरू झालेली आहे. दहा वर्षांत नेमकं काय घडलं? हा तपास कश्या पद्धतीने फिरवला गेला होता? नागोरी टोळीचं एक कुभांड रचलं गेलं. इथे मृतात्म्यांना बोलावण्याचं! म्हणजे एवढा मोठा विरोधाभास – दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात झाला. त्याच्यामध्ये वेळ वाया गेला. एवढं सगळं झालं. मग सीबीआयकडे तपास दिला गेला. सीबीआय म्हणाले की, ते स्कॉटलांड यार्डला सगळा फॉरेन्सिक अहवाल पाठवत आहेत. पण ते कधी पाठवलेच नाहीत. स्कॉटलंड यार्डच्या या सगळ्या खोटेपणामध्ये कसा वेळ गेला? सीबीआयला सगळी यंत्रणा उपलब्ध करून देण्यामध्ये कसा वेळ गेला? आणि त्यानंतर अर्थातच वीरेंद्रसिंग तावडेंची महत्त्वाची अटक झाली.
पुन्हा एकदा एक प्लाटू आला होता. काहीच झालं नाही या तपासात. आपण पानसरे गमावले, कलबुर्गी गमावले, गौरी लंकेशची हत्या झाली. त्यानंतर २०१८ ला नालासोपाराच्या प्रकरणामुळे, नालासोपाराच्या स्फोटकांनंतर जे पुन्हा वळण लागलं तपासाला, ते आता ट्रायलपर्यंत पोहोचलं आहे. ते रिपोर्टिंग करण्याचं काम मी केलं.
मला एवढंच सांगायचं आहे की आपण आज हे बोलतोय. आज सत्ताधाऱ्यांकडून नास्तिक ही शिवी म्हणून वापरली जाते. तुम्ही जर बघितलं असेल तर – मी नाव सांगत नाही – तुम्ही तुमचं सर्च करू शकता, गूगल करू शकता, स्वतःचा अभ्यास करू शकता – people are called atheist or labelled atheist in such a way – in such a fashion जसं काही तुम्ही काहीतरी चूक करता आहात. पण तुम्ही जे करता आहात ते योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला स्वतःला आहे. राज्यघटनेच्या चौकटीमध्ये राहून तुम्ही जोपर्यंत ते करत आहात, तोपर्यंत तो अधिकार तुमच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. जमाववाद वापरला जातो यासाठी. याला माझा आक्षेप आहे आणि म्हणून मी आज येथे आहे.
मी कार्यकर्ती नाही, मी पत्रकारच आहे. ब्राइट्सची मेंबर आहे. मी हे जाणीवपूर्वक सांगते आहे की, अश्या पद्धतीने जेव्हा हा हक्क हिरावून घेतला जातो, तेव्हा काय करायचं? तर तेव्हा ब्राइट्स असं सांगते की ते आम्हाला मदत करतील. मग आमचं काम असं आहे की ह्या बातम्या रिपोर्ट करणं. आणि मी ते करणार आहे.
विश्व हिंदू परिषदेने अशी मागणी केली आहे की ब्लास्फेमी बॅन करण्यासाठी एक कायदा आणायला हवा. देशामध्ये त्याच्यावर आता चर्चा सुरू आहे. 295 A बद्दल आता चर्चा होतील, गेल्यावेळी पण चर्चा झाल्या होत्या. मुद्दा असा आहे की, असा कोणता कायदा येणार आहे का? हे आपण हसण्यावारी नेतो आहोत. सनातन संस्थेचे कार्यकर्ते ज्यावेळी पिवळे कंदील विकायचे तेव्हा, वीस वर्षांपूर्वी आपण असंच हसत होतो की फ्रिंज ऑर्गनायझेशन आहे. हे काय आहे? वगैरे! लव्ह जिहाद जेव्हा आखाड्यामध्ये येत होता, तेव्हा आपण म्हणत होतो की, असं काय आहे? आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह यांना सरकार तर पाठिंबा देईलच. जर कोणत्या कपल्सची अशी अडचण आली तर खाप पंचायत आपल्याला अपवाद वाटत होता. आज महाराष्ट्रामध्ये या कारणाने हत्या होत आहेत. अशा हत्या आपण छुपेपणाने पचवतो आहोत. या सगळ्याबद्दलचे जे दैनंदिन जीवनातले प्रश्न बनलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की, आज आपण इथे सगळे बसले आहोत की, जो म्हणतो की आम्ही नास्तिक आहोत, देवावर आमचा विश्वास नाही, मी कर्मकांड करत नाही. आपण सगळे प्रीव्हिलेज्ड आहोत हे म्हणण्यासाठी! प्रीव्हिलेज म्हणजे मी.. असं म्हणते की आपल्याला परवडू शकतं हे असं म्हणणं. पण ज्यांना परवडू शकत नाही त्यांना आपण काय मदत करणार आहोत? टिंगलटवाळी करून प्रश्न सुटणार, देवांचे प्रश्न सुटणार आहेत का? सश्रद्ध लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी आपण काय करणार आहोत? आणि तुमचं पॉलिटिक्स काय असणार आहे या सगळ्यासाठी? हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण दुसऱ्या बाजूंकडून ज्या पद्धतीचे फोर्सेस येत आहेत, ज्या पद्धतीची ताकद लावली जात आहे, आज आपण हसतोय पण दोन ठिकाणी लव्ह जिहादचा कायदा आलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे प्रत्येक राज्यामध्ये पुढे येत आहेत.
आपल्याकडे अशी एक प्रकारची कमिटी राज्यसरकारने बसवलेली आहे जिथे आंतरधर्मीय लग्नाच्या जोडप्याच्या प्रायव्हेट लाईफमध्ये सरकार अधिकृतपणे जाते. जर त्यांना काही अडचण असती तर ते तुमच्यापर्यंत आले असते, पण हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या मुखातून आलेली मागणी की ब्लास्फेमी बॅन करा – उद्या जर कायद्याच्या रूपात तुमच्या-आमच्या डोक्यापर्यंत आली तर, नास्तिक असणं म्हणणं, मी देवाला मानत नाही असं म्हणणं, देवाला क्रिटिसाइज करणं किंवा मी विज्ञानवादी आहे असं म्हणणं, धर्म जात ही अंधश्रद्धा आहे असं म्हणणं, धार्मिक अत्याचार आणि जातीय अत्याचाराच्या विरोधात बोलणं हे सगळं येणाऱ्या वीस वर्षात त्याअंतर्गत बसवलं जाऊ शकतं. कारण हिंदू राष्ट्र आणणे हाच तर अजेंडा आहे. जर आपण धर्माला आणि जातीला विरोध करतोय आणि विज्ञानवादी बना असं म्हणतो आहोत, त्यालाच धरून राष्ट्राची स्थापना करायची असं पण असेल. कारण ह्या सींडिकेटने चार विचारवंतांचे बळी घेतले आहे. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे हे आपण लक्षात घेऊया. बुद्धिप्रामाण्यवादी राहूया.
मी केवळ पत्रकार म्हणून नाही बोलत आहे. मी जेव्हा म्हणते की, ‘मला राज्यघटना वाचवायची आहे, आयडिया ऑफ इंडिया मला डॅमेज नाही होऊ द्यायची आहे. How we are going to connect with those WhatsApp groups. त्यावेळेस आपण दुर्लक्ष केले तर आपला हा सायलेन्स समोरच्या राजकीय प्रवाहाला बळकटी देतो आहे का, याचा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जर नास्तिक म्हणून उभे राहणार असाल, विज्ञानवादी म्हणून उभे राहणार असाल तर तुम्हाला त्या व्हाट्सअप ग्रुपवरदेखील बोलायला पाहिजे. व्हाट्सअप ग्रुपवर तुम्ही सायलेंट राहून काही होणार नाही. इथे धर्माच्या, जातीच्या, कर्मकांडांच्या नावाखाली रोज गैरमाहिती पसरवली जाते. सो, मला असं वाटतं की, हे सगळं करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. and that’s why agreed to part of this event today आणि ती कमिटमेंट एक पत्रकार म्हणून आहे. कारण, मला काळजी वाटते की पुढच्या पिढीने मला विचारलं, “हिंदुराष्ट्र बनेल की काय?” तर मला माहिती नाही. आपलं सेक्युलर फायब्रिक टिकावं यासाठी मी काय केलं? तर त्यासाठी मी माझी पत्रकारिता करते आहे. मी काहीही धडाडी वगैरे करत नाहीये.
Thank you for opportunity!
लेख आज सवड काढून वाचला.
तुझे विचार पटले आणि आपण सवड राहायला पाहिजे हे जाणवलं.