मासिक संग्रह: जानेवारी, २०२३

नैनान् विसंगतयः छिन्दति कुंभोजकर

पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषदेच्या निमित्ताने हरिहर कुंभोजकर यांनी लिहिलेल्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया म्हणून लेख लिहिल्याबद्दल कुंभोजकरांचे आभार. मी कुंभोजकरांचे किंवा कुंभोजकर माझे मतपरिवर्तन करू शकतील अशी फारशी आशा माझ्या मनात नाही. त्यामुळे, ‘आजचा सुधारक’च्या वाचकांचे मतपरिवर्तन करणे (किंवा, जे आधीच आपल्या विचारांशी अनुकूल आहेत त्यांचे मत प्रतिपक्षाकडे वळण्यापासून वाचवणे) हाच आम्हा दोघांच्या प्रयासांचा मुख्य उद्देश असू शकतो, तो खासगी चर्चेने साध्य होणारा नाही.

प्रसिद्धीसाठी आलेल्या लेखांवर प्रकाशनपूर्व प्रतिक्रिया मिळवून ती लेखासोबतच छापणे हे ‘आजचा सुधारक’मध्ये नवे नाही.

पुढे वाचा

मनोगत

हरिहर कुंभोजकर ह्यांचा ‘हिरण्यकश्यपूचे मिथक……’ हा लेख आणि निखिल जोशी ह्यांना त्या लेखात सापडलेल्या विसंगती हे दोन्ही ‘आजचा सुधारक’च्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. “हे एकाच वेळी प्रकाशित झाले ह्याचा अर्थ निखिल जोशी ह्यांना मूळ लेख प्रसिद्धीपूर्वीच उपलब्ध झाला होता” अशी तक्रारवजा मांडणी हरिहर कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या प्रतिवादात केली आहे. ही त्यांची तक्रार रास्तच आहे. परंतु ह्या विषयावर चर्चा घडवून आणावी ह्या हेतूने जाणूनबुजून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. ह्यामुळे हरिहर कुंभोजकरांना त्यांच्या लेखात आणखीन स्पष्टता आणण्याची संधी मिळाली हे त्यांनीही त्यांच्या प्रतिवादात मान्य केले आहे.

पुढे वाचा

श्री. जोशींना दिसलेल्या विसंगतींचे पोस्ट-मॉर्टम

निखिल जोशी ह्यांनी माझ्या लेखाची इतकी सविस्तर दखल घेतली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचे उत्तर माझ्या लेखाबरोबरच प्रसिद्ध झाले याचा अर्थ माझा लेख प्रसिद्धीपूर्वीच त्यांना उपलब्ध झाला होता हे उघड आहे. लेखाच्या शेवटी माझा फोन नंबर आणि ई-मेल ID असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर अधिक सविस्तर चर्चा होऊ शकली असती. त्यांच्या लेखाचे स्वरूपही काहीसे वेगळे झाले असते. कदाचित, त्यानंतर त्यांना आपले उत्तर लिहिण्याची आवश्यकताही भासली नसती. माझेही काही श्रम वाचले असते. पण झाले ते एका अर्थाने फार चांगले झाले.

पुढे वाचा

बाबा लगीन आणि नास्तिक्य – हरिहर कुंभोजकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया

भारतात लग्न करण्यासाठी पुरुषांनी (अपवाद वगळता) किमान २१ वर्षांचे असणे गरजेचे आहे. २१ व्या वाढदिवशी मध्यरात्रीची घंटा वाजते आणि पुरुषांना लग्न करण्याचा अधिकार मिळतो. अर्थातच, २० वर्षे ३६४ दिवस एवढे वय असताना ते जेवढे ‘सज्ञान’ किंवा ‘प्रौढ’ असतात त्यापेक्षा २१ वर्षे वय झाल्यावर फार काही जास्त सज्ञान किंवा प्रौढ होतात असे काहीही नाही. तरीही कायदेशीर उपबंधाने असे ठरवून दिल्यामुळे आपल्याला ते मान्य करावे लागते. सज्ञानता किंवा प्रौढत्व हे कायद्याने ठरवण्याचे मुद्दे आहेत असे मला वाटत नाही. त्या संकल्पनांचा विचार केला असता पुढील काही बाबी महत्त्वाच्या ठरतात.

पुढे वाचा

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.

पुढे वाचा

मनोगत

चित्र – तनुल विकमशी

जगण्याच्या रोजच्या धडपडीतून, मनात चाललेल्या वैचारिक गोंधळाकडे थोडे दुर्लक्ष होत असते. परंतु सभोवतालच्या घटनांमुळ आपण अस्वस्थ होत असतो. ही अस्वस्थता दूर करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. हा संवाद परस्परांमध्ये थेट घडत असतो किंवा पुस्तके, नाटके, चित्रपट, वा समाजमाध्यमे अशा अनेक मार्गांनी तो घडत असतो.

१८ डिसेंबर २०२२ ला पुणे येथे झालेली नास्तिक परिषद ही संवादाची अशीच एक जागा होती. ‘आजचा सुधारक’च्या प्रस्तुत अंकासाठी केलेल्या आवाहनात या परिषदेच्या निमित्ताने आपण काही प्रश्न उभे केले होते. त्यांपैकी काहींची उत्तरे आपल्याला या अंकात नक्कीच वाचायला मिळतील. याशिवाय

पुढे वाचा

नीतिशास्त्राचा आधुनिक परिचय – प्रस्तावना

‘आजचा सुधारक’चा ऑक्टोबर, २०२२ चा अंक नेहमीप्रमाणे अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाला आहे, हे निःशंक आहे. त्यासाठी मी लेखक आणि संपादक यांचे मनापासून अभिनंदन करतो. 

या अंकात तात्त्विक (Philosophical) अंगाने बरेच लेखन आढळते. विश्वविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, जन्म:१८ मे १८७२-०२ फेब्रुवारी १९७०) याच्या ‘A Philosophy for Our Time’ या लेखाच्या श्रीधर सुरोशे यांनी केलेल्या ‘आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान’ या अनुवादापासून ‘दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं…?’ या साहेबराव राठोड यांच्या पत्रलेखनापर्यंत बहुतेक लेख तात्त्विक स्वरूपाचे आहेत. चिंतनाला प्रवृत्त करणारे आहेत.

पुढे वाचा

मेंदूचे अपहरण : निसर्गातील प्रभावी शस्त्र

उंदीर न घाबरता मांजरीकडे जाताना दिसला किंवा एखाद्या किड्याने पाण्यात उडी मारून जीव दिला तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्याला भास होतो आहे का असेही वाटू शकेल. पण निसर्गात सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या घटना घडत असतात, त्यात या आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी खरोखरच घडतात. त्यांचा अभ्यास केला की दिसून येते की हीपण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग लक्षात येते की स्वतःला किंवा स्वजातीच्या भाईबंदांना काहीही उपयोग नसलेली, किंबहुना अपायकारकच असलेल्या अश्या कृती हे सजीव स्वतःहून करत आहेत असे वाटले तरी त्यामागील बोलविता धनी इतर कोणी असतो.

पुढे वाचा

पहिल्या पिढीतला नास्तिक

मी स्वतःला ‘पहिल्या पिढीतला नास्तिक’ म्हणत नाही आणि ही संज्ञा मी शोधलेली नाही, तरीही, ही संकल्पना मला इतकी भावली, की मी त्या विषयावर माझे विचार आणि आस्तिक-नास्तिक वाद-संवाद या संदर्भातले माझे अनुभव व्यक्त करायचे ठरवले.

लहानपणी घरचे वातावरण बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यामुळे घरात देवघर, पूजापाठ, व्रतवैकल्ये हे प्रकार अजिबात नव्हते, पण आजूबाजूला हे सर्वकाही भक्तिभावाने चालू असायचे. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षीच मी वडिलांना देवाच्या अस्तित्वाबद्दल विचारल्याचे आठवते. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तरही मला आठवते. “देव आहे की नाही हे आजवर खात्रीने कोणालाच समजलेले नाही.

पुढे वाचा

स्त्री आणि पुरुष – शॉर्टफिल्म

स्त्री आणि पुरुष
स्त्री आणि पुरुष

स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात?

स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री आणि पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्टफिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा.

https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-online-23b8f449f024f4dd9b22431ec250fa67